शिक्षण घेताना अथवा सुटीच्या कालावधीत अर्धवेळ नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत आहे. केवळ पैसे कमावण्याची गरज हा या नोकरी करण्यामागचा उद्देश नसावा तर अशा अर्धवेळ कामांमधून आपल्याला ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्या क्षेत्राची कार्यसंस्कृती जाणून घेता येते. त्या क्षेत्रात काम करण्यासाठी. पदवीच्या भेंडोळ्यापलीकडे आणखी कोणती कौशल्ये आवश्यक असतात, याचे धडे गिरवता येतात.

शिकतानाच नोकरीचा अनुभव महत्त्वाचा!
आज नोकरी-करिअरच्या ठिकाणी असणाऱ्या प्रचंड स्पर्धात्मक वातावरणामुळे कंपन्या केवळ तुमच्या पदवीकडे पाहून नोकरी देत नाहीत. उमेदवाराला शिक्षणासोबत कामाचा अनुभव असेल तर त्याचे पारडे नक्कीच जड असते आणि अशा पदवीधराला चांगली नोकरी मिळणेदेखील सोपे जाते.
स्पर्धात्मक वातावरण, सतत बदलणारे तंत्रज्ञान यामुळे कंपन्याचा अर्धवेळ नोकरीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे. अनेक कंपन्यांमध्ये काही वेळा कायमस्वरूपी कामाचा ओघ असतोच असे नाही, तसेच अर्धवेळ नोकरी करणाऱ्याला तुलनेने वेतन कमी द्यावे लागते आणि यामुळे अर्धवेळ काम करणारे कर्मचारी नेमण्यामध्ये कंपन्यांचाही फायदाच असतो.

maharashtra govt introduces new guidelines for school picnic
शैक्षणिक सहलींसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून दक्षतेची सूचना
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
unemployed youth cheated under mukhyamantri yuva karya prashikshan yojana
भंडारा : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील शेकडो बेरोजगारांची फसवणूक!
state government decision 50 thousand teachers will get 20 percent subsidy increase
शिक्षकांसाठी मोठी बातमी! वेतनात २० टक्के वाढ होणार?
NEET Postgraduate Exam Schedule Announced Wardha news
नीट पदव्युत्तर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; वैद्यक आयोग म्हणतो…
murder of Satish Wagh, Satish Wagh, dispute,
सतीश वाघ यांची हत्या जुन्या वादातून, पाच लाखांची दिली होती सुपारी – पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार
Navneet Rana, Navneet Rana on EVM issue,
‘राजीनामा देण्‍यास तयार, पण…’; नवनीत राणांचे आव्‍हान खासदार वानखडेंनी स्‍वीकारले
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?

अर्धवेळ नोकरी कशी शोधाल?
* शिक्षण संस्था- जर काम करण्याची इच्छा असेल तर पहिल्यांदा आपल्या शिक्षकांशी या विषयी चर्चा करावी. संबंधित क्षेत्रात काम करण्यासाठी ते काही संदर्भ देऊ शकतात.
* ओळखीद्वारे- ओळखीच्या व्यक्ती, शेजारी, कुटुंबीय यांच्याशी संवाद साधून तुम्ही काम करण्याची इच्छा व्यक्त करा. एखाद्वेळेस त्यांच्या ओळखीतून काम मिळू शकते.
* वर्तमानपत्रातील जाहिराती- वर्तमानपत्रांमधील तसेच मासिकांमधीलनोकरीच्या जाहिरातींमध्ये काही वेळा अर्धवेळ नोकरीची माहिती अथवा जाहिरात असते.
* इंटरनेट- नोकरीची माहिती देणाऱ्या विविध वेबसाइट्सवर तसेच फेसबुक, व्हॉटस् अ‍ॅप सारख्या सोशल मीडियावर विविध माहिती उपलब्ध असते. मात्र येथील जाहिरातींची संपूर्ण शहानिशा करून, आवश्यक ती काळजी घेत आणि पूर्ण माहितीअंती नोकरीचा निर्णय घ्यावा.
* प्लेसमेन्ट एजन्सी – नोकरी देणाऱ्या प्लेसमेन्ट एजन्सीद्वारे तुम्हाला तुमच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याचा अनुभव घेता येईल. असा एजन्सीज तुमची आर्थिक मोबदल्याची इच्छा, कामाचे स्वरूप, निवडीचे क्षेत्र हे सारे लक्षात घेऊन अर्धवेळ नोकरी देण्याचा प्रयत्न करतात.

अर्धवेळ नोकरीचे लाभ
अर्धवेळ नोकरी करण्याचे अनेक फायदे आहेत-
* मानधन मिळते- शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुटीच्या कालावधीत पॉकेटमनी जमा करण्याकरता किंवा आपल्या शिक्षणाच्या खर्चात खारीचा वाटा उचलण्यासाठी अर्धवेळ नोकरीकडे एक उत्तम पर्याय म्हणून नक्कीच पाहता येईल. पसे कमावल्यामुळे आत्मविश्वास येतो.
* वेळेचे प्रभावी व्यवस्थापन- नोकरी करत असताना काम आणि महाविद्यालयीन अभ्यास अशा अनेक दरडींवर पाय ठेवावा लागतो. त्यामुळे वेळेच्या अचूक नियोजनाची सवय लागते. या सवयींचा भावी आयुष्यात उपयोग होऊ शकतो आणि त्याद्वारे आयुष्यातील प्राधान्यक्रम ठरवता येतात.
* व्यावहारिक शिक्षण – शिकलेल्या ज्ञानाचे काम करताना उपयोजन कसे करावे, हे कळते. इतर अनेक कौशल्ये विकसित करता येतात. नव्या वातावरणात स्वत:ला सिद्ध करणे, सहकाऱ्यांशी जुळवून घेणे, प्रभावी संवाद साधणे, कॉर्पोरेट जगाचे रीतिरिवाज याविषयी प्रशिक्षण मिळते. वरिष्ठांकडून तसेच सहकाऱ्यांकडून कामाची पद्धत जाणून घेता येते. संघभावना, ग्राहकांशी संबंध या संकल्पनांचे
भान येते.
* अनुभव – कामाच्या या अनुभवाची नोंद तुमच्या बायोडेटावर, सीव्हीवर करता येते. नोकरीसाठी अर्ज करताना तुमचा हा अनुभव निश्चितच उपयोगी येतो.
* जबाबदारीची जाणीव – करिअरची सुरुवात करताना नवशिक्या उमेदवारापेक्षा अर्धवेळ काम करण्याचा अनुभव असलेल्या उमेदवाराला कंपन्या स्वीकारतात; कारण तो अधिक जबाबदारीने काम करेल, असा विश्वास कंपन्यांना वाटतो.
* नेटवìकग – तुमचे अर्धवेळ काम आणि तुमचे करिअर यांत साम्य असले/नसले तरीही या कामाच्या निमित्ताने झालेल्या ओळखीचा फायदा तुम्हाला भावी आयुष्यात होऊ शकतो. या ओळखीतून कामाच्या अनेक संधी मिळू शकतात.

अर्धवेळ नोकरी कुठे करता येईल?
* फास्ट फूड रेस्तराँ –
आज देशभरात पिझ्झा, बर्गर, केक, डोनटचे उत्पादन-विक्री करणाऱ्या अनेक देशी-बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपले बस्तान बसवले आहे आणि तिथे काम करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असते. यात कुक, सव्‍‌र्हर किंवा घरी डिलिव्हरी देण्याचे काम मिळू शकते. हे काम शिफ्ट पद्धतीने केले जाते. कामाचे बऱ्यापैकी मानधन मिळते. काही ठिकाणी कामाच्या वेळेत तुमच्या जेवणाची सुविधाही उपलब्ध असते. अशा ठिकाणी काम करण्यासाठी उत्साही, हसतमुख युवावर्गाची आवश्यकता असते. युवावर्गाला असा ठिकाणी समवयस्क व्यक्तींसोबत काम करायला मिळते तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या ग्राहकांशी संबंध येत असल्याने विविध व्यक्तींशी नम्रतेने संवाद कसा साधावा, हे शिकता येते.
* कॉफी शॉप्स-
आज वेगवेगळ्या प्रकारच्या पेयपानाची सुविधा असलेल्या उंची कॉफी शॉप्सची संख्या वाढत आहे. इथेही काम करण्यासाठी युवावर्गाला झुकते माप दिले जाते.
* पुस्तकाचे दुकान, ग्रंथालय –
पुस्तकांच्या मोठय़ा दुकानांमध्ये तसेच ग्रंथालयांमध्ये अर्धवेळ नोकरी मिळू शकते. पुस्तकांच्या व्यवस्थेबाबत अनेक गोष्टी शिकता येतात तसेच पुस्तकांच्या सहवासात वेळ व्यतीत करता येतो.
* ‘इव्हेन्ट’चे सहायक –
आज प्रत्येक शहरात विविध इव्हेंट मॅनेजमेन्ट करणाऱ्या कंपन्या आहेत तिथे विद्यार्थ्यांना अर्धवेळ नोकरीची संधी मिळू शकते. अशा कंपन्यांद्वारे आयोजित केले जाणारे सोहळे लग्नसमारंभांपासून सिनेमा, गाण्याची मैफील असे कुठलेही असू शकतात. सोहळ्याच्या आयोजनाच्या निमित्ताने संबंधित क्षेत्रातील दिग्गजांना भेटण्याची, त्यांचे काम न्याहाळण्याची संधी मिळते. हे काम करताना तुम्ही व्यावसायिक पद्धतीने वागणे-बोलणे अपेक्षित असते.
* रिसेप्शनिस्ट –
अनेक छोटय़ा- मोठय़ा कंपन्यांपासून डॉक्टरच्या क्लिनिकपर्यंत सर्वत्र रिसेप्शनिस्टची आवश्यकता असते. काही ठिकाणी हे कामदेखील शिफ्टमध्ये करावे लागते. हे काम करताना फावला वेळ मिळत असल्याने त्या वेळेचा अभ्यासासाठी उपयोग करता येतो.
* माहितीचे विश्लेषण –
अनेक कंपन्यांमध्ये संबंधित क्षेत्राची सद्यस्थिती समजण्यासाठी माहिती अहवाल तयार करत असतात. त्याकरता माहिती गोळा करणे, त्या माहितीचे विश्लेषण करणे याकरता अर्धवेळ नोकरीच्या संधी उपलब्ध असतात. मात्र, हे भटकंतीचे आणि व्यक्तींशी संवाद साधण्याचे काम असते.
* फ्रीलान्स काम –
जर तुमच्यात लेखनकौशल्य असेल तर तुम्हाला लिखाणाची कामे मिळू शकतात. यात विविध विषयांवर लेख लिहिणे, अनुवाद करणे, ब्लॉग लिहिणे, अशा कामांचा समावेश असतो. अशा कामांची माहिती तुम्हाला इंटरनेटवर अथवा प्रसारमाध्यमांच्या कार्यालयात मिळू शकते. संगणकीय ज्ञान असल्यास सॉफ्टवेअर टेस्टर, डेटा एन्ट्रीचे काम तुम्ही करू शकता. वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना अकाऊन्ट्स लिहिण्याचे कामदेखील उपलब्ध असते.
* डॉग वॉकर –
आज घरात कुत्रे पाळणाऱ्या दहापकी चार मालकांकडे आपल्या कुत्र्यांना फिरवायला वेळ नसतो. प्राण्यांची आवड असेल तर अशा हटके कामात चांगले पैसे मिळू शकतात.

Story img Loader