इंडियन स्कूल ऑफ ई-बिझनेस या संस्थेतर्फे ई-कॉमर्स क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीसाठी प्रशिक्षणाचे विविध उपक्रम राबवले जातात. या शिक्षणक्रमांत अलीकडे ‘डिजिटल आंत्रप्रिन्युरशिप प्रोग्रॅम’ या दोन आठवडे कालावधीच्या अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आहे.
या अभ्यासक्रमात ई-कॉमर्सचे आजच्या काळातील महत्त्व, ई-कॉमर्स उद्योगातील नवे प्रवाह, या उद्योगाच्या वाढीसाठी आवश्यक ठरणाऱ्या सर्जनशील कल्पनांचा विकास, संशोधन आणि नियोजन, व्यापार प्रकल्प, तंत्रज्ञानाची निवड, विक्रीचे विविध पलू, डोमेन नेम निवडीतील व्युहात्मक बाबी, ई-मार्केटिंगसाठी आवश्यक असणारे डिझायिनग आणि जाहिरातीच्या संकल्पना, पैसे अदा करण्याची कार्यप्रणाली, ई-फसवणुकीस आळा घालणारी प्रणाली, ई-विक्रीच्या विविध प्रभावी पद्धती आणि साधने, पॅकेजिंग, साठवणूक केंद्राचे महत्त्व आदी विषयांचे प्रशिक्षण दिले जाते.
या संस्थेमार्फत ‘हाऊ टू डू बिझनेस ऑनलाइन?’ हा तीन दिवस कालावधीचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम, ‘ई-कॉमर्स मास्टर’ हा सात आठवडे कालावधीचा पदविका अभ्यासक्रम, ‘हाऊ टू स्टार्ट युवर ऑनलाइन स्टार्ट अप’ हा सहा दिवसांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम असे विविध प्रशिक्षणक्रम सुरू करण्यात आले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा