kalaएअर कंडिशनरची कार्यक्षमता ही त्याच्या नियमित देखभालीवर अवलंबून असते. ही देखभाल आणि वेळोवेळी काही दुरुस्ती करायची असल्यास त्यासाठी कौशल्यप्राप्त तंत्रज्ञांची गरज भासते. ही बाब लक्षात घेऊनच इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन ऑफ इलेक्ट्रिकल मेझिरग इन्स्ट्रमेन्ट्स (आयडीएमआय) या संस्थेने ‘अ‍ॅडव्हान्स्ड रिपेअर अ‍ॅण्ड इन्डस्ट्रियल स्कील एन्हान्समेंट इन स्प्लिट एसी’ (रूम एअर कंडिशनर) हा तीन महिने कालावधीचा प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू केला आहे. ही संस्था केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (मायक्रो, स्मॉल अ‍ॅण्ड मीडियम एन्टरप्रायजेस) या संस्थेची एक शाखा आहे.

कौशल्यनिर्मितीच्या या प्रशिक्षणासाठी या संस्थेने सॅमसंग इंडिया इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेचे सहकार्य घेतले आहे. या सहकार्याअंतर्गत स्प्लिट एसीची यंत्रणा बसवणे, नियमित स्वरूपाची सíव्हसिंग, दुरुस्ती, देखभाल या बाबींशी निगडित तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये आयडीएमआय या संस्थेमध्ये काही कालावधीसाठी अभ्यासक्रम शिकवला जातो. त्यानंतर सॅमसंगच्या सेवा केंद्रात प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते.
हे प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवाराने आयटीआयमधून रेफ्रिजरेशन अ‍ॅण्ड एसी/ फिटर/ टेक्निशियन/ इन्स्ट्रमेंट मेकॅनिक्स/ किंवा इलेक्ट्रिकल वा मेकॅनिकल अभियांत्रिकीमधील पदविका किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित या विषयांतील बी.एस्सी किंवा कोणत्याही विषयातील बी.ई. यापकी कोणताही एक अभ्यासक्रम केलेला असावा.

संस्थेचा पत्ता- इस्टर्न एक्स्प्रेस हायवे, एवरार्डनगर बस थांब्याच्या विरूद्ध दिशेला, चुनाभट्टी, सायन,
मुंबई- ४०००२२.
वेबसाइट – http://www.idemi.org

Story img Loader