एखाद्या व्यक्तीची मन:स्थिती, भावना ओळखणं, आणि आपल्याला ती कळली आहे हे तिच्यापर्यंत पोहोचवणं, म्हणजे एम्पथी.. एम्पथी शब्दातून, कृतीतून अगदी एखाद्या स्पर्शातूनही व्यक्त होते. एक प्रकारे हा भावनेला दिलेला प्रतिसाद असतो. एखाद्या व्यक्तीबरोबर मतभेद आहेत, पण तिचं सहकार्यही मिळवायचं आहे, अशा परिस्थितीत एम्पथीला पर्याय नाही. पालक म्हणून तर अशा वेळा आपल्या समोर ठायी ठायी येत असतात.
पालकत्वावर लिहिणारी, बोलणारी, अधिकारी माणसं, शिक्षक, समुपदेशक अशी अनेक मंडळी मुलांना ‘समजून घेणं’ याबद्दल नेहमी बोलत असतात. पण समजून घ्यायचं म्हणजे ‘नेमकं काय करायचं’ हे फार थोडय़ा वेळा सांगितलं जातं. मुलाचा आनंद वाटून घेताना समजून घेणं तसं सोपं असतं. पण मुलाला वाईट वाटतं, तेव्हा या समजून घेण्याची खरी कसोटी लागते.
आपण एक उदाहरण पाहू. अगदी तीन-चार वर्षांच्या मुलाचं आवडतं खेळणं तुटतं. मूल रडून गोंधळ घालतं. अशा वेळी त्याचं लक्ष दुसरीकडे वळवायचे नाना प्रयत्न केले जातात. तसंच दुसरं खेळणं आणून द्यायचं प्रॉमिस केलं जातं. तेव्हढय़ानेही भागत नाही म्हटल्यावर आणखी चांगलं, आणखी महागडं खेळणं आणून द्यायचा वादा होतो. तरीही अनेकदा मूल रडतच राहातं.
अशा वेळी मुलाला वाईट वाटतं म्हणून त्या खेळण्याच्या जागी तसंच दुसरं खेळणं आणून दिल्याने ‘आपण मुलाला समजून घेतो’, असं अनेक आईबाबांना वाटतं पण आपण समजून घेतलंय असं मुलाला वाटत असेल, तर त्याची प्रतिक्रिया वेगळी असायला हवी. तशी ती नसेल तर या समजून घेणं प्रकारात काहीतरी चुकतं आहे जरूर.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा