studyअभ्यास खूप वेळ जरी केला, पण तो करताना चित्त थाऱ्यावर नसले तर त्याचा काय उपयोग? अनेक मुलांना अभ्यास करतेवेळी ही समस्या जाणवते. अनेकांच्या परीक्षेतील अपयशाचे कारणही एकाग्रतेचा अभाव हेच असते..
लक्ष एकाग्र होत नसेल वा केलेल्या अभ्यासाचे विस्मरण होत असेल तर त्यामागची कारणं समजायला हवीत. त्या कारणांचा विचार शांतपणे करायला हवा म्हणजे त्यावर उपाय शोधणे शक्य होईल. अभ्यास करताना एकाग्रता न साधण्यामागची अनेक कारणं असू शकतात. ती पुढीलप्रमाणे आहेत-
* जो अभ्यास मी करतोय तो मला आवडत नाही.
* करत असलेल्या अभ्यासाचं महत्त्व माझ्या लक्षात येत नाही.
* हा अभ्यास पूर्ण झाला, अर्धवट राहिला, त्यात चुका झाल्या तर त्याचे काय परिणाम होतील हे मला समजत नाही.
* मला हा अभ्यास चांगल्या रीतीने करायचा आहे, पण तो नेमका कसा करावा याचं मार्गदर्शन करणारं भोवताली कोणी नाही.
काहीवेळा अभ्यास करताना मुलांचं त्यात लक्ष लागत नाही. याचीही काही कारणं असतात-
* त्यातील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अंत:प्रेरणा कमी पडणं आणि नको त्या गोष्टींची डोक्यात होणारी गर्दी अथवा गुंता हा अभ्यासात व्यत्यय आणतो.
* बरेचवेळा घरी, मित्रमैत्रिणींबरोबर झालेली वादावादी, भांडणं, समज-गैरसमज, मानापमान या सर्व गोष्टी वर्गात शिक्षक- प्राध्यापक शिकवत असताना किंवा अभ्यासाला बसल्यावर आठवू लागतात. ते टाळण्याकरता अशा नकारात्मक गोष्टींचा वेळीच निचरा व्हायला हवा. त्याकरता अशी घटना घडल्यानंतरच मनात साचलेल्या गोष्टी जवळच्या व्यक्तींशी शेअर करायला हव्यात अथवा समोरच्या व्यक्तीची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. मात्र, अभ्यासाला बसल्यानंतर अशा गोष्टींचा विचार करणं शक्य तितकं टाळावं.

अभ्यासात एकाग्रता साधण्यासाठी..
अभ्यासाला बसण्यासाठी सकाळची वेळ उत्तम मानली जाते अथवा दिवसभरातील कुठल्या वेळी तुम्हाला अभ्यास करणं उत्तम ठरतं (प्राइम टाइम) हे लक्षात घेऊन अभ्यास करावा. मात्र हे लक्षात घ्या की, तुमची इच्छाशक्ती असली तर भर गर्दीच्या, गोंधळाच्या ठिकाणीही आपल्याला मन एकाग्र करता येणं शक्य आहे. कसे ते बघुयात..
* अभ्यास सुरू करण्याआधी थोडा वेळ शांत बसा. जो अभ्यास करायचा आहे, त्यासंबंधी विचार करा. खोलवर श्वास घ्या.
* ज्या गोष्टी तुम्हाला साध्य करायच्या आहेत त्या अपेक्षित गोष्टींबाबत मनाला सूचना करा. त्या सूचना ‘मला समजेल, जमेल’ अशा सकारात्मक असाव्यात. उदा. मी आता जो अभ्यास करतोय, तो मला नक्कीच नीट समजेल. त्यासाठी मी लक्ष देऊन तो अभ्यास करेन.
* मग जे वाचायचं, लिहायचं आहे त्याची मनात उजळणी करा. हाती घेतलेला अभ्यास कशा प्रकारे पूर्ण करणार आहात याचा आराखडा बनवा.
* अमूक इतका वेळ आपण अभ्यास करणार आहोत, हे मनाशी निश्चित करा.
* अभ्यासाला बसताना तुम्हाला ज्याच्यासारखं व्हायचंय अथवा जो तुमचा आदर्श आहे त्याचा विचार मनात आणा.
goreanuradha49@yahoo.in

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
education board warning against schools for obstructing students while filling exam application zws
परीक्षा अर्ज भरताना अडवणूक केल्यास शाळांवर कारवाई;  शिक्षण मंडळाचा इशारा
academic degree on experience
विश्लेषण : अनुभवाच्या आधारे पदवी कशी मिळणार?
NEET Postgraduate Exam Schedule Announced Wardha news
नीट पदव्युत्तर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; वैद्यक आयोग म्हणतो…
Ministry of Statistics report reveals 25 6 percent youth deprived of education employment and skills
आजचे तरुण ‘बिन’कामाचे आणि ‘ढ’?
brain rot disease loksatta news
विश्लेषण : ‘ब्रेन रॉट’ यंदाचा ऑक्सफर्ड शब्द मानकरी! पण ही अवस्था नक्की काय असते? हा चिंताजनक विकार का?
loksatta readers response loksatta news
लोकमानस : सत्यकथनासाठी निवृत्तीचा मुहूर्त
Story img Loader