आपल्या व इतरांच्या भावनांबद्दल जागरूक असणं आणि स्वहित लक्षात घेत आपल्या भावनांवर नियंत्रण राखणं अथवा त्या योग्य प्रकारे व्यक्त करण्याची क्षमता म्हणजे भावनांक. कुठल्याही क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी आवश्यक ठरणारा हा घटक बुद्धय़ांकापेक्षा अधिक शक्तिशाली ठरत असतो. त्यावषियी..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
* कधी कधी आपल्या भावनांवर ताबा मिळवणं कठीण होऊन बसतं. भावनांचं प्रकटीकरण कधी योग्य ठरतं, तर कधी धोकादायक.
* रागाच्या भरात आपण इतरांना दुखावण्याची शक्यता अधिक असते. नोकरी- व्यवसायाच्या ठिकाणी यामुळे तुमच्या नोकरीवरही गदा येऊ शकते.
* सामान्यत: कुठल्याही निर्णयाला भावना आणि सारासार विचार या बाबी महत्त्वाच्या ठरतात. मात्र रागाच्या भरात आपण आपली ताíकक क्षमताच हरवून बसतो.
* महान तत्त्ववेत्ता अरिस्टॉटल याने म्हटलंय, संतापणं ही सोपी गोष्ट आहे. मात्र योग्य वेळी, योग्य प्रमाणात, योग्य कारणासाठी, योग्य पद्धतीनं आणि योग्य व्यक्तींवर संतापणं ही बाब सोपी नाही.
* आपल्या भावनाच आपली स्वप्नं आणि आपल्या महत्त्वाकांक्षा निश्चित करत असतात. आपल्या व्यावसायिक आणि सामाजिक जीवनात भावनांक ही यशाची गुरुकिल्ली आहे.
* आपण भावनिकदृष्टय़ा सक्षम असलो तर भावनांचं नियंत्रण आपल्या हाती असतं.
* आपलं हित-अहित लक्षात घेऊन त्यानुसार, आपल्या भावना प्रकट करताना योग्य वेळ, योग्य जागा निश्चित करणं, योग्य प्रमाणात भावना योग्य प्रकारे व्यक्त करणं हे आपल्या हातात असतं.
* कॉर्पोरेट वर्तुळात आपण जसजसे प्रगती साधतो आणि वरच्या पदावर पोहोचतो, तसे अधिकाधिक व्यक्तींशी आपला संपर्क येतो. आपल्या सहकाऱ्यांकडून उत्तम काम करून घेण्यासाठी आधी स्वत:चा भावनांक उत्तम असावा लागतो. आपला भावनांक वाढवण्यासाठी सर्वप्रथम एखाद्या परिस्थितीला आपण स्वत: आणि इतर व्यक्ती कशा सामोऱ्या जातात, याचे निरीक्षण अथवा आत्मपरीक्षण करायला हवे.
* संताप, दु:ख, चीड यांना सामोरं जायला शिका.
* घडणाऱ्या घटना तसेच इतर व्यक्तींनी कसं वागावं, यावर तुमचे नियंत्रण नसते, हे वास्तव स्वीकारा. अशा प्रसंगांना कसं सामोरं जायचं, हे तुमच्यावर असतं.
* एखाद्याशी तुम्ही असहमत असलात तरी त्याचा आणि त्याच्या मताचा आदर करा.
भावनांवर नियंत्रण कसं राखाल?
’प्रतिक्रिया व्यक्त करण्यापूर्वी काही क्षण थांबा. त्यामुळे तुमच्या मेंदूला ताíकक क्षमतेला चालना मिळते.
’विचार करा- तुमच्या कल्पना आणि पर्याय यांचा पुनर्वचिार करा. इतरांचं मत घ्या.
’कृती करा- सर्वोत्तम पर्यायाचा स्वीकार करा. अंत:प्रेरणेवर विश्वास ठेवा आणि मार्गक्रमण करा.