लक्ष एकाग्र होत नसेल वा केलेल्या अभ्यासाचे विस्मरण होत असेल तर त्यामागची कारणं समजायला हवीत. त्या कारणांचा विचार शांतपणे करायला हवा म्हणजे त्यावर उपाय शोधणे शक्य होईल. अभ्यास करताना एकाग्रता न साधण्यामागची अनेक कारणं असू शकतात. ती पुढीलप्रमाणे आहेत-
* जो अभ्यास मी करतोय तो मला आवडत नाही.
* करत असलेल्या अभ्यासाचं महत्त्व माझ्या लक्षात येत नाही.
* हा अभ्यास पूर्ण झाला, अर्धवट राहिला, त्यात चुका झाल्या तर त्याचे काय परिणाम होतील हे मला समजत नाही.
* मला हा अभ्यास चांगल्या रीतीने करायचा आहे, पण तो नेमका कसा करावा याचं मार्गदर्शन करणारं भोवताली कोणी नाही.
काहीवेळा अभ्यास करताना मुलांचं त्यात लक्ष लागत नाही. याचीही काही कारणं असतात-
* त्यातील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अंत:प्रेरणा कमी पडणं आणि नको त्या गोष्टींची डोक्यात होणारी गर्दी अथवा गुंता हा अभ्यासात व्यत्यय आणतो.
* बरेचवेळा घरी, मित्रमैत्रिणींबरोबर झालेली वादावादी, भांडणं, समज-गैरसमज, मानापमान या सर्व गोष्टी वर्गात शिक्षक- प्राध्यापक शिकवत असताना किंवा अभ्यासाला बसल्यावर आठवू लागतात. ते टाळण्याकरता अशा नकारात्मक गोष्टींचा वेळीच निचरा व्हायला हवा. त्याकरता अशी घटना घडल्यानंतरच मनात साचलेल्या गोष्टी जवळच्या व्यक्तींशी शेअर करायला हव्यात अथवा समोरच्या व्यक्तीची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. मात्र, अभ्यासाला बसल्यानंतर अशा गोष्टींचा विचार करणं शक्य तितकं टाळावं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा