हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सामान्यपणे विद्यार्थ्यांना जाणवणाऱ्या त्रुटी म्हणजे अनेकांचा वाचन-लेखनाचा वेग कमी असतो. काहींचे हस्ताक्षर चांगलं नसते. खासकरून मराठी माध्यमात शिकणाऱ्यांना ‘इंग्रजी बोलता येत नाही’ असा न्यूनगंड असतो. काही जणांना आपली कमी उंची खटकत असते. या चार गोष्टींवर आज आपण लक्ष केंद्रित करू या.
सुरुवात करूया उंची वाढवण्यापासून. कारण मुलींची उंची वयाच्या १८ वर्षांपर्यंत आणि मुलांची उंची
२१ वर्षांपर्यंत वाढू शकते. उंची वाढवण्यासाठी स्ट्रेचिंगचे व्यायाम, संतुलित आहार उपयुक्त ठरतो. याबद्दल तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि किमान दोरीच्या उडय़ा मारणे, लोंबकळणे, सायकलिंग, मैदानी खेळ खेळणे असे शारीरिक व्यायाम नेमाने करा. लिंबाचं सरबत, खजूर, नाचणी यांचा आहारात समावेश करा.
खास करून मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुलांना ‘मला इंग्रजी बोलता येत नाही.’ असा न्यूनगंड असतो. खरंतर इयत्ता पहिलीपासून तुम्ही इंग्रजी शिकत आहात. पण न्यूनगंड असण्याचं कारण हे इंग्रजी कानावर न पडणं व बोलण्याची संधी न मिळणं एवढंच असतं. यावर मात करण्यासाठी अमराठी, इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांशी मैत्री करा व त्यांच्याशी इंग्रजीतून संवाद साधण्याचा प्रयत्न करा. सुटीच्या कालावधीत तुम्हाला इंग्रजी संवादकौशल्य शिकवणारे अल्प कालावधीचे अभ्यासक्रम करता येतील. दूरचित्रवाणी वाहिन्यांवर इंग्रजी बातमीपत्रे काळजीपूर्वक ऐका. इंग्रजी शिकण्यासाठी काही उपयुक्त सीडीज, पुस्तके उपलब्ध आहेत. त्यांच्या सहाय्याने इंग्रजी सुधारण्याचा सराव करता येईल. याकरता सुटीच्या कालावधीत रोज किमान एक ते दीड तास राखून ठेवा. जे वाचाल, अभ्यासाल त्याची नोंद करा आणि त्याचा वापरही करा. घरात, मित्रांमध्ये चुकांची भीती न बाळगता बोला. यामुळे इंग्रजी शब्दसाठा वाढेल. त्याचबरोबर तुमचे हस्ताक्षरही सुधारेल. आपण हस्ताक्षर सुधारण्यासाठी काय करता येईल त्याचा विचार करू.
वेगवेगळी पेन वापरून पाहा. एखाद्या कंपनीचं पेन तुम्हाला अधिक सोयीस्कर वाटेल. ते पेन वापरा. साधारणपणे सरावासाठी शाईचं पेन तर एरवी जेल पेन वा बॉलपॉइंट पेन वापरा.
लिखाणाचा संबंध येत असतो तो हाताशी. खासकरून मनगटाची, बोटांची ताकद व हात-डोळे यांचा समन्वय, सराव व सवय यांवर लिखाणाचा वेग अवलंबून असतो.
कित्येकदा अक्षरओळख करून देताना लिखाणाचे प्राथमिक नियम सांगितले गेलेले नसतात. त्यामुळे चुकीच्या तऱ्हेने लिहिण्याची सवय जडते आणि मग लिखाणाचा वेग मंदावतो, हस्ताक्षर बिघडते आणि मग लिहिण्याचा कंटाळा येतो. म्हणूनच या सुटीत लिखाणाविषयीच्या चुकीच्या सवयी मोडण्यासाठी ठरवून प्रयत्न करा. त्यासाठी मनगटाचे, डोळ्यांचे व्यायाम उपयोगी पडतील. डोळ्यांचे व्यायाम तज्ज्ञांच्या मदतीनं शिकून घ्या. काही सोप्या गोष्टी हात-डोळ्यांचा समन्वय साधण्यास उपयोगी पडतात. त्या म्हणजे- आईला भाजी, तांदूळ निवडायला मदत करणे, भरतकाम- रेशमकाम करणे. पूर्वी खेळले जाणारे सागरगोटे, विटीदांडू, काचापाणी, लगोरी, गोटय़ा, रिंग यांसारखे बिनखर्चाचे खेळ खेळणे. कित्ता गिरवणे वा पाटीचा वापर करायला तुम्ही लहान राहिला नाहीत. मात्र, बेसिक स्ट्रोक्स, उभ्या-आडव्या रेषा, अर्धगोल, गोल यांचा वापर करून तुम्ही वेगवेगळी डिझाइन्स तुमच्या वहीवर बनवू शकता. त्याचा रोज सराव करा. जमल्यास खडू वा पेन्सिलचा वापर करून ती फरशीवर काढा, वाळूत अथवा मातीत काढा.
‘मला माझं अक्षर सुधारायचंच आहे’ असं मनाशी किमान पाच वेळा म्हणा. तळहात एकमेकांवर चोळून मग ते बंद डोळ्यांवर थोडा वेळ ठेवा. मग मन लावून रोज किमान पाच ते सात मिनिटे हस्ताक्षर सुधारण्याचा सराव करा. सुटी संपेपर्यंत तुम्हाला तुमच्या हस्ताक्षरात बदल झालेला जाणवेल. दोन नियम कायम लक्षात ठेवा- लिहिताना हात वरून खाली व डावीकडून उजवीकडेच गेला पाहिजे.
लिहिण्याचा वेग कमी असण्याची कारणे पुढीलप्रमाणे असतात-अभ्यास झालेला नाही, म्हणून आत्मविश्वास नसतो तसेच सराव नसल्यानेही वेग मंदावतो. प्रथम तुमचा लेखनाचा वेग मोजा. ऐकून लिहिणं, बघून लिहिणं, विचार करून लिहिणं या प्रत्येकात लेखनाचा वेग वेगळा असतो. तुमचे वय लक्षात घेत तुम्हाला किती लिहावे लागेल त्यानुसार लेखनाचा सराव करा. आजकाल संगणकाचा वापर होत असला तरी वृत्तपत्रे, शिक्षण-अध्यापन, संशोधन अशा क्षेत्रांत हाताने लेखन करण्याचं महत्त्व कमी झालेलं नाही. म्हणूनच रोज त्या दिवसात घडलेल्या विशेष घटना, बातमी अथवा तुमच्या वाचनात-अनुभवात आलेली घटना यावर प्रथम विचार करा. मग ते केवळ मुद्दे लिहून काढा. त्यांचा क्रम ठरवून घ्या. मनातल्या मनात विचार करा आणि वेळ ठरवून तेवढय़ा वेळात लिहून काढा. मेंदूचा वेग व हाताचा वेग यांचा मेळ साधत अक्षर चांगलं काढण्याचा प्रयत्न करा, पण वेगाने लिहा.रेडिओ, टीव्ही, टेप, सीडी ऐकता ऐकता मुद्दे उतरवण्याचा सराव करा. ही सवय महाविद्यालयांमध्ये टिपणे काढताना उपयोगी पडू शकते.