उच्च शिक्षणासाठी परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. परदेशी विद्यापीठांमधील प्रवेशासाठी काही प्रवेशपरीक्षांमध्ये यश संपादन करणे अनिवार्य असते. अशा काही प्रवेशपरीक्षांची तोंडओळख-
टोफेल (Test of English as a Foreign Language)
अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी जीआरई किंवा जीमॅटसहित द्यावी लागणारी टोफेल ही इंग्रजीची परीक्षा आहे. ज्या विद्यार्थ्यांची मातृभाषा इंग्रजी नाही अशा विद्यार्थ्यांना टोफेल ही परीक्षा उत्तम गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. जीआरई व सॅटसारखी टोफेल ही परीक्षासुद्धा अमेरिकेतील ‘एज्युकेशनल टेिस्टग सíव्हस’ या संस्थेद्वारे घेतली जाते. टोफेल ही इंटरनेट आधारित परीक्षा (iBT-internet Based test) आहे, म्हणून बऱ्याचदा टोफेल परीक्षेचा उल्लेख TOEFL-iBT असाही केला जातो. मात्र, अद्यापही ही परीक्षा लिखित स्वरूपातही
घेतली जाते. टोफेल ही इंग्रजीची परीक्षा असल्याने तुलनेने जीआरई व जीमॅटपेक्षा सोपी असते. टोफेल परीक्षेचे चार विभाग असतात. प्रत्येक विभागाला ३० गुण आहेत. म्हणजेच एकूण टोफेल ही १२० गुणांची परीक्षा असते.
* वाचन – या विभागात चार ते सहा उतारे असतात व त्यावर १२-१४ विचारलेले प्रश्न असतात. हे उतारे शैक्षणिक विषयांवर आधारित असतात. साधारणपणे कारण-परिणाम किंवा तुलनात्मक विरोधाभास यांसारख्या बाबींची समज असल्यास हे उतारे परीक्षार्थी सहज सोडवू शकतो. या विभागासाठी एकूण वेळ ६०-१०० मिनिटांचा असतो. त्याचे गुणांकन ०-३० या पातळीत केले जाते.
* श्रवण- या विभागामध्ये एकूण सहा ते नऊ उतारे असतात, ज्यात प्रत्येकी पाच ते सहा प्रश्न असतात. या विभागासाठी एक ते दीड तास एवढा वेळ असतो. वरील दोन्ही विभागानंतर मात्र १० मिनिटांचा विराम असतो.
* वक्तृत्त्व- या विभागामध्ये एकूण सहा प्रश्न असतात आणि परीक्षार्थीला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी इंग्रजी बोलण्याची सवय असणे आवश्यक आहे. या सहा प्रश्नांची उत्तरे बोलण्यासाठी २० मिनिटांचा वेळ असतो.
* लेखन- या विभागामध्ये एकूण दोन प्रश्न असतात. एका प्रश्नामध्ये दिलेल्या विषयावर स्वत:ची मते व्यक्त करणारे निबंधलेखन करायचे असते आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये एक संवाद ऐकून त्यावर आधारित लेखन करणे आवश्यक आहे. या विभागासाठी ५० मिनिटांचा अवधी असतो. या विभागाचेही गुणांकन ०-३० या पातळीत केले जाते.
* टोफेल परीक्षेचा एकूण कालावधी सव्वातीन ते सव्वाचार तासांचा असतो. या परीक्षेचे गुणांकन दोन वर्षांसाठी वैध असते. परीक्षार्थी एका वर्षांत टोफेल- आयबीटी ही परीक्षा कितीही वेळा देऊ शकतो, मात्र दोन परीक्षांमध्ये किमान १२ दिवसांचे अंतर असणे गरजेचे आहे. या परीक्षेचे एकूण शुल्क १६० ते २५० अमेरिकी डॉलरच्या दरम्यान आहे. जगभरातील १६५ देशांमध्ये या परीक्षेची साडेचार हजारपेक्षाही जास्त परीक्षा केंद्रे आहेत.
सॅट (SAT)
ही परीक्षादेखील ‘एज्युकेशनल टेिस्टग सíव्हस’ (एळर) या संस्थेकडून घेतली जाते. आपल्याकडील उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. अमेरिकेतील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी ही परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या परीक्षेत गणित, इंग्रजी व विश्लेषणात्मक लेखन तपासले जाते. परीक्षेचे एकूण गुणांकन ६००-२४०० गुणांच्या पातळीत केले जाते. सॅट परीक्षेचे प्रामुख्याने खालीलप्रमाणे तीन विभाग आहेत-
* परीक्षणात्मक इंग्रजी वाचन- या विभागामध्ये तीन उपविभाग असून त्यात विविध प्रकारचे प्रश्न असतात. या उपविभागाला साधारणपणे २५ मिनिटांचा कालावधी असतो.
* गणित- गणित विभागातही इंग्रजीसारखे उपविभाग असतात.
* विश्लेषणात्मक इंग्रजी लेखन – या विभागात निबंध लेखन व इतर विविध प्रकारचे विश्लेषणात्मक लेखन अपेक्षित आहे.
* सॅट परीक्षेचा एकूण कालावधी जीआरईसारखाच पावणेचार तासांचा आहे.
* सॅटचे गुणांकन पाच वर्षांसाठी वैध असते. परीक्षार्थी सॅट परीक्षा एका वर्षांत सात वेळा देऊ शकतो. २०१६ मध्ये मात्र या परीक्षेचे स्वरूप बदलणार आहे.
* या परीक्षेचे एकूण शुल्क परीक्षार्थीच्या नागरिकत्वावर अवलंबून आहे. भारतीय परीक्षार्थीना हे शुल्क १०० अमेरिकी डॉलर आहे.
आयइएलटीएस (International English Language Testing System)
टोफेलसारखीच कएछळर ही इंग्रजीची परीक्षा आहे. आयइएलटीएस आणि टोफेल या दोन्ही परीक्षांमध्ये बरेच साम्य आहे. मात्र टोफेल परीक्षेला पर्याय म्हणून अनेकदा आयइएलटीएसकडे पाहिले जाते. युरोपातील अनेक देशांमध्ये आयइएलटीएसचे गुण स्वीकारले जातात, पण अमेरिकेमध्ये मात्र आयइएलटीएसपेक्षा टोफेल परीक्षेलाच जास्त पसंती दिली जाते. परदेशातील पदव्युत्तर प्रवेशासाठी टोफेलसारखीच आयइएलटीएस परीक्षा ज्या विद्यार्थ्यांची मातृभाषा इंग्रजी नाही (Non-native English Speakers) अशा विद्यार्थ्यांना देणे गरजेचे आहे. आयइएलटीएसमध्ये टोफेलसारखेच वाचन, श्रवण, वकृत्त्व आणि लेखन हे चार विभाग आहेत. या विभागांच्या परीक्षाही टोफेलसारख्याच असतात. इथे गुणांच्याऐवजी या विभागांचे मूल्यांकन बँडस्च्या आधारावर केले जाते. हे बँडस् ०-९ या दरम्यान दिले जातात. आयइएलटीएससाठी एकूण तीन तासांचा वेळ असतो. या परीक्षेचे गुणांकन दोन वर्षांसाठी वैध असते. परीक्षार्थी एका वर्षांत ही परीक्षा कितीही वेळा देऊ शकतो. या परीक्षेचे शुल्क १६५ अमेरिकी डॉलर आहे.
GMAT (Graduate Management Admission Test)
जीमॅट ही उद्योग व व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असणारी परीक्षा आहे. ही परीक्षा GMAC (Graduate Management Admission Council) या संस्थेतर्फे घेतली जाते. जगभरातील सुमारे ११४ देशांमध्ये जीमॅट परीक्षा केंद्रे आहेत. जीमॅटबद्दल विद्यार्थ्यांमध्ये असलेला गरसमज म्हणजे उद्योजकीय कौशल्ये व निर्णयक्षमता यांचे पृथ:करण जीमॅट परीक्षेतून केले जाते. प्रत्यक्षात मात्र, या परीक्षेत संख्यात्मक व विश्लेषणात्मक कौशल्य, इंग्रजीचे ज्ञान तपासले जाते. ही परीक्षा संगणकाच्या सहाय्याने देता येते. जीआरई आणि जीमॅट परीक्षांमध्ये काही विभाग समान आहेत, मात्र त्यांचे गुणांकन आणि उपलब्ध वेळ यामध्ये फरक आहे.
या परीक्षेचे प्रमुख चार विभाग आहेत-
* विश्लेषणात्मक लेखनकौशल्य- जीमॅट परीक्षेतील या विभागात जीआरईप्रमाणे परीक्षार्थीचे विश्लेषणात्मक कौशल्य तपासले जाते. इथे हे विश्लेषण मात्र युक्तिवादाचे असते. या विभागात एकच प्रश्न असतो व त्यासाठी अध्र्या तासाचा वेळ असतो. या विभागाचे गुणांकन जीआरईसारखेच ०-६ या पातळीत केले जाते. त्यामध्ये अध्र्या गुणाची वाढ होऊ शकते.
* गणिती क्षमता- या विभागात संख्यात्मक ज्ञान, गणित व भूमिती या विषयांचे प्रश्न असतात. विभागात सर्व मिळून ३७ प्रश्न असतात
व एकूण वेळ ७५ मिनिटांचा असतो. या विभागाचे गुणांकन ०-६० गुणांच्या पातळीवर केले जाते.
* इंटिग्रेटेड रिझनिंग- जीमॅट परीक्षेत २०१२ मध्ये हा विभाग समाविष्ट करण्यात आला. या विभागात एकूण १२ प्रश्न असतात. त्यासाठी अध्र्या तासाचा वेळ असतो. याचे गुणांकन १-८ या पातळीत असते.
* भाषाविषयक क्षमता- या विभागात ४१ प्रश्न असतात. इंग्रजी वाचन व त्यावर आधारित प्रश्न, परीक्षणात्मक लेखन असे या विभागातील प्रश्नांचे साधारण स्वरूप असते. या विभागासाठी ७५ मिनिटांचा वेळ असतो. या विभागाचे गुणांकन ०-६० च्या पातळीत केले जाते.
* जीमॅट परीक्षा साडेतीन तासांची असते. परीक्षेदरम्यान अध्र्या तासाची सुट्टी दिली जाते. जीमॅटचे गुणांकन पाच वर्षांसाठी वैध असते. परीक्षार्थी जीमॅट परीक्षा एका वर्षांत कितीही वेळा देऊ शकतो. या परीक्षेचे एकूण शुल्क २५० अमेरिकी डॉलर आहे.
जीआरई (Graduate Records Exam)
अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये (Graduate Schools) पदव्युत्तर व पीएच.डीच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी जीआरई ही प्रमाणित केलेली परीक्षा आहे. अमेरिकेतील ‘एज्युकेशनल टेस्टिंग सíव्हस’ या संस्थेतर्फे ही परीक्षा घेतली जाते. अमेरिकेमध्ये (तसेच काही इतर देशांमध्येही) व्यवस्थापना- व्यतिरिक्त सर्व विद्याशाखांमधील प्रत्येक विषयाच्या पदव्युत्तर व पीएच.डीच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही एकच परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेच्या माध्यमातून परीक्षार्थीचे विश्लेषणात्मक कौशल्य, इंग्रजीवरील प्रभुत्व व संख्यात्मक क्षमता जाणून घेतली जाते. ही परीक्षा संगणकाच्या साहाय्याने देता येते. मात्र, ज्या ठिकाणी संगणक उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी ती लिखित स्वरूपातदेखील देता येते. या परीक्षेचे तीन प्रमुख भाग आहेत-
* इंग्रजीचे ज्ञान – या विभागात परीक्षार्थीचे इंग्रजीवरील प्रभुत्व जाणून घेतले जाते. हा विभाग दोन उपविभागांमध्ये विभागला गेला आहे. या प्रत्येक उपविभागात २० प्रश्न असतात. ते सोडवण्यासाठी अध्र्या तासाचा वेळ असतो. साधारणपणे प्रश्न विविध शब्दांमधील सहसंबंध अशा स्वरूपाचे असतात. जीआरईची गुणांकन पद्धत खूप वेगळी आहे. या विभागासाठी किमान १३० तर कमाल १७० गुण असतात. त्या दरम्यान, एकेका गुणाची वाढ होऊ शकते.
* गणिती क्षमता – या विभागात परीक्षार्थीची गणित- भूमितीतील समज जाणून घेतली जाते. हा विभागही दोन उपविभागांमध्ये विभागला गेला आहे. इथेही प्रत्येक उपविभागात २० प्रश्न असतात. त्यासाठी ३५ मिनिटे वेळ असतो. या विभागाचे गुणांकन १३०-१७० च्या पातळीत केले जाते.
* विश्लेषणात्मक लेखन- या विभागात फक्त दोन प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नासाठी अध्र्या तासाचा वेळ असतो. या विभागाचे गुणांकन ०-६ च्या स्तरावर केले जाते. त्यामध्ये अध्र्या गुणाची वाढ होऊ शकते.
* कालावधी – या परीक्षेचा कालावधी एकूण पावणेचार तासांचा आहे. जीआरईचे गुणांकन एकूण पाच वर्षांसाठी वैध असते. जीआरई परीक्षेचे एकूण शुल्क १९५ अमेरिकी डॉलर आहे. परीक्षार्थी संगणकावरील आधारित जीआरई परीक्षा एका वर्षांत कितीही वेळा देऊ शकतो. मात्र सलग दोन परीक्षांमध्ये किमान २१ दिवसांचे अंतर असावे. लिखित जीआरई परीक्षा मात्र
वर्षभरातून तीनदा- ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि फेब्रुवारी या महिन्यांत देता येतात. परीक्षेचा निकाल परीक्षेनंतर लगेचच समोर दिसतो. अधिकृतरीत्या मात्र तो १५ ते २० दिवसांत परीक्षार्थीने दिलेल्या पत्त्यावर येतो. त्यानंतर जीआरईचे गुण थेट विद्यापीठाला न कळवता एळर मार्फत कळवावे लागतात.
हे लक्षात घ्या..
* जीआरई परीक्षेसाठी ओळखपत्र म्हणून पासपोर्ट असणे गरजेचे आहे. पासपोर्ट व्यतिरिक्त दुसरे कोणतेही ओळखपत्र स्वीकारले जात नाही. परीक्षेआधी किमान चार दिवस अर्जदार जीआरईची नोंदणी रद्द करू शकतो. क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरून अर्जदाराला जीआरईची नोंदणी करता येते.
* वरील परीक्षा घेणाऱ्या सर्व संस्था स्वत:च या परीक्षांच्या तयारीचे व्यवस्थापन करतात. परीक्षांच्या तयारीसाठी या संस्थांकडे पुस्तकांपासून सॉफ्टवेअपर्यंत विविध शैक्षणिक उत्पादने असतात. उदा. इटीएस जीआरईच्या तयारीसाठी अधिकृत पॉवरप्रेप नावाचे सॉफ्टवेअर बनवते.
महत्त्वाचे संदर्भ
http://www.ets.org/gre
http://www.mba.com
http://www.ets.org/toefl
http://www.ielts.org
sat.collegeboard.org
http://www.ets.org