kalaएलईडी तंत्रज्ञानाने बनवलेले बल्ब इतर प्रकाश देणाऱ्या साधनांचा अधिकाधिक वापर नागरिकांनी करावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकारतर्फे सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. एलइडी बल्बमुळे विजेची
बचत होते तसेच हे बल्ब वातावरणातील प्रदूषण मुक्तीसाठीच्या प्रयत्नांना हातभार लावतात.
एलईडी तंत्रज्ञानाने निर्मित साधनांमध्ये घरातील बल्बसोबत पथदिवे, टय़ूब लाइट, फोकस लाइट, हायवे लाइट आदींचा समावेश आहे. लोकांमध्ये या साधनांबाबत जाणीवजागृती मोठय़ा प्रमाणावर होत असल्याने त्यांचा ही साधने खरेदी करण्याकडे ओढा वाढत आहे. त्यानुसार या उत्पादनांच्या मागणीतही वाढ होत आहे.
या साधनांची निर्मिती करण्याचे तंत्र स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या युवावर्गाला प्राप्त करता यावे यासाठी चेन्नईस्थित एमएसएई डेव्हलपमेंट इन्स्टिटय़ूट या केंद्र सरकारच्या संस्थेने एलईडी प्रॉडक्ट्स ट्रेिनग सुरू केले आहे.
हे प्रशिक्षण पाच दिवसांच्या कालावधीचे आहे. या अभ्यासक्रमात एलईडी प्रॉडक्ट्सची निर्मिती आणि जोडणीचे प्रशिक्षण दिले जाते. शिवाय उद्योग स्थापण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करणे, शासनाच्या विविध योजना, कर्जप्रक्रिया यांची माहितीही उमेदवारांना दिली जाते.
या प्रशिक्षणाचे शुल्क सहा हजार रुपये आहे. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारांना फीमध्ये ५० टक्के सवलत दिली जाते. हे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना केंद्र सरकारचे प्रमाणपत्र प्रदान केले जाते.
पत्ता- असिस्टंट डायरेक्टर, एमएसएई डेव्हलपमेंट इन्स्टिटय़ूट, नं- ६५/१, जीएसटी रोड, िगडी,
चेन्नई- ३२.
ईमेल- chandraprabhu.r@gmail.com
वेबसाइट- http://www.msmedi-chennai.gov.in