काम करताना अनेकदा आपलं लक्ष विचलित होतं. कामातून लक्ष उडण्यामागची कारणं अनेक असू शकतात.. काम करताना आपल्याला फोन येतात, ई-मेल्स येतात, कधी आपण काम करताना इंटरनेट धुंडाळतो, मित्रमंडळी अफलातून एसेमेस पाठवतात. दर वेळेस आपल्या कामात व्यत्यय येत असतो, पण त्याची कारणं मात्र वेगवेगळी असतात. एका पाहणीत असे आढळून आले आहे की, कामाचा व्यत्यय अवघा २-३ सेकंदांचा जरी असला तरी त्यामुळे चुका होण्याची शक्यता वाढते. व्यत्यय आल्यानंतर पुन्हा कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी सरासरी २५ मिनिटांचा अवधी लागतो..

कामाच्या ठिकाणचे सर्वसाधारण अडथळे
’कामात व्यत्यय आणणारं सर्वात आघाडीचं कारण म्हणजे तंत्रज्ञान. कामाच्या वेळेत किमान एक तास तरी व्यक्तिगत फोन, ई-मेल्स, एसेमेसमध्ये जातो, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. अनेकांचा सर्वाधिक वेळ इंटरनेटवर कामाव्यतिरिक्तची माहिती धुंडाळण्यात जातो.
’कोणत्या कारणांमुळे तुमचे लक्ष कामातून उडते हे लक्षात घेण्याचा प्रयत्न केला तर असे दिसून येते की, सहकाऱ्यांचं मोठय़ा आवाजातील बोलणं, तुम्हाला येणारे भारंभार ई-मेल्स, डेडलाइन जवळ आल्याने येणारा तणाव, कामाच्या ठिकाणच्या वातावरणात मोबाइल फोन्सचा वाढलेला वावर या सगळ्यांमुळे कामात व्यत्यय येऊ शकतो.
’कधी कधी काम करताना तुमचा सहकारी तुमच्याशी गप्पा मारायला किंवा एखाद्या मुद्दय़ावर तुमचं मत विचारायला येतो. काही वेळ झाल्यावर तुमच्या लक्षात येतं की, कामासाठी फार कमी वेळ तुमच्यापाशी शिल्लक राहिला आहे.. सहकाऱ्यांशी संवाद हा महत्त्वाचा असतो, पण जर तो तुमच्या कामात बाधा आणणारा असेल तर तो तुम्हाला महागात पडू शकतो. यावर उपाय म्हणजे, काम करताना तुमच्याशी गप्पा मारायला आलेल्या सहकाऱ्याला तुमच्या कामाच्या डेडलाइनची कल्पना द्या आणि आपण नंतर बोलूयात असे सांगा. तुमच्या भोवताली खूप आवाज असेल तर सौम्यपणे त्यांना आवाजामुळे कामात व्यत्यय येत असल्याचे सांगा. मुभा असल्यास महत्त्वाचे काम करताना भोवताली आवाज असल्यास कॉन्फरन्स रूम अथवा इतर शांत जागी जाऊन काम करा.

NEET Postgraduate Exam Schedule Announced Wardha news
नीट पदव्युत्तर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; वैद्यक आयोग म्हणतो…
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
speeding luxury car collide straight into grade
भरधाव अलीशान कार थेट गॅरेजमध्‍ये घुसली; तिघे गंभीर जखमी, अलिबाग चोंढी येथील घटना
Yes Madam Fires Over 100 Employees for Feeling Stressed at Work Viral Email Claims
“ही तर चिटींग आहे!” आधी ऑफिसमध्ये कामाचा ताण येतो का विचारले अन् ज्यांनी होकार दिला त्यांनाच कामावरून काढून टाकले
Shocking video Bat Spotted Eating Chikoo In Pune Market; Video Raises Health Concerns
पुणेकरांनो तुम्हीही बाजारातून फळं घेताय का? थांबा! ‘हा’ प्रकार पाहून पायाखालची जमीन सरकेल; VIDEO एकदा पाहाच
Navneet Rana, Navneet Rana on EVM issue,
‘राजीनामा देण्‍यास तयार, पण…’; नवनीत राणांचे आव्‍हान खासदार वानखडेंनी स्‍वीकारले
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल
markadwadi villagers marathi news
मारकडवाडी ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करणे आवश्यक, रामदास आठवले यांची भूमिका

व्यक्तिगत स्वरूपातील अडथळे
वाजणारे फोन, येणारे ई-मेल्स, मेसेज आणि गप्पिष्ट सहकारी हे सर्व तुमच्या कामामध्ये येणारे बाह्य़ अडथळे आहेत. शक्कल लढवून तुम्हाला या व्यत्ययांना रोखणे शक्य आहे, मात्र व्यक्तिगत व्यत्ययांपासून दूर राहणे याहूनही मुश्कील आहे. व्यक्तिगत अथवा अंतर्गत व्यत्यय हे शारीरिक आणि मानसिक असू शकतात. शारीरिक व्यत्यय म्हणजे भूक लागणे, थकवा येणे, झोप येणे, पाठ दुखणे. मानसिक अडथळ्यांमध्ये व्यक्तिगत समस्येमुळे तणाव येणे, कटू अनुभव वारंवार आठवणे, कामांची यादी अशा गोष्टींची काळजी करणे अथवा सुटीवर जायचे या कल्पनेत रममाण होणे. अंतर्गत व्यत्ययांचे व्यवस्थापन करण्यासाठी पूर्वनियोजन आणि स्वयंशिस्त अत्यावश्यक ठरते.
पूर्वनियोजनाने शारीरिक अस्वस्थता कमी होते. खुर्चीमुळे पाठ दुखत असल्यास एखादी उशी वापरणे, भुकेवर उतारा म्हणून खाण्याच्या पदार्थाची पाकिटं बाळगणे अथवा पाठदुखीवर उपाय म्हणून आरामदायी बूट वापरणे ही पूर्वनियोजनाचीच उदाहरणे म्हणता येतील.
व्यक्तिगत समस्या आणि वेळेचा दबाव हाही कमी करता येणे शक्य आहे. प्राधान्यक्रमाने करायच्या कामांची नोंद केल्यास तुम्ही योग्य क्रमाने कामे पूर्ण करू शकता आणि दिवसाअखेरीस त्या नोंदी तपासताना तुमचा तणाव निवळू शकतो.

तणाव आणि आत्मसंतुष्टता
’डेडलाइन पाळण्यासाठी आलेल्या तणावामुळेही कामात व्यत्यय येऊ शकतो. उत्पादनविषयक लक्ष्य पूर्ण करण्याचा अथवा प्रोजेक्टची डेडलाइन पाळण्यासाठी ताण येतो, तेव्हा कामावरील लक्ष सुरक्षितता आणि दर्जा यांपासून उडते आणि ते काम लवकरात लवकर कसे पूर्ण करता येईल, त्याकडे वळते.
’काही वेळेस, नेहमीच्या कामाच्या उरकाबाबत काहींना फाजील आत्मविश्वास असतो आणि त्यामुळे त्यांचे लक्ष कामावरून उडते.
’कामाचा तणाव आणि आत्मसंतुष्टता या दोन्ही कारणांमुळे जेव्हा कामासंदर्भातील सुरक्षितता आणि महत्त्वाची माहिती यावरून लक्ष उडते तेव्हा मोठय़ा
चुका घडतात.
अशा चुका होऊ नयेत म्हणून..
’कामाची यादी बनवा.
’डेडलाइन पाळण्याच्या घाईगर्दीत आणि तणावाखाली केल्या जाणाऱ्या कामाचा दर्जा सातत्याने तपासा.
’शक्य असल्यास २५ मिनिटांनी एक लहानसा ब्रेक घ्या. या लहानशा विरामामुळे तुमच्या मनाला विश्रांती मिळते आणि मन टवटवीत होऊन तुमची
उत्पादनक्षमता वाढते.
’तुमच्यावर सोपवलेल्या मोठय़ा कामाचे लहान भाग पाडा म्हणजे ते काम तुकडय़ातुकडय़ांत करणे शक्य होते.
’कामात व्यत्यय आणणारे घटक लक्षात घ्या आणि त्यांना सामोरे जाण्यासाठी रणनीती बनवा.

तंत्रज्ञानामुळे येणारे व्यत्यय
’ अद्ययावत तंत्रज्ञानामुळे आज आपल्या भोवती माहितीचे अमर्यादित स्रोत आणि संवादाची साधने उपलब्ध आहेत, ज्यामुळे आपलं लक्ष कामावरून हटू शकतं. ईमेल्स, फोन, मेसेजची सूचना देणाऱ्या आवाजाने आपले लक्ष कामातून उडते. काही सेकंद आपलं लक्ष कामावरून दुसरीकडे हटल्याने काही फरक पडत नाही, असा आपण विचार करतो आणि स्मार्टफोनवरून संदेशांची देवाणघेवाण सुरू होते..
’ आपले फोन आपल्याला वेळ सांगतात, दिशा दाखवतात, त्याद्वारे आपल्याला फोटो काढता येतात, कुटुंबीय, मित्रपरिवार आणि कामाशी आपला संपर्क साधला जातो. या साधनांमुळे आपलं जगणं सोपं आणि मौजेचं बनलं आहे. पण हेच साधन आपलं लक्ष कामावरून हटण्याचं महत्त्वाचं कारण आहे. महामार्गावर होणाऱ्या अपघातांमध्ये फोनवर बोलत असल्याने होणाऱ्या अपघातांचे प्रमाण अधिक आहे.
’ई-मेल्स – अलीकडे ई-मेल्स
हे संवादाचे परिणामकारक आणि सोयीस्कर साधन बनले आहे, त्याचबरोबर ई-मेल्स हे तणावाचे आणि कामात व्यत्यय आणण्याचे साधनही बनले आहे. आलेल्या ई-मेलला लगेचच उत्तर दिल्याने कामं ताटकळत राहत नाहीत आणि तुमचा तणाव आणि अस्वस्थताही काबूत राहते. मात्र, काम करताना ई-मेल आल्याची सूचना देणारा आवाज आणि वायब्रेशन अ‍ॅलर्ट
बंद ठेवा.
’काम करताना अध्र्या तासाने ई-मेल चेक करा आणि आलेल्या मेलला उत्तर कधी द्यायचे ते ठरवा.
’इन्स्टंट मेसेजेस आणि टेक्स्ट हे सहकारी आणि मित्रांसमवेत संपर्कात राहण्याचे उत्तम साधन जरी असले, तरी सतत ऑनलाइन राहिल्याने कामात मोठे अडथळे येऊ शकतात. काम करताना तुमचे स्टेट्स बिझी ठेवा.
’ऑनलाइन राहण्याची वेळ ठरवून घ्या. त्या वेळातच तुम्हाला संपर्क करता येईल, हे इतरांच्या ध्यानी येईल.
’वेब हा आपल्या अनेक प्रश्नांची उत्तर देणारा स्रोत आहे. अध्ययनाची कौशल्ये, माहिती, बातम्या वाचण्याचे हे शक्तिशाली साधन आहे. वेब ब्राऊजिंग हा कामाचा आणि रंजनाचा उत्तम स्रोत आहे. मात्र त्यात मश्गूल राहिल्यास मुख्य कामापासून लक्ष विचलित होऊ शकते.
’ऑनलाइन असताना आपल्याला नेमके काय काम करायचे आहे ते लक्षात ठेवा. काम केल्यानंतर घेतलेल्या अल्पविरामात तुम्ही वेब ब्राऊजिंग करून मनाला ताजं करू शकता.
’काम सुरू करण्याआधी तुम्ही सोशल मीडिया आणि बातम्यांच्या साइट्स बघा. म्हणजे काम करताना त्यामुळे व्यत्यय येणार नाही.

Story img Loader