इंटरनेटचा अधिकाधिक वापर हा गतिमान आणि पारदर्शक सेवांसाठी आवश्यक आहे. यामुळे माहितीच्या देवाणघेवाणीला वेग आला आहे. ज्ञानप्राप्ती, विकास व प्रगतीसाठी नवे प्रभावी माध्यम उपलब्ध झाले आहे. पण त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञान यंत्रणेवर हल्ला करून या यंत्रणेत बिघाड करण्याच्या प्रमाणातही वाढ होत आहे.
यंत्रणेत दोष निर्माण करून माहिती पळवणे, माहिती नष्ट करणे, माहितीची मोडतोड करणे आदी घातक गोष्टी घडताना दिसतात. विशेषत: आíथक गुन्ह्यात मोठी वाढ झालेली दिसते. आगामी काळात बँकिंग
आणि इतर वित्तीय व्यवहार इंटरनेटच्या माध्यमातून अधिकाधिक होणार असल्याने सायबर गुन्ह्याची संभाव्यताही वाढली आहे. तांत्रिकदृष्टय़ा हुशारीने गुन्हा करण्याच्या या कार्यपद्धतीला वैशिष्टय़पूर्णरीत्या तोंड देणे गरजेचे आहे.
या अनुषंगाने सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग या संस्थेने एथिकल हॅकिंग अॅण्ड इन्फम्रेशन सिक्युरिटी हा अल्पावधीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमात सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही आवश्यक कौशल्यांचे आणि तंत्रांचे प्रशिक्षण दिले जाते.
या अभ्यासक्रमाचा कालावधी ३२० तासांचा असून या अभ्यासक्रमाला कोणत्याही अभियांत्रिकी किंवा विज्ञान शाखेतील पदवीधर प्रवेश घेऊ शकतो. संबंधित विद्यार्थ्यांने बारावीपर्यंत गणिताचा अभ्यास करणे आवश्यक आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांला संगणकाचे उत्तम ज्ञान हवे.
पत्ता- सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (सी-डॅक), अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग ट्रेिनग सेंटर स्कूल. हेड क्वार्टर, तिसरा मजला,
आरएएमझेड वेस्ट एण्ड सेंटर,
औंध, पुणे- ४११००७.
वेबसाइट- acts.cads.in
ईमेल- acts@cdac.in