अलीकडे दागिन्यांच्या डिझायनिंगकडे विशेष लक्ष पुरवले जाते. नवतेच्या शोधातून ज्वेलरी डिझायनिंग ही विद्याशाखाही सतत विकसित होत आहे.ज्वेलरी डिझायनिंग क्षेत्रात कौशल्य प्राप्त केलेल्या उमेदवारांना नोकरी-व्यवसायाच्या उत्तम संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत. विविध लहान-मोठय़ा संस्थांमध्ये ज्वेलरी डिझायनिंग हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. असाच एक अल्पावधीचा डिप्लोमा इन ज्वेलरी डिझाइन हा अभ्यासक्रम जेमॉलॉजिकल इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या संस्थेने सुरू केला आहे.या अभ्यासक्रमाचा कालावधी अडीच महिने आहे. ोदहावी उत्तीर्ण उमेदवाराला हा अभ्यासक्रम करता येईल.या अभ्यासक्रमात दागिन्यांच्या विविध डिझाइन्सची रेखांकने, सर्जनशील संकल्पना, विविध मौल्यवान खडे/रत्नांची ओळख, सोने आणि इतर धातूंचे, ब्रेसलेट, पेडंट्ंस, नेकलेस आदी दागिन्यांची निर्मिती आणि विक्री, अमेरिकी, जपानी आणि जर्मन या देशातील बाजारपेठीय गरजांनुसार दागिन्यांची डिझाइन्स आणि निर्मिती, प्रकल्प अहवाल आदी विषयांचा समावेश करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र दिले जाते.
संस्थेचा पत्ता- जेमॉलॉजिकल इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया, २९, गुरूकुल चेम्बर्स, १८७-१८९, मुंबादेवी रोड, मुंबई- ४००००२.
वेबसाइट- http://www.giionline.com
ई-मेल- edu@giionline.com/ infoedunii@gmail.com