शहरातील इमारतींची विविध प्रकारची देखभाल आणि दुरस्ती याकरता स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली जाते. आता तर तसे बंधनकारकच आहे. इमारतींची दुरुस्ती आणि देखभाल यामध्ये सीसीटीव्ही बसवणे, त्याचं संनियंत्रण व देखभाल तसेच अग्निशमन यंत्रणेची स्थापना व देखभाल यांचा समावेश असतो. त्याकरता एकात्मिक इमारत व्यवस्थापन करणाऱ्या नियंत्रण कक्षाची स्थापना केली जाते. हे नियंत्रण कक्ष मोठय़ा इमारतींना ‘इंटेलिजेंट’ इमारतीचे स्वरूप प्राप्त करून देतात. या नियंत्रण कक्षात इमारतीच्या देखभालीसाठी आवश्यक असणारी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक यंत्रणा बसवण्यात येते. ही स्वयंचलित आणि मानवी तंत्रज्ञाद्वारे चालवण्यात येणारी यंत्रणा इमारतीच्या विविध सेवा आणि सुविधांची दुरुस्ती, देखभाल आणि सुरक्षेवर लक्ष ठेवण्यासोबतच इमारतीमधील कोणतीही सेवा खंडित होणार नाही, दर्जामध्ये घट होणार नाही याकडे लक्ष पुरवत असते. ऊर्जा बचतीकडे लक्ष देत असते. इमारतीची उष्णता, हवा खेळती राहणे, एअरकंडिशिनग, वीज, अलार्म यंत्रणा आदी बाबींचे संनियंत्रण करत असते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा