मुळात एखाद-दुसऱ्या प्रसंगाने डळमळीत व्हावा इतका पालकत्वाचा आवाका अल्प-स्वल्प आहे का?
घरी काही आकस्मिक अडचणी आल्या की कुटुंबाची बरीच शक्ती त्यात खर्ची पडते. उदा. कुटुंबात एखाद्याचं दीर्घकाळ चालणारं आजारपण. अशा वेळी त्याला सामोरं जाणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. त्यामुळे मुलांकडे हवं तितकं लक्ष न देता येणं अतिशय स्वाभाविक आहे. या मधल्या काळासाठी मुलांचा अभ्यास किंवा अन्य अॅक्टिव्हिटिज थोडय़ा दुय्यम झाल्या म्हणून खूप अपराधी वाटत राहणारे अनेक आईबाबा गेल्या काही वर्षांमध्ये मला पाहायला मिळालेत.
आईवडिलांपकी एकाचं निधन किंवा आईवडिलांचं विभक्त होणं, अशा खोल परिणाम करणाऱ्या घटनांना सामोरं जाताना तर या अपराधी भावनेचा कडेलोट होताना खूपदा पाहायला मिळतं. मुळात अशा प्रसंगांना सामोरं जाताना कुटुंबाची खूपच दमछाक होते. सगळ्या घराचीच बऱ्यापकी हेळसांड होत असते. अशा वेळेस दुख, ताण, काहीतरी गमावल्याची भावना, एकटेपणा- अशा अनेक अनुभवांमधून
ताणतणाव आणि पालकत्व
मुलांच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर आईबाबा खूप मोठी भूमिका बजावत असतात. वेळोवेळी झालेल्या शास्त्रीय अभ्यासांमधूनही हेच ठळकपणे समोर आलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 24-06-2015 at 07:39 IST
मराठीतील सर्व Learn इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stress and parenting