studyशाळा-महाविद्यालयांच्या वार्षिक परीक्षा जवळ आल्या आहेत. वर्षभर आपण शिकतच असतो, अभ्यासही करत असतो. आता मात्र, परीक्षेच्या दृष्टीने तयारी करायला हवी. त्याकरता काही पथ्ये पाळणे आवश्यक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

* आतापासून परीक्षेपर्यंतच्या कालावधीतील दिवसांचे पाच
टप्पे करा.
* प्रत्येक टप्प्यासाठी दिलेला वेळ, अभ्यासाची पद्धत, तंत्राचा वापर वेगळा असेल. ध्येय वेगळे असेल.
* त्याआधी आपले या परीक्षेपुरते ध्येय निश्चित करा. म्हणजे मला एकूण किती टक्के/गुण मिळवायचे आहेत. त्यासाठी प्रत्येक विषयात किती गुण मिळवावे लागतील, वगैरे.
* हे अंतिम ध्येय सतत आपल्या डोळ्यासमोर हवे. त्यासाठी ते रंगीत स्केचपेनांनी मोठय़ा अक्षरांत लिहून, सतत दिसेल अशा ठिकाणी ठेवा किंवा संगणक, मोबाईल यांच्या स्क्रिनवर टाका. यामुळे ते ध्येय सतत तुमच्या लक्षात राहील आणि त्यादृष्टीने तुमची धडपड आपोआप सुरू होईल.
* स्वत:चे ध्येय ठरवताना इतरांनी काय निश्चित केले, हे पाहण्याची गरज नाही. कारण आपण प्रत्येकजण वेगळे असतो. प्रत्येकाचे अंतिम ध्येय वेगळे असू शकते. कोणाला बोर्डात येण्याचे वेध लागले असतील तर कोणी केवळ ५० टक्के मार्कावर समाधान मानेल. यात चुकीचे किंवा गैर काही नाही.
* हे ध्येय अथवा लक्ष्य ठरवताना यापूर्वीच्या परीक्षांमध्ये मिळालेले गुण विचारात घ्या. तुमच्या इंटरेस्ट, अ‍ॅटिडय़ूड, अ‍ॅप्टिटय़ूड, आयक्यू चाचण्या करून घेतल्या असतील तर त्यांचे निष्कर्ष डोळ्यासमोर ठेवा. मात्र, आपल्या अपेक्षा वाजवी हव्यात. ना जास्त, ना कमी!
* आपल्याला जी परीक्षा द्यायची, तिचे स्वरूप स्पष्ट हवे. आवाका माहीत हवा. लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा, प्रोजेक्ट व वह्यांचे सादरीकरण इत्यादींचे मार्क, अंतिम मुदत इत्यादी तपशीलांची माहिती करून घ्या.
* अभ्यासाचा आवाका ठाऊक हवा. प्रत्येक विषयाचे किती धडे, किती प्रकरणे अभ्यासावी लागतील, किती भाग शिकवून झाला आहे, किती व्हायचा आहे याची अद्ययावत माहिती असणे आवश्यक आहे.
* आतापर्यंत न शिकवलेला भागही मनापासून वाचून काढा.
* काही वेळा शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था या परीक्षार्थीसाठी ‘परीक्षेची पूर्वतयारी’ या विषयावर व्याख्यानमाला, चर्चासत्रे आयोजित करतात. तुमच्या वेळापत्रकात बसत असल्यास तिथे जरूर उपस्थित राहा.

* प्रश्नपत्रिकेचे स्वरूप परिचयाचे असल्यास परीक्षेचा तणाव येत नाही. त्यासाठी तुमच्या शाळा- महाविद्यालयाच्या, बोर्डाच्या, इतर शाळा-महाविद्यालयांच्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करा.
* प्रश्नपत्रिका सोडवल्याने कोणत्या प्रश्नाचे उत्तर कसे लिहावे हे समजते. उत्तरपत्रिकेतील अक्षर, नीटनेटकेपणा, चौकटी, अधोरेखित शब्द, आकृत्या, नकाशांचा वापर काळजीपूर्वक करा. तुमच्या पूर्वपरीक्षा वा सहामाही परीक्षेच्या उत्तरपत्रिकेची मॉडेल उत्तरपत्रिकेशी तुलना करून पाहा. असे केल्याने तयारीतील उणिवा तुमच्या लक्षात येतील. त्या दूर करण्याचा प्रयत्न करता येईल.
* यातील मोठी उत्तरे, निबंध, कथा, पत्रे स्वअक्षरात उतरवून काढा.
* एक वेगळी फाईल तयार करा. फुलस्केपवर एकाच विषयाच्या किमान पाच प्रश्नपत्रिकांमधील प्रश्न गुणांनुसार एकत्र उतरवून काढा.
* वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमागे खुणा करून ठेवा.
* यामुळे कुठल्या भागावर मोठे प्रश्न विचारले जातात, हे लक्षात येईल.
* छोटे प्रश्न अथवा बहुपर्यायी प्रश्न एकत्र केल्यानंतर त्यांची उत्तरेही लिहा. म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रमावरील १०० टक्के प्रश्न तुमच्यापाशी उत्तरासकट तयार होतील.
* वारंवार त्याचे वाचन केल्यास वार्षिक परीक्षेपर्यंत ते पाठ होऊन जातील. ऐन परीक्षेच्या वेळी तुमचा वेळ मोडणार नाही. तसेच २०१४च्या वार्षिक परीक्षेतील प्रश्न शक्यतो या वर्षी विचारले जाणार नाहीत याची खात्री बाळगा.
* काही प्रश्न आव्हानात्मक असतात. उदा. ‘का’च्या बाराखडीतील प्रश्न. हे प्रश्नही नीट समजून घ्या.
मेंदूला वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा सराव व्हायला हवा. असे केल्याने आपल्याला वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे देणे सुकर होईल. मग चला तर. अभ्यासाला लागा.. यश तुमचंच आहे!