करिअरची निवड प्रामुख्याने, त्या त्या करिअर क्षेत्रातील नोकरीच्या संधींची किंवा आर्थिक लाभाची शक्याशक्यता पडताळत केली जाते. हे नक्की की, करिअर निवडताना, व्यक्तिगत स्वभावानुसार करिअर निवडणाऱ्यांची संख्या तशी कमीच आहे. मात्र, जर व्यक्तिमत्त्वाला अनुसरून करिअरची निवड केली तर व्यक्तीची कामातील प्रगती वेगाने होते आणि ती व्यक्ती आपल्या कामाबाबत अधिक समाधानी राहते. कर्मचाऱ्यांची निवड, कामाचे स्वरूप आणि उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व यांचा मेळ साधला गेला तर कर्मचाऱ्यांचे दैनंदिन कामकाज अधिक सुरळीतपणे होते, असे विविध मानसशास्त्रीय सर्वेक्षणातून सिद्ध झाले आहे.
व्यक्तिमत्त्वाची जडणघडण ही व्यक्तीची मानसिकता, पालनपोषण, भोवतालची सामाजिक, आíथक, राजकीय व्यवस्था, शिक्षण, कार्यानुभव यांसारख्या अनेक गोष्टींवर अवलंबून असते. मानसशास्त्रीय अभ्यासकांच्या मते, नवनवीन गोष्टी अनुभवण्याची तयारी, प्रतिकूल परिस्थितीशी सामना करण्याची महत्त्वाकांक्षा, प्राप्त परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, (सकारात्मक/ नकारात्मक) परिस्थितीशी जुळवून घेण्याची तयारी, परोपकारी मनोवृत्ती, मनाविरुद्ध घडणाऱ्या घटनांना प्रतिसाद देण्याची पद्धत, व्यक्तिगत आवडीनिवडी, सवयी, छंद, वर्तणूक अशा विविध निकषांच्या आधारे व्यक्तिमत्त्वाचे ढोबळमानाने १६ प्रकार होतात.
व्यक्तिमत्त्वाच्या या विविध प्रकारांचा वेगवेगळ्या करिअर क्षेत्रांसाठी उपयोग करणे शक्य असते. कोणताही शैक्षणिक अभ्यासक्रम निवडण्यापूर्वी, जर डोळसपणे स्वत:चे व्यक्तिमत्त्व पारखता आले तर आपल्याला भावणाऱ्या करिअरसाठी योग्य शिक्षणक्रम निवडणे सोपे होते आणि अर्थातच निवडलेल्या करिअर क्षेत्रात यशस्वी होण्याचा मार्गही आपोआप सुकर होतो.
व्यक्तिमत्त्व आणि त्याला अनुकूल ठरणाऱ्या करिअर क्षेत्रांचा घेतलेला धांडोळा-
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा