पर्यटकांना दर्जेदार सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या यशात त्यांच्याकडील प्रशिक्षित आणि कौशल्यप्राप्त मनुष्यबळाचा सर्वात मोठा वाटा असतो. अशा मनुष्यबळामध्ये टूर मॅनेजर या व्यक्तीचा अग्रक्रमाने समावेश करता येईल. या व्यवसायात येऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना उपयुक्त ठरू शकतील असे पर्यटन उद्योगाशी निगडित अनेक अभ्यासक्रम गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अॅण्ड डेव्हलपमेंट या संस्थेने सुरू केले आहेत. मुंबई विद्यापीठामार्फत चालवल्या जाणाऱ्या या संस्थेत विविध क्षेत्रांसाठी आवश्यक असणारे तंत्र-कौशल्याचे प्रशिक्षणक्रम उपलब्ध आहेत. या संस्थेने पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेत-
पर्यटनाचे व्यवस्थापन
पर्यटन क्षेत्राची झपाटय़ाने वाढ होत आहे. या क्षेत्राने आजमितीस उद्योगाचे स्वरूप धारण केले आहे. क्रयशक्ती वाढल्याने पर्यटकांच्या संख्येत वर्षांकाठी मोठी वाढ होताना दिसते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 13-05-2015 at 07:16 IST
मराठीतील सर्व Learn इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tourism management