kalaसौंदर्यप्रसाधन क्षेत्राची झपाटय़ाने वाढ होत आहे. मात्र, रासायनिक गुणधर्म असलेल्या प्रसाधनांचे होणारे दुष्परिणाम स्पष्ट होऊ लागल्याने वनौषधीयुक्त सौंदर्यप्रसाधनांच्या निर्मितीला चालना मिळत आहे. या क्षेत्रात मोठमोठय़ा कंपन्यासुद्धा उतरल्या आहेत. त्याशिवाय उद्योजकतेमध्ये स्वारस्य असलेल्या ज्या व्यक्तींना व्यवसाय म्हणून या वनौषधीयुक्त सौंदर्यप्रसाधनांच्या निर्मितीच्या क्षेत्रात उतरायचे असेल तर त्यांना यासंबंधीचे रीतसर प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.
त्याकरता मिटकॉन (महाराष्ट्र इंडस्ट्रिअल अ‍ॅण्ड टेक्निकल कन्सल्टन्सी ऑर्गनायझेशन) या संस्थेतर्फे चालविण्यात येणारा ‘हर्बल कॉस्मेटिक सर्टििफकेट कोर्स’ उपयुक्त ठरू शकतो. या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन प्रकारचा आहे- १० रविवार किंवा सलग तीन आठवडे. या अभ्यासक्रमात ऑइल, लोशन, साबणनिर्मिती, जेल, क्रीम आधारित पाच प्रकारच्या सौंदर्य उत्पादनाच्या निर्मितीचे कौशल्य शिकवले जाते. ऑइल आधरित उत्पादनामध्ये केस आणि मसाजसाठी उपयुक्त ठरणाऱ्या तेलांचा समावेश आहे. लोशन या प्रकारात क्लििन्सग आणि बेबी लोशन यांचा समावेश आहे. साबणनिर्मितीत हॅण्ड वॉश, हर्बल सोप, अ‍ॅण्टी डँड्रफ, फेश वॉश, शाम्पू यांचा समावेश आहे. जेल या प्रकारात काकडी, संत्रे, कोरफड यांच्या जेल निर्मितीचा समावेश आहे. क्रीमनिर्मितीत अ‍ॅण्टी अ‍ॅक्ने, फूट, फ्रुट मसाज, स्क्रब आणि कोणत्याही बाबीसाठी वापरता येऊ शकेल अशा क्रीम्सचा समावेश आहे.त्याशिवाय ओठ आणि वेदनाशामक बामनिर्मितीचे कौशल्यही शिकवले जाते. उत्पादनांच्या निर्मितीप्रक्रियेसोबतच उद्योजकता विकासाचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये औद्योगिक प्रतिष्ठानांना भेटी, प्रकल्प अहवाल तयार करणे, शासकीय परवाने मिळवण्याची प्रक्रिया, बँकेकडून कर्ज मिळवण्याची प्रक्रिया यांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमांमध्ये प्रात्यक्षिकांवर अधिकाधिक भर देण्यात येतो. यंत्रसामग्री व इतर साहित्य उपकरणांची सविस्तर माहिती दिली जाते. उत्पादनांच्या शास्त्रीय सूत्रांची टिपणे दिली जातात.
पत्ता: मिटकॉन उद्योग प्रबोधिनी, कृषी महाविद्यालय आवार, जिल्हा उद्योग केंद्राच्या शेजारी, शिवाजी नगर, पुणे- ४१०००५.
ई-मेल: msdc@mitconindia.com

process of regularizing project affected constructions gained momentum after return of mahayuti government
गरजेपोटी बांधकामांच्या नियमितीकरण प्रक्रियेला वेग; तांत्रिक मूल्यमापनाचे काम अंतिम टप्प्यात
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
clean up marshal action against those responsible for littering
क्लीन अप मार्शलकडून अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; पालिकेच्या तिजोरीत आठ महिन्यांत ३ कोटी दंड जमा
Saket Bridge, Mumbai Nashik Traffic, Road Widening,
मुंबई-नाशिक मार्गावर पुढील तीन महिने कोंडीचे, साकेत पुलाजवळील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणास सुरूवात
3 percent errors possible in ladki bahin yojana application scrutiny
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज छाननीत तीन टक्के त्रुटींचा संभव;  नाशिक विभागातील स्थिती
loksatta money motra article Growth and Value strategy
तुमची रणनीती काय? ‘ग्रोथ की व्हॅल्यू’
What is the National Health Claim Exchange health insurance
आरोग्य विम्याची प्रक्रिया आता जलद? काय आहे ‘नॅशनल हेल्थ क्लेम एक्स्चेंज’?
Story img Loader