चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका तसेच जाहिरातींचं पोस्ट प्रॉडक्शन अथवा कलाकृती निर्मितीनंतरचं अंतिम प्रॉडक्ट प्रेक्षकांच्या समोर येतं ते संपादनानंतर. दृश्य कलाकृतीच्या यशापयशात या व्हिडिओ संपादनाचा महत्त्वाचा वाटा असतो. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या विषयीचा ‘फिल्म अ‍ॅण्ड एडिटिंग’ हा १२ आठवडय़ांचा अभ्यासक्रम मुंबईस्थित शासकीय तंत्रनिकेतनात उपलब्ध आहे. दहावी उत्तीर्ण कोणत्याही व्यक्तीला तो करता येईल. या अभ्यासक्रमात चित्रपट आणि व्हिडीओ माध्यमाला आवश्यक असणाऱ्या संपादनाची कौशल्ये आणि तंत्रांची ओळख करून दिली जाते. याशिवाय ऑनलाइन आणि ऑफलाइन एडिटिंग, डिजिटल आणि अ‍ॅनालॉग कॅमेराची मूलभूत तत्त्वे,चलत्चित्रांची तत्त्वे, चित्रपटांचे विविध प्रकार आदी बाबींचेही प्रशिक्षण दिले जाते. पाश्र्वसंगीताचे डिबग, ध्वनी मुद्रण, प्रसंगांची सुसंगत जुळणी या महत्त्वाच्या बाबींचा प्रात्यक्षिकांमध्ये समावेश असतो. कलाकृती प्रभावी होण्याकरता डिजिटल सिग्नल, एडिटिंग इफेक्ट, चित्रित झालेल्या विविध प्रसंगांचे सुसंगत मिक्सिंग या बाबीही शिकवल्या जातात. या अभ्यासक्रमात कलर करेक्शन, कलर मििक्सग, कलर फिल्टर या तंत्रावर भर देण्यात येतो. रंगसंगतीचा सृजनशील आणि प्रभावी वापर करण्यासाठी हे ज्ञान आवश्यक असते.
संस्थेचा पत्ता-
शासकीय तंत्रनिकेतन,
४९, खेरवाडी, अलियावरजंग मार्ग, वांद्रे (पूर्व),
मुंबई- ४०००५१. वेबसाइट-www.gpmumbai.ac.in