अलीकडे इव्हेन्ट मॅनेजमेंट क्षेत्राला चांगली मागणी असून कार्यरत असलेल्या व्यक्तींना कामाच्या उत्तम संधी उपलब्ध होत आहेत. या क्षेत्रासंबंधीचे अभ्यासक्रम आणि त्यातील संधींची ओळख
अलीकडे एखादे सेलिब्रेशन करण्यासाठी कुठलेही निमित्त पुरते. निमित्त मिळाले की सेलिब्रेशनची जय्यत तयारी केली जाते. सोहळा नीटनेटका, देखणा, हटके व्हावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यासाठी विविध गोष्टींचा वापर केला जातो. सध्या त्यासाठी तज्ज्ञांचे साहाय्य घेण्याकडे अधिकाधिक कल वाढत आहे.
काही वर्षांपूर्वी जेव्हा सामूहिक पातळीवर आणि मोठय़ा स्वरूपात एखाद्या सोहळ्याचे आयोजन केले जायचे, तेव्हाच फक्त त्या कार्यक्रमाच्या व्यवस्थापनासाठी इव्हेन्ट्स व्यवस्थापकांना पाचारण केले जायचे. आता मात्र, व्यक्तिगत पातळीवरील लग्न- वाढदिवस- एखादे यश साजरे करण्यासाठीही इव्हेन्ट्स आयोजकांना आमंत्रण दिले जाते. या निमित्ताने इव्हेन्ट मॅनेजमेन्ट या क्षेत्रात करिअर किंवा व्यवसाय करण्याची नवी संधी उपलब्ध झाली आहे.
या क्षेत्रात कोणालाही आपला झेंडा रोवता येऊ शकतो. साधारणत: वेगळे काही करू इच्छिणाऱ्या आणि सृजनशील असणाऱ्या तरुण-तरुणींना या क्षेत्रात उत्तम वाव मिळू शकतो. त्यासाठी या विषयीचे काही अभ्यासक्रम पूर्ण केल्यास इव्हेन्ट्स साजरा करण्याचे सिद्धांत आणि कार्यपद्धतींची माहिती होऊ शकेल.
हे अभ्यासक्रम दहावी उत्तीर्ण आणि बारावी उत्तीर्ण व्यक्ती करू शकतात. हे अभ्यासक्रम वेगवेगळ्या मुदतीचे- अंशकालीन, सहा महिने, एक वर्ष कालावधीचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमांद्वारे या क्षेत्रासंबंधीचा पाया पक्का होत असला तरी अधिकाधिक अनुभवानंतरच यासंबंधीच्या व्यवस्थापनात पारंगत होता येईल. त्यातूनच ही कला विकसित करण्याची आणि प्रसंगानुरूप नवे काहीतरी करून दाखवण्याची क्षमता वाढू शकेल.
व्यक्तिगत ग्राहक अथवा कंपन्या, उद्योगांना अशा इव्हेन्ट्स व्यवस्थापकांची गरज भासते. शिवाय उत्तम कामांची प्रसिद्धी हस्ते-परहस्ते होऊन काम मिळण्याची साखळी निर्माण होते.
करिअरच्या संधी
इव्हेन्ट मॅनेजमेंट अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पुढीलप्रमाणे संधी उपलब्ध होऊ शकतात- इव्हेन्ट मॅनेजमेन्ट कंपनी, फॅशन हाऊस, मार्केटिंग कंपन्या, म्युझिक कंपन्या, दूरचित्रवाणी वाहिन्या, चित्रपट-मालिका निर्मात्या कंपन्या, शॉिपग मॉल्स, सुपर मार्केट्स, रेडिओ स्टेशन्स, तारांकित हॉटेल्स, रिसॉर्ट्स, क्लब, स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपन्या, सुपर स्पेश्ॉलिटी हॉस्पिटल्स, ट्रॅव्हल अॅण्ड टुरिझम कंपन्या, शिक्षण संस्था, मीडिया-पब्लिकेशन्स, जनसंपर्क संस्था, वर्तमानपत्रे, कॉर्पोरेट हाऊसेस.
शिक्षण-प्रशिक्षण संस्था
नॅशनल अॅकॅडमी ऑफ इव्हेन्ट मॅनेजमेन्ट अॅण्ड डेव्हलपमेन्ट.
आर .एस. कॅम्पस, बजाज हॉल, एस.व्ही.रोड, मालाड (पश्चिम),
मुंबई- ४०००६४.
वेबसाइट-www.naemd.com
ई-मेल- mumbai@naemd.com
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इव्हेन्ट मॅनेजमेंट. तळमजला, नंदनवन बििल्डग, कॉर्नर ऑफ वल्लभभाई रोड अॅण्ड अन्सारी रोड, विलेपाल्रे (पश्चिम),
मुंबई-४०००५६.
वेबसाइट-www.niemindia.com
ई-मेल-support@neimindia