सध्या सर्वत्र स्मार्ट सिटीजचा बोलबाला आहे. स्मार्ट सिटीजचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे मोठमोठी गृहसंकुले. मुंबईसारख्या शहरात आता ५० मजल्यांपेक्षाही अधिक उंचीची घरे बांधली जात आहेत. या गृहसंकुलांमध्ये अत्याधुनिक लिफ्ट बसवली जाते. लिफ्ट लावणे, त्यांची नियमित दुरुस्ती आणि देखभाल करणे याकरता या विषयाचे तंत्रकौशल्य असणाऱ्या व्यक्तींची गरज सध्या मोठय़ा प्रमाणावर भासते.
आगामी काळात ही गरज आणखी वाढेल, हे लक्षात घेऊन या विषयातील ज्ञान संपादन केल्यास ते ज्ञान या क्षेत्रातील करिअर घडविण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
या विषयाचे प्रशिक्षण मुंबईस्थित शासकीय तंत्रनिकेतन या संस्थेने सुरू केले आहे. या संस्थेच्या सामूहिक तंत्रनिकेतन योजनेंतर्गत हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला असून त्याला केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालायचे साहाय्य मिळाले आहे.
हा अभ्यासक्रम लिफ्ट मेकॅनिक या नावाने ओळखला जातो. तो तीन महिने कालावधीचा आहे. यामध्ये लिफ्ट यंत्रणेतील आवश्यक बाबींचे प्रशिक्षण दिले जाते.
अर्हता- दहावी उत्तीर्ण आणि १८ ते ४५ वष्रे वयोगटातील व्यक्तींना हा अभ्यासक्रम करता येतो.
संस्थेचा पत्ता- सामूहिक तंत्रनिकेतन, शासकीय तंत्रनिकेतन, ४९, खेरवाडी, अलियावर जंग मार्ग, वांद्रे (पूर्व), मुंबई- ४०००५१.
संकेतस्थळ- www.gpmumbai.ac.in
ई-मेल- communitypolytechincmumbai.@gmail.com