एखाद्या व्यक्तीची मन:स्थिती, भावना ओळखणं, आणि आपल्याला ती कळली आहे हे तिच्यापर्यंत पोहोचवणं, म्हणजे एम्पथी.. एम्पथी शब्दातून, कृतीतून अगदी एखाद्या स्पर्शातूनही व्यक्त होते. एक प्रकारे हा भावनेला दिलेला प्रतिसाद असतो. एखाद्या व्यक्तीबरोबर मतभेद आहेत, पण तिचं सहकार्यही मिळवायचं आहे, अशा परिस्थितीत एम्पथीला पर्याय नाही. पालक म्हणून तर अशा वेळा आपल्या समोर ठायी ठायी येत असतात.
पालकत्वावर लिहिणारी, बोलणारी, अधिकारी माणसं, शिक्षक, समुपदेशक अशी अनेक मंडळी मुलांना ‘समजून घेणं’ याबद्दल नेहमी बोलत असतात. पण समजून घ्यायचं म्हणजे ‘नेमकं काय करायचं’ हे फार थोडय़ा वेळा सांगितलं जातं. मुलाचा आनंद वाटून घेताना समजून घेणं तसं सोपं असतं. पण मुलाला वाईट वाटतं, तेव्हा या समजून घेण्याची खरी कसोटी लागते.
आपण एक उदाहरण पाहू. अगदी तीन-चार वर्षांच्या मुलाचं आवडतं खेळणं तुटतं. मूल रडून गोंधळ घालतं. अशा वेळी त्याचं लक्ष दुसरीकडे वळवायचे नाना प्रयत्न केले जातात. तसंच दुसरं खेळणं आणून द्यायचं प्रॉमिस केलं जातं. तेव्हढय़ानेही भागत नाही म्हटल्यावर आणखी चांगलं, आणखी महागडं खेळणं आणून द्यायचा वादा होतो. तरीही अनेकदा मूल रडतच राहातं.
अशा वेळी मुलाला वाईट वाटतं म्हणून त्या खेळण्याच्या जागी तसंच दुसरं खेळणं आणून दिल्याने ‘आपण मुलाला समजून घेतो’, असं अनेक आईबाबांना वाटतं पण आपण समजून घेतलंय असं मुलाला वाटत असेल, तर त्याची प्रतिक्रिया वेगळी असायला हवी. तशी ती नसेल तर या समजून घेणं प्रकारात काहीतरी चुकतं आहे जरूर.

काय होतं असावं इथे?
मुळात मुलाला वाईट तर वाटलं आहे. पण त्याला वाईट वाटलेलं आईबाबांना सहन होत नाहीय, आवडत नाहीय, असा काहीसा अर्थ मूल लावतं. म्हणूनच तर आईबाबा त्याला वेगवेगळे पर्याय सुचवताहेत ना, जेणेकरून ते लवकरात लवकर त्या मूडमधून बाहेर येईल . इथे मुळात आपल्या मुलाला दुख झालेलं आपल्याच्याने पाहावत नाही, ही गोष्ट आघाडीवर (फोरफ्रंट) येते. आणि ‘मुलाला वाईट वाटलं आहे’, हे मागं पडतं. साहजिकच अगदी लहान मुलालाही खेळणं तुटल्याचं वाईट तर वाटत असतंच, पण आपल्याला काय वाटतं आहे हे कुणी समजून घेत नाही, यानं मुलाला आणखीनच वाईट वाटायला लागतं.
एखाद्या स्पध्रेत, खेळात किंवा परीक्षेत अपेक्षेइतकं यश नाही मिळत, आणि मूल घरी येतं, तेव्हा काय होतं? सांत्वनाचं, उपदेशाचं किंवा तथाकथित प्रोत्साहनपर असं काहीसं मुलाशी बोललं जातं. काही वानग्या पाहू.. ‘इतकं कशाला वाईट वाटून घेतोस? तुझेच प्रयत्न कमी पडले असतील. आणखी प्रयत्न केलेस तर पुढच्या वेळेस नक्की यश मिळवशील’. ‘आमच्यासाठी तर तू भाग घेतलास हेच महत्त्वाचं आहे. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे..’ पिढ्यान्पिढय़ा चालत आलेले हे संवाद आहेत. या सगळ्यात ‘मुलाला वाईट वाटलं आहे’ याची ‘दखलही’ घेतली जात नाही. अपयशापेक्षाही मूल या गोष्टीने जास्त हताश होऊ शकतं. रिअ‍ॅलिटी शोमध्ये भाग घेतलेल्या मुलांसाठी तर स्पध्रेतून बाहेर पडणं परवडलं पण हे उपदेश, संदेश नको- इतकं त्यांचं स्वरूप मुलांची मूळ भावना नाकारणारं असतं.
मुळात नकारात्मक भावना नसतील तर चांगलं, असं आपल्या सगळ्यांनाच वाटत असतं. मुलांच्या बाबतीत पालक म्हणून आपण सगळेच संरक्षक असतो. त्यांना जास्तीत जास्त सुख, समाधान मिळावं म्हणून झटत असतो. पालकत्वाचा हा महत्त्वाचा भाग आहे. पण म्हणून दुख, अपयश समोर आलं तर त्याला झटकणं किंवा पळवून लावणं हा उपाय नाही होऊ शकत. अपयशातून येणारे दुख, निराशा आणि इतर अनेक अन्कम्फर्टेबल भावनाही आपल्या जगण्याचा महत्त्वाचा भाग आहेत. त्यांना योग्य न्याय द्यावा लागतो. त्यांची अपरिहार्यता स्वीकारावी लागते. तो स्वीकार आपण किती लीलया, छानपणे जगण्याच्या ओघात करतो, यातून आपली मुलंही खूप शिकतात.
म्हणून मुलांच्या भावना ओळखून प्रतिसाद देतानाची पहिली पायरी म्हणजे, या अशा भावना मुळात ‘आपल्यालाच नकोशा आहेत का’ हे तपासून पाहणं.

Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Tuberculosis awareness campaign for 100 days in Nashik district
नाशिक : जिल्ह्यात शंभर दिवसांसाठी क्षयरोग जागृती मोहीम
Uber driver gets review as a good kisser from customer post viral on social Media
“चांगला किस करणारा”, ड्रायव्हरचा असा रिव्ह्यू तुम्ही कधीच ऐकला नसेल, ‘या’ व्हायरल पोस्टमध्ये नेमकं आहे तरी काय
loksatta readers response
लोकमानस : हे केवळ चुकांवर पांघरूण
brain rot disease loksatta news
विश्लेषण : ‘ब्रेन रॉट’ यंदाचा ऑक्सफर्ड शब्द मानकरी! पण ही अवस्था नक्की काय असते? हा चिंताजनक विकार का?
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?
when Amol Palekar slapped Smita Patil without her consent
“मी तिला झापड मारली”, अमोल पालेकरांनी सांगितला स्मिता पाटील यांना न सांगता केलेल्या सीनचा प्रसंग; म्हणाले “ती संतापली होती”

खेळणं तुटलेल्या मुलाला आपल्याला कसा प्रतिसाद देता येईल?
‘वाईट वाटलं ना खूप !’ मुलाला वाईट वाटलं आहे हे आपल्याला कळलं आहे – हे या एका वाक्यातून मुलापर्यंत पोहोचतं. आणि आपल्याला ते खरोखरीच उमगलेलं असेल, तर आपली देहबोली (बॉडी लँग्वेज ), आवाजाचा टोन या सगळ्यातून मुलाला एक दिलासा मिळतो. मुलाचीही देहबोली त्यामुळे बदलते. मुलासाठी ते खेळणं किती महत्त्वाचं होतं याबद्दलही थोडंसं बोलता येतं.
‘खूप खेळलास ना त्याने. किती मजा केली आपण सगळ्यांनी त्याच्याबरोबर. आपल्याबरोबर सुट्टीत आजीकडे पण न्यायचो ना आपण त्याला.’
अपेक्षेइतकं यश न मिळवू शकलेल्या मुलालाही ‘प्रयत्न तर चोख केले होतेस. प्रॅक्टिसही मनापासून केली होतीस. गेले काही दिवस तू खूप गोष्टी मॅनेज केल्या होत्यास’, हे कोणीतरी म्हटलं की ‘त्याने केलेल्या’ प्रयत्नांची दखल घेतल्यासारखं वाटतं. त्याक्षणी त्याला तेवढंच हवं असतं. त्याला प्रोत्साहनाचे चार शब्द सांगायला, नवी उमेद द्यायला पुढचा खूप काळ आपल्या हाताशी असतो. खरं तर अशा समजून घेण्यातून मुलाला आपोआपच ते नवं बळ मिळतं. एम्पथीची खरी ताकद
हीच आहे.
एम्पथीची- भावनांच्या साद-प्रतिसादाची ही भाषा. आपण ही बोलायला लागलो की त्याच्या ताकदीचे आणखी आणखी पलू आपल्याला उमगू लागतात. पालक म्हणून आपल्याला नवं वेगळं बळ, वेगळा विश्वास देतात. मुलांबरोबरचा आपला प्रवासही मग आगळावेगळाच होऊन जातो. आणि त्यातलं समाधानही अर्थात अनन्यच.
mithila.dalvi@gmail.com

Story img Loader