kalaसंगणकीय कामकाज करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पूर्वी डेस्कटॉपवर काम करण्यात येई. आता मात्र अधिकाधिक मंडळी लॅपटॉप आणि टॅबचा कार्यालयीन कामकाजासाठी उपयोग करताना दिसतात. या साधनांमुळे कुठेही असलो तरी काम करणं शक्य झालं आहे.
आज विविध प्रकारचे आणि विविध किमतीचे लॅपटॉप बाजारात उपलब्ध झाले आहेत. आपल्या व्यावसायिक आणि व्यावहारिक गरजेनुसार परवडणाऱ्या किमतीत लॅपटॉप मिळतात. त्यामुळे लॅपटॉप घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. लॅपटॉपचा वापर सुरू केल्यानंतर विशिष्ट कालावधीनंतर काही किरकोळ समस्या तर काही मोठय़ा समस्या उदभवू लागतात. प्रत्येक यंत्राबाबत हे घडत असतं. अशा समस्यांचं तात्काळ निराकरण करणं आवश्यक ठरतं. अन्यथा कामात मोठा व्यत्यय येऊ शकतो.
लॅपटॉप दुरुस्ती करणाऱ्या दुकानांची संख्या आणि तज्ज्ञ व्यक्तीची संख्या आजही मर्यादितच आहे. हे लक्षात घेतलं, तर लॅपटॉप दुरुस्ती, देखभाल या व्यवसायाचं महत्त्व लक्षात यावं.
एखादं यंत्र उघडून त्यात नेमकं काय आहे हे बघण्याचं कुतूहल आणि आवड असणाऱ्या कुठल्याही वयोगटातील व्यक्तीला लॅपटॉपची दुरुस्ती आणि देखभाल या व्यवसायाकडे वळता येईल. या संदर्भातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम शासकीय मुद्रण आणि तंत्र संस्थेने सुरू केला आहे. ही संस्था राज्य सरकारच्या अखत्यारीत येणारी स्वायत्त संस्था आहे. हा अभ्यासक्रम पाच-सात आठवडय़ांचा अल्प मुदतीचा आहे. या प्रशिक्षणात लॅपटॉपच्या अपग्रेडशनची माहिती दिली जाते. या प्रशिक्षणात लॅपटॉपचा कीबोर्ड, एलसीडी, मदर बोर्ड, डिस्प्ले केबल याविषयीच्या समस्यांचे निराकरण कसे करावे, हे शिकवले जाते.
विंडो एक्सपी, िवडो व्हिस्टा या प्रणाली बसवणं, त्यांचे ड्रायव्हर अंतर्भूत करणं, सॉफ्टवेअर समाविष्ट करणं, रॅम व हार्डडिस्क,डीव्हीडी रायटर बदलणं, लॅपटॉप जोडणी इत्यादी बाबीही शिकवल्या जातात. या प्राथमिक प्रशिक्षणानंतर सातत्य राखून सराव केला तर लॅपटॉप दुरुस्ती आणि देखभालीमध्ये आपण अधिक कौशल्य संपादन करू शकतो. जितके अधिक पारंगत होऊ, तितके अधिक ग्राहक आपल्याकडे वळतील.

लॅपटॉप दुरुस्ती आणि देखभालप्रशिक्षण संस्था -शासकीय मुद्रण तंत्र संस्था. पत्ता –
सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स, डॉ. डी. एन. रोड, छत्रपती शिवाजी टर्मिनससमोर,
मुंबई- ४००००१.

A bull attacked a scooter driver who came under the truck viral video on social media
बैलाने मारली उडी अन् स्कूटर चालक गेला ट्रकच्या खाली, पुढे नेमकं काय घडलं? पाहा धक्कादायक VIDEO
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
india railway viral news Husband-Wife Fight
नवरा-बायकोतील भांडण अन् रेल्वेचे तीन कोटींचे नुकसान! OK मुळे चुकीच्या स्थानकावर पोहोचली ट्रेन; नेमकं घडलं काय? वाचा…
Viral video of disabled swiggy delivery boy doing food delivery by riding a cycle
परिश्रमाशिवाय पर्याय नाही! दिव्यांग असूनही करतोय फूड डिलिव्हरी, VIDEO पाहून वाटेल अभिमान
Terrifying Railway accident of railway employee due to train driver at barauni junction in bihar video viral
बापरे! चालकाच्या चुकीमुळे घडला मोठा अनर्थ, ट्रेन सुरू करताच झाला रेल्वे कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडल? पाहा VIDEO
desi jugaad video old fridge convert into shoe rack
बाबो! खराब फ्रीजचा असा वापर तुम्ही आयुष्यात कधी पाहिला नसेल; Video पाहून युजर्सनी मारला कपाळावर हात
Dog Viral Video
श्वानाला झोप अनावर झाल्यानं बसल्या जागी केलं असं काही… VIDEO पाहून पोट धरून हसाल
research to prevent memory issues in children with brain tumors
मेंदूत गाठ असलेल्या लहान मुलांमधील स्मृतिभ्रंश टाळण्यासाठी संशोधन; गेल्या दोन वर्षांत टाटा रुग्णालयाचे संशोधन पूर्ण