सध्या विविध क्षेत्रांत माहिती तंत्रज्ञानाचा वापर मोठय़ा प्रमाणावर होत आहे. या डिजिटायझेशनचे जसे काही फायदे आहेत, त्याचप्रमाणे काही तोटेही आहेत. क्रेडिट कार्डची माहिती सव्र्हरवरून पळवल्या जाण्याच्या घटना घडताहेत. बौद्धिक संपदेशी संबंधित बाबींची चोरी होताना दिसते. संगणकातील माहितीचे विकृतीकरण करण्याची क्षमता असलेले व्हायरस संगणकीय प्रणालीमध्ये टाकल्या जाण्याच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. वित्तीय फसवणुकीस बळी पडण्याची शक्यता असलेले ईमेल अनेकांच्या ईमेल बॉक्समध्ये येऊन पडतात. अनेक व्यक्तींचे आíथक व्यवहार संगणकीय प्रणालीद्वारे माहीत करून घेत त्यांचे नुकसान घडेल अशी परिस्थिती निर्माण केली जाते. या सर्व बाबी माहिती प्रणालीच्या सुरक्षितेशी संबंधित आहेत. या बाबी लक्षात घेऊन लोयोला इन्स्टिटय़ूट ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन या संस्थेने सर्टििफकेट प्रोग्रॅम इन इन्फम्रेशन सेक्युरिटी, कंट्रोल्स अॅण्ड ऑडिट ऑफ बिझनेस इन्फम्रेशन सिस्टम्स हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी तीन महिने असून हा अभ्यासक्रम कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधरास करता येतो. हा अभ्यासक्रम आयएसएसीए (इन्फम्रेशन सिस्टम्स ऑडिट अॅण्ड कन्ट्रोल असोसिएशन) या संस्थेच्या सहकार्याने सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम केल्यावर संगणकीय माहिती प्रणालीस उद्भवू शकणारे विविधांगी धोके आणि त्यावरील उपाययोजना यांचे ज्ञान उमेदवारांना मिळू शकते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा