आज विविध प्रकारचे आणि विविध किमतीचे लॅपटॉप बाजारात उपलब्ध झाले आहेत. आपल्या व्यावसायिक आणि व्यावहारिक गरजेनुसार परवडणाऱ्या किमतीत लॅपटॉप मिळतात. त्यामुळे लॅपटॉप घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. लॅपटॉपचा वापर सुरू केल्यानंतर विशिष्ट कालावधीनंतर काही किरकोळ समस्या तर काही मोठय़ा समस्या उदभवू लागतात. प्रत्येक यंत्राबाबत हे घडत असतं. अशा समस्यांचं तात्काळ निराकरण करणं आवश्यक ठरतं. अन्यथा कामात मोठा व्यत्यय येऊ शकतो.
लॅपटॉप दुरुस्ती करणाऱ्या दुकानांची संख्या आणि तज्ज्ञ व्यक्तीची संख्या आजही मर्यादितच आहे. हे लक्षात घेतलं, तर लॅपटॉप दुरुस्ती, देखभाल या व्यवसायाचं महत्त्व लक्षात यावं.
एखादं यंत्र उघडून त्यात नेमकं काय आहे हे बघण्याचं कुतूहल आणि आवड असणाऱ्या कुठल्याही वयोगटातील व्यक्तीला लॅपटॉपची दुरुस्ती आणि देखभाल या व्यवसायाकडे वळता येईल. या संदर्भातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम शासकीय मुद्रण आणि तंत्र संस्थेने सुरू केला आहे. ही संस्था राज्य सरकारच्या अखत्यारीत येणारी स्वायत्त संस्था आहे. हा अभ्यासक्रम पाच-सात आठवडय़ांचा अल्प मुदतीचा आहे. या प्रशिक्षणात लॅपटॉपच्या अपग्रेडशनची माहिती दिली जाते. या प्रशिक्षणात लॅपटॉपचा कीबोर्ड, एलसीडी, मदर बोर्ड, डिस्प्ले केबल याविषयीच्या समस्यांचे निराकरण कसे करावे, हे शिकवले जाते.
विंडो एक्सपी, िवडो व्हिस्टा या प्रणाली बसवणं, त्यांचे ड्रायव्हर अंतर्भूत करणं, सॉफ्टवेअर समाविष्ट करणं, रॅम व हार्डडिस्क,डीव्हीडी रायटर बदलणं, लॅपटॉप जोडणी इत्यादी बाबीही शिकवल्या जातात. या प्राथमिक प्रशिक्षणानंतर सातत्य राखून सराव केला तर लॅपटॉप दुरुस्ती आणि देखभालीमध्ये आपण अधिक कौशल्य संपादन करू शकतो. जितके अधिक पारंगत होऊ, तितके अधिक ग्राहक आपल्याकडे वळतील.
लॅपटॉप दुरुस्ती आणि देखभाल
संगणकीय कामकाज करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पूर्वी डेस्कटॉपवर काम करण्यात येई.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 14-01-2015 at 06:36 IST
मराठीतील सर्व Learn इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Laptop repair maintenance