विविध प्रकारचे आरक्षण हा पर्यटन व्यवसायाचा कणा समजला जातो. रेल्वे, विमान, बससेवा, जहाजातील आरक्षण, वेगवेगळी हॉटेल्स, निवासस्थाने यांचे आरक्षण यांचा यात समावेश आहे. आरक्षणाची कार्यप्रणाली आता माहिती-तंत्रज्ञानाशी निगडित झाली आहे. हे तंत्रकौशल्य प्राप्त केलेल्या उमेदवारांना पर्यटन कंपन्या, पर्यटन संस्था, विमान सेवा येथे नोकरीच्या संधी मिळू शकतात. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या तंत्र-कौशल्याचे प्रशिक्षण देणारा ‘सर्टििफकेट कोर्स इन कॉम्प्युटर रिझव्र्हेशन सिस्टीम’ हा अभ्यासक्रम गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अॅण्ड डेव्हलपमेंट या संस्थेने सुरू केला आहे.
अर्हता- कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण. या अभ्यासक्रमाचा कालावधी- ४ महिने.
हा अभ्यासक्रम पर्यटन व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या वेगळ्या प्रकारचे कौशल्य प्राप्त केलेल्या मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी उपयुक्त ठरणारा आहे. पर्यटकांना आरक्षणाची सेवा तप्तरतेने देण्यासाठी तंत्रदृष्टय़ा कौशल्य प्राप्त केलेले उमेदवार पर्यटन कंपन्यांना हवे असतात. पर्यटन उद्योगासाठी कार्यरत असणारी आरक्षण कार्यपद्धती, प्रक्रिया आणि तंत्रज्ञान यांची सांगड या अभ्यासक्रमात घालण्यात आली आहे. पर्यटन व्यवसायात करिअर करण्यासाठी हे ज्ञान उपयुक्त ठरू शकते. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांमध्ये आरक्षणाची बाजू सांभाळण्यासाठी तसेच कार्यालयीन कामकाजासाठीसुद्धा अशा उमेदवारांचा विचार केला जाऊ शकतो. ज्या व्यक्तींना कोणत्याही पर्यटन कंपन्यांची सेवा न घेता पर्यटनाचा छंद जोपासायचा आहे, त्यांच्यासाठीही हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतो. संगणकीय आरक्षण प्रणालीचे तंत्र शिकल्यामुळे पर्यटन अधिक सुखदायी आणि सुरळीत होऊ शकते.

पत्ता- गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अॅण्ड डेव्हलपमेंट, मुंबई विद्यापीठ, विद्यानगरी,
सांताक्रुझ (पूर्व) कॅम्पस, मुंबई- ४०००९८
वेबसाइट- http://www.giced.edu.in
ई-मेल- garware@giced.mu.ac.in