त्याकरता मिटकॉन (महाराष्ट्र इंडस्ट्रिअल अॅण्ड टेक्निकल कन्सल्टन्सी ऑर्गनायझेशन) या संस्थेतर्फे चालविण्यात येणारा ‘हर्बल कॉस्मेटिक सर्टििफकेट कोर्स’ उपयुक्त ठरू शकतो. या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन प्रकारचा आहे- १० रविवार किंवा सलग तीन आठवडे. या अभ्यासक्रमात ऑइल, लोशन, साबणनिर्मिती, जेल, क्रीम आधारित पाच प्रकारच्या सौंदर्य उत्पादनाच्या निर्मितीचे कौशल्य शिकवले जाते. ऑइल आधरित उत्पादनामध्ये केस आणि मसाजसाठी उपयुक्त ठरणाऱ्या तेलांचा समावेश आहे. लोशन या प्रकारात क्लििन्सग आणि बेबी लोशन यांचा समावेश आहे. साबणनिर्मितीत हॅण्ड वॉश, हर्बल सोप, अॅण्टी डँड्रफ, फेश वॉश, शाम्पू यांचा समावेश आहे. जेल या प्रकारात काकडी, संत्रे, कोरफड यांच्या जेल निर्मितीचा समावेश आहे. क्रीमनिर्मितीत अॅण्टी अॅक्ने, फूट, फ्रुट मसाज, स्क्रब आणि कोणत्याही बाबीसाठी वापरता येऊ शकेल अशा क्रीम्सचा समावेश आहे.त्याशिवाय ओठ आणि वेदनाशामक बामनिर्मितीचे कौशल्यही शिकवले जाते. उत्पादनांच्या निर्मितीप्रक्रियेसोबतच उद्योजकता विकासाचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये औद्योगिक प्रतिष्ठानांना भेटी, प्रकल्प अहवाल तयार करणे, शासकीय परवाने मिळवण्याची प्रक्रिया, बँकेकडून कर्ज मिळवण्याची प्रक्रिया यांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमांमध्ये प्रात्यक्षिकांवर अधिकाधिक भर देण्यात येतो. यंत्रसामग्री व इतर साहित्य उपकरणांची सविस्तर माहिती दिली जाते. उत्पादनांच्या शास्त्रीय सूत्रांची टिपणे दिली जातात.
पत्ता: मिटकॉन उद्योग प्रबोधिनी, कृषी महाविद्यालय आवार, जिल्हा उद्योग केंद्राच्या शेजारी, शिवाजी नगर, पुणे- ४१०००५.
ई-मेल: msdc@mitconindia.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा