मानसी होळेहोन्नूर  mansi.holehonnur@gmail.com

उद्या २५ नोव्हेंबरला ‘जागतिक महिला हिंसाचार प्रतिबंधक दिवसा’निमित्त नेहमीप्रमाणे जगभरात अनेक ठिकाणी मोच्रे निघतील, काही चर्चासत्र, परिसंवाद रंगतील. पण हे सगळं जिच्यासाठी सुरू आहे ती स्त्री मात्र घरात, रस्त्यावर, कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्यांच्या शरीराच्या आरपार जाणाऱ्या नकोशा नजरा, स्पर्श सहन करतच असेल. स्वत:चं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी मारहाण करणाऱ्या पुरुषाविरुद्ध मूग गिळून बसलेली असेल. काही जणी अन्यायाविरुद्ध तोंड उघडायचा प्रयत्न करतील पण त्यांचे आवाज बंद केले जातील, हे सगळं बदलणार कधी हाच खरा प्रश्न आहे. जेव्हा तिला माणूस म्हणून स्वीकारलं जाईल तेव्हा मानवी अधिकार दिन किंवा स्त्री अत्याचार प्रतिबंध दिवस अशा दिवसांची कधीही गरज पडणार नाही..

Deportation of 101 criminals within Maval Vidhan Sabha Constituency Police Station limits Pune news
मावळचे वातावरण तापले! तालुक्यातून १०१ गुन्हेगार हद्दपार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
violence erupts in manipur after recovery of bodies
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; तीन मृतदेह सापडल्यानंतर नागरिक संतप्त; राजकीय नेत्यांच्या घरांवर हल्ले
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
Supreme Court order Uttar Pradesh government regarding bulldozer operation
अग्रलेख: नक्की काय बुलडोझ झाले?
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
Chirbil program of entertainment in Dombivli
डोंबिवलीकर किलबिल कार्यक्रमाची पोलिसांच्या १०० क्रमांकावर तक्रार

‘‘मार्था हे काय परत?’’

तिच्या डोळ्याच्या वरचा काळानिळा डाग बघून जेनीनं विचारलं, तेव्हा मार्था फक्त कसनुसं हसली.

‘‘बॉयफ्रेंड असतानाही मारहाण करत होता, आता नवरा झाल्यावर थोडीच ती सवय सोडेल.’’

‘‘तू का सहन करतेस? तू याविरुद्ध तक्रार केली पाहिजे, बंड करून उठलं पाहिजे, मी तुझ्यासोबत आहे.’’

‘‘मी तक्रार केली, याला सोडलं तरी नंतर जो कोणी भेटेल तो असाच नसेल कशावरून?’’

‘‘शाहीना, ही चौथी खेप आहे सहा वर्षांतली, नवऱ्याला सांग तू काही मशीन नव्हे!’’

त्या भागातली एकुलती एक डॉक्टर असलेली फातिमा शाहीनाला समजावून सांगत होती.

‘‘डॉक्टर, त्याला वाटतं मुलं जन्माला घालणं म्हणजे पुरुषत्व सिद्ध करणं आहे. त्यातही मुलगा जन्माला आला म्हणजेच ते होतं. आता पहिला मुलगा पण त्यापाठोपाठ दोन मुली झाल्या ना, आता ही जर पोरगीच झाली तर बहुधा दुसरा निकाहपण करेल तो.’’उगाच पायाचा अंगठा गोल गोल फिरवत पोटावरून हात फिरवत शाहीना बोलत होती.

तिच्यासारख्या, तिच्याहून वाईट परिस्थिती असलेल्या बायका बघून फातिमाला आपल्या परिस्थितीविषयी काही वाटणंच बंद झालं होतं. या बायकांना काय कपडे घालायचे याचंही स्वातंत्र्य नाही, तर मूल कधी जन्मायला घालायचं याचं स्वातंत्र्य मिळायला अजून किती वर्ष लागणार आहेत हे कुणीही सांगू शकणार नाही, याची खुणगाठ तिने कधीच बांधली होती.

‘‘ली, तू त्याला ओळखतेस, तरीपण पोलिसांकडे तक्रार का केली नाहीस?’’

‘‘जेंग, मी त्याची तक्रार केली तर माझ्यावरचं बलात्कारित हे लेबल जाणार आहे का?’’

‘‘पण तुझ्यावर बलात्कार झाला यात तुझी काय चूक होती? पण आता तू तक्रार न करून मात्र त्याला वाचवत आहेस.’’

‘‘मी लहान होते, तेव्हापासून माझ्यावर जबरदस्ती होतच होती की! तेव्हा मी काही बोलले नाही, आता बोलून तरी काय होणार आहे?’’

‘‘अफिया तू या लग्नाला हो तरी कशी म्हणालीस? अगं! तो तुझ्या वडिलांच्या वयाचा आहे.’’

‘‘बेकी मला कोणी विचारलं, तर मी हो किंवा नाही सांगेन ना?’’

‘‘पूजा, तू तुझ्या नवऱ्यावर बलात्काराची केस कशी काय दाखल केली?’’

‘‘अगं राधा, नवरा असला म्हणून काय झालं? लग्नसंस्था काही बलात्कार करायला परवानगी देत नाही.’’

वरच्या सगळ्या संवादांतली, मार्था, जेनी, शाहीना, फातिमा, ली, जेंग, अफिया, बेकी, पूजा ही नावं काढून तिथे अनिता, संपदा, ज्योती, किरण, नसीमा, दलजित कौर, डेलना, मारिया  असली नावं घालून हे वाचलं किंवा कुठलंही नाव कुठेही घातलं तरी चालू शकेल. हे सगळे आपल्यातलेच संवाद वाटतील. प्रगत, अप्रगत, प्रगतीशील कोणतंही लेबल असलेला देश असो, तिथल्या स्त्रियांची परिस्थिती थोडय़ाबहुत प्रमाणात एकसारखीच आहे. त्वचेचा रंग काळा असो किंवा गोरा, स्त्रियांवर होणारे वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार आजही सुरूच आहेत.

२५ नोव्हेंबरच्या ‘जागतिक महिला हिंसाचार प्रतिबंधक दिवसा’निमित्त आढावा घेताना हे सत्य पुन्हा एकदा प्रकर्षांनं जाणवलं.

स्त्रियांसाठी तसे सगळेच दिवस सारखेच असताना हा दिवस वेगळा का? या प्रश्नाच्या उत्तराचा शोध डॉमनिक रिपब्लिकच्या मीराबेल बहिणींपाशी जाऊन थांबतो. १९६० च्या सुमारास तिथल्या हुकूमशाहीच्या विरोधात लढा देणाऱ्या पॅट्रीआ, मिनव्‍‌र्हा, मरिया तेरेसा या तिघी बहिणींची २५ नोव्हेंबर १९६०ला हत्या केली गेली. त्यांची आठवण जागवत १९८१ मध्ये लॅटिन अमेरिकन आणि कॅरेबिअन स्त्रीकेंद्रित परिसंवादांमध्ये २५ नोव्हेंबर हा दिवस स्त्रियांविषयीच्या हिंसाचाराच्या विरोधाचा दिवस म्हणून पाळला जाण्याचं घोषित केलं गेलं. डिसेंबर १९९९मध्ये राष्ट्रसंघाकडूनदेखील यावर संमतीची मोहोर उमटवली गेली आणि हा दिवस दक्षिण अमेरिकेतच नव्हे तर इतरत्रदेखील पाळला जाऊ लागला. तेव्हापासून दर वर्षी हा दिवस ‘महिला हिंसाचार प्रतिबंधक दिवस’ म्हणून पाळला जातो आणि त्यानिमित्त जगभर वेगवेगळे कार्यक्रम केले जातात. एक छोटंसं घोषवाक्यदेखील त्याला दर वर्षी जोडलं जात असतं, जसं या वर्षीचं आहे orange the world : # hearmetoo. स्त्री-पुरुष यांच्यामधील असमानता, त्यातून होणारे हिंसाचार हे कोणत्याही देशापुरते, काळापुरते, समाजापुरते प्रश्न नाहीत. हे जागतिक प्रश्न आहेत. हिंसाचार हा फक्त शारीरिक पातळीवरचा नसतो. तो मानसिक, आर्थिक पातळीवरसुद्धा असतो. त्यामुळेच राष्ट्र संघाने हिंसाचार नक्की कशाला म्हटलं पाहिजे याचे काही निकष मांडले आहेत.

स्त्री-भ्रूणहत्या, मुलीच्या जन्मानंतर तिच्याकडे जाणीवपूर्वक केलेलं दुर्लक्ष, मुलींचं लैंगिक, शारीरिक, मानसिक शोषण, बालविवाह, सुंतासारखाच मुलींसाठी केला जाणारा विधी, जबरदस्ती वेश्या व्यवसायात ढकलणं, साथीदाराकडून, घरातल्या इतर सदस्यांकडून होणारी शारीरिक मारहाण, हुंडाबळी, बलात्कार, जबरदस्ती, फसवणूक, एखादीच्या शारीरिक वैगुण्यावर केलेली शेरेबाजी, लादलेली गर्भधारणा, आत्महत्येस प्रवृत्त करणं, अशा अनेक गोष्टींचा हिंसाचार या व्यापक संकल्पनेत समावेश केला जातो. दक्षिण आशियाचा विचार केला तर हुंडाबळी, ऑनर किलिंग यांचासुद्धा यात समावेश करता येतो. ऑनर किलिंगची दुष्प्रवृत्ती ही पार मध्य पूर्व आशियातले देश, आफ्रिकेतले काही देश यांच्यामध्येदेखील आढळते. शारीरिक हिंसाचार हा दृश्य असतो, मात्र मानसिक, आर्थिक हिंसाचार हा त्यापेक्षाही जास्त त्रासदायक असतो, कारण तो दिसत नसतो, पण सगळ्यात जास्त हानी करत असतो.

स्त्री-पुरुष हा निसर्गाने केलेला फरक केवळ पुनरुत्पादनाची व्यवस्था म्हणून केलेला आहे, बाकी दोघेही माणूस म्हणूनच ओळखले जातात. प्रश्न सगळे सुरू होतात, जेव्हा पुरुषांकडून स्त्रियांचा अनादर केला जातो. आदर देणं आणि बरोबरी करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. निसर्गातल्या इतर सर्व सजीवांमध्ये नर-मादी हे एकमेकांना पूरक वागत असतात, पण मनुष्यप्राण्यांमध्ये मात्र नरामध्ये कायम श्रेष्ठत्वाची भावना बघायला मिळते. मुळात निसर्गात कोणीही श्रेष्ठ, कनिष्ठ असा दुजाभाव नसतो सगळे जण सारखेच असतात. हिंसाचार हा बहुतांश वेळा स्वत:ची चूक लपवण्यासाठी, स्वत:चं स्थान अधोरेखित करण्यासाठी, मनमर्जी सांभाळण्यासाठी, भ्रामक कल्पना जोपासण्यासाठी केला जातो. यात हिंसाचार करणारा जेवढा दोषी असतो तेवढाच हिंसाचार सहन करणारादेखील. त्यामुळेच जसजशा बायका शिकत गेल्या त्यांना त्यांच्यावरच्या अन्यायाची जाणीव होत गेली, त्यातून त्यांच्यातल्या काही जणी बंड करण्यासाठी उभ्या राहिल्या. काहींनी त्यांना साथ दिली, तर काहींनी त्यांची अवहेलना केली. स्त्रीच स्त्रीच्या विरोधात असते असं सर्रास म्हटलं जातं. परंतु तसं क्वचित दिसतं. त्यालाच नियम म्हणून समोर ठेवणं हाही एक कावेबाजपणाच झाला. बहुतांश पुरुषच वेगवेगळ्या भूमिकांमध्ये शोषण, हिंसाचार करत असतो हे नाकारता येत नाही. मात्र याची जाणीव ठेवून आज अनेक पुरुषदेखील स्त्रियांवरच्या अन्यायाला विरोध करताना दिसत आहेत. हे परिस्थिती बदलत आहे याचंच एक निदर्शक म्हणता येईल.

अमेरिकेमध्ये घरगुती हिंसाचार पीडितांसाठी अनेक सामाजिक संस्था, हेल्पलाइन काम करत आहेत. केवळ तिथल्या नागरिकांसाठीच नव्हे तर तिथे व्हिसावर असणाऱ्या स्त्रियांनादेखील या संस्था मदत करतात. दक्षिण आशियाई देशांतल्या स्त्रिया, दक्षिण अमेरिकेतल्या स्त्रिया, आफ्रिकी स्त्रिया या सगळ्यांना काही संस्था त्यांच्या नवऱ्यापासून/ बॉय फ्रेंडपासून वाचवतात, त्यांचं पुनर्वसन करतात. अनेकदा अशा पीडित स्त्रियांना सहजगत्या नागरिकत्वदेखील मिळून जाते. अशीच काहीशी परिस्थिती युरोप, ऑस्ट्रेलियामध्येदेखील बघायला मिळते. हे असं सगळं जरी चांगलं असलं तरी या सगळ्याची दुसरी एक बाजूदेखील आहे, ती म्हणजे आजही अमेरिकेत अनेक राज्यांमध्ये कायदे वेगळे असल्या कारणाने समान घटनेकडे बघायचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि त्यामुळे गुन्ह्यचे निकषही बदलतात. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर गर्भधारणेचा अधिकार हा स्त्रीचाच असला पाहिजे, असं संयुक्त सभा म्हणते, पण अमेरिकेतच नाही तर ऑस्ट्रेलियाच्या काही भागांमध्ये, युरोपातल्या अनेक देशांमध्ये आजही गर्भपाताला कायदेशीर संमती नाही. त्यामुळे या स्त्रियांना बलात्कारातून झालेल्या गर्भधारणेतूनसुद्धा सुटका नसते. त्यामुळेच निव्वळ धर्माच्या, समाजाच्या चष्म्यातून बघण्याऐवजी स्त्रियांकडे माणूस म्हणूनदेखील बघितलं गेलं पाहिजे, याबाबतची जागृती सगळीकडे होणं अजूनही बाकी आहे.

हिंसाचार प्रतिबंध म्हणून हाच दिवस का? या प्रश्नाच्या उत्तराचा शोध डॉमनिक रिपब्लिकच्या मीराबेल बहिणींपाशी जाऊन थांबतो. १९६० च्या सुमारास तिथल्या हुकूमशाहीच्या विरोधात लढा देणाऱ्या पॅट्रीआ, मिनव्‍‌र्हा, मरिया तेरेसा या तिघी बहिणींची २५ नोव्हेंबर १९६०ला हत्या केली गेली. त्यांची आठवण जागवत १९८१ मध्ये लॅटिन अमेरिकन आणि कॅरेबिअन स्त्रीकेंद्रित परिसंवादांमध्ये २५ नोव्हेंबर हा दिवस स्त्रियांविषयीच्या हिंसाचाराच्या विरोधाचा दिवस म्हणून पाळला जाण्याचं घोषित केलं गेलं. डिसेंबर १९९९मध्ये राष्ट्रसंघाकडूनदेखील यावर संमतीची मोहोर उमटवली गेली आणि हा दिवस दक्षिण अमेरिकेतच नव्हे तर इतरत्रदेखील पाळला जाऊ लागला.

स्त्रियांवर अन्याय-अत्याचार हे वेगवेगळ्या स्तरांवर होत असतात, युद्धकैदी म्हणून होणारे बलात्कार, (या वर्षीची नोबेल विजेती नादिया मुराद हे त्याचं ढळढळीत उदाहरण आहे), ुमन ट्रॅफिकिंग, या सगळ्याबरोबरच #metoo  या हॅशटॅगखाली स्त्रिया/ मुली स्वतच्या अन्यायाला वाचा फोडत आहेत. #metoo मध्ये प्रामुख्याने लैंगिक शोषणाबद्दल अनेक जणी व्यक्त होत आहेत. एकीचं बघून दुसरी व्यक्त होत आहे. आजवर दडपला गेलेला आवाज आता सुटत आहे, ही एक नवी सुरुवातच म्हणावी लागेल. आधी स्वत:वर अन्याय झाला आहे हे माहिती असणं, त्यानंतर त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं आणि त्यानंतर अत्याचार करणाऱ्याला शिक्षा करवणं यातल्या पहिल्या पायरीवर आज अनेक जणी आहेत. या सगळ्यांमध्ये पुरुषांची भूमिका काय, या कळीच्या मुद्दय़ावर कोणीच बोलत नव्हतं, जणू काही स्त्रियांवर होणारे अत्याचार हा फक्त त्यांचाच प्रश्न आहे असाच काहीसा समाजाचा सूर होता. त्यामुळे अनेकदा स्त्रियांचे अत्याचारप्रतिबंधक मोच्रे, चर्चा म्हणजे फक्त स्त्रियांनी, स्त्रियांसाठी, स्त्रियांचे प्रश्न सोडवण्याचा केलेला प्रयत्न असंच त्याचं स्वरूप होतं. मात्र अनेक सहृदयी पुरुषांना याची जाणीव झाल्यामुळे तेदेखील या मोहिमेत सहभागी होत आहेत. जॅक्सन कात्र्झ या अमेरिकेत ‘टेड टॉक’ देणाऱ्या वक्त्याने त्यांच्या भाषणात हा मुद्दा मांडला. ते त्यांच्या भाषणात म्हणतात, ‘‘मुळात या सगळ्यांना बायकांचे प्रश्न असं संबोधून गल्लत केली जाते, हे तर मुळात पुरुषांचे प्रश्न आहेत, कारण ते पुरुषांमुळेच तर उद्भवलेले आहेत.’’ केवळ कात्र्झच नव्हे तर अनेक जणांनी अशा पद्धतीचे मुद्दे त्यांच्या ‘टेड’च्या भाषणामध्ये मांडले आहेत. पॅट्रिशिया शेया (Patricia Shea)हिने तिच्या भाषणात हाच मुद्दा सांगितला की, ‘‘स्त्रिया, मुली यांच्यावरचा अन्याय कधी थांबणार आहे, तर जेव्हा पुरुष, मुलं ते करायचं थांबवतील तेव्हा! त्यामुळेच तुमच्या मुलाला स्त्रियांना आदराने वागवलं पाहिजे, हे घरातूनच शिकायला मिळू दे. चांगली मुलंच नंतर चांगले वडील/ नवरा बनू शकतात.’’ त्यासाठी तिने तिच्या भाषणात अनेक जणांचे संदर्भ दिले आहेत. ज्या पुरुषांनी त्यांच्या त्यांच्या परीने स्त्रियांवरच्या अन्यायाला प्रतिबंध करण्यासाठी पावलं उचलली, त्याची उदाहरणं सांगितली आहेत. मध्य पूर्वेतल्या अनेक देशांमध्येदेखील स्त्री-सुधारणा होत आहेत, सौदी अरेबियासारख्या देशात आता स्त्रियादेखील गाडी चालवू शकतात, अनेक आफ्रिकी देशांत कामवाली मोलकरीण म्हणजेच गुलाम ही समजूत खोडण्यासाठी जागृती व्हावी म्हणून मोहिमा राबविल्या जात आहेत. अर्थात तिथली एकूण स्थिती बघून आपण अजूनही नेमकं कोणत्या शतकात आहोत असा प्रश्न पडतोच, पण काहीच नसण्यापेक्षा काही तरी असणं चांगलं असं म्हणत या सुधारणांचं स्वागत केलंच पाहिजे.

स्त्रियांना मुळात बरोबरीची वागणूक किंवा स्वत:चं वर्चस्व दाखवण्यापेक्षाही त्यांना त्यांचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य हे आजही अवघड लक्ष्य आहे. जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीचा माणूस म्हणून आदर करतो तेव्हा आपण त्याच्या निर्णयाचा, त्याच्या निवडीचादेखील आदर करतो. हे जेव्हा सहजपणे घडून येईल तेव्हाचा समाज हा खरा खरा सुसंस्कृत समाज असेल. आपल्या देशात समाजात आज पन्नास वर्षांपूर्वीची स्थिती राहिलेली नाही, खूप काही बदललं आहे. परंतु या बदलात जागृती कमी आहे आणि सोय जास्त आहे.

स्त्रियांना मुळात बरोबरीची वागणूक किंवा स्वत:चं वर्चस्व दाखवण्यापेक्षाही त्यांना त्यांचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य हे आजही अवघड लक्ष आहे. जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीचा माणूस म्हणून आदर करतो तेव्हा आपण त्याच्या निर्णयाचा, त्याच्या निवडीचादेखील आदर करतो. हे जेव्हा सहजपणे घडून येईल तेव्हाचा समाज हा खरा खरा सुसंस्कृत समाज असेल. आपल्या देशात समाजात आज पन्नास वर्षांपूर्वीची स्थिती राहिलेली नाही, खूप काही बदललं आहे. परंतु या बदलात जागृती कमी आहे आणि सोय जास्त आहे. आजच्या काळात स्त्रीच्या आर्थिक सहभागाची, मिळकतीची गरज प्रत्येक घराला भासू लागली आहे, त्यातून हे बदल घडत आहेत. घरात पसा आणणाऱ्या स्त्रीला मान मिळतो, परंतु आर्थिक नियोजन करताना तिचा सल्ला मात्र घेतला जात नाही, हे वास्तव आहे. स्त्रीला त्यातलं काही कळत नाही, असं सर्रास म्हटलं जातं. राजकारण, जागतिक घडामोडी याबाबतच्या चर्चामध्ये स्त्रिया स्वत:च अनेकदा ‘मला त्यातलं काही कळत नाही, माहिती नाही,’ अशी भूमिका घेताना दिसतात.

या २५ नोव्हेंबरलाही नेहमीप्रमाणे परत काही मोच्रे निघतील, काही चर्चासत्रं, परिसंवाद रंगतील. पण हे सगळं जिच्यासाठी सुरू आहे त्या स्त्रिया मात्र घरात, रस्त्यावर, कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्यांच्या शरीराच्या आरपार जाणाऱ्या नकोशा नजरा, स्पर्श सहन करतच असतील. स्वत:चं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी मारहाण करणाऱ्या पुरुषाविरुद्ध मूग गिळून बसलेल्या असतील. काही जणी अन्यायाविरुद्ध तोंड उघडायचा प्रयत्न करतील, पण त्यांचे आवाज बंद केले जातील, हे सगळं थांबण्यासाठी जो हे करतोय त्याला त्याच्या वागण्याची जाणीव करून देणं गरजेचं आहे. पुरुषत्व हे सिद्ध करायची गोष्ट नसते. आपल्या बरोबर असणारी स्त्री आपली आई, बायको, मुलगी, बहीण, मत्रीण, सहकारी किंवा अजून कोणी असू शकते, तिच्याकडे या सगळ्या नात्यांच्या पलीकडे जाऊन जेव्हा तिला माणूस म्हणून स्वीकारलं जाईल तेव्हा मानवी अधिकार दिन किंवा स्त्री-अत्याचार प्रतिबंध दिवस अशा दिवसांची गरज पडणार नाही.

मला एक स्वप्न बघायचं आहे,

जिथे बाबा आईला मारणार नाही,

जिथे शेजारचे काका मला

फ्रॉक वर करायला सांगणार नाहीत,

शाळेत आम्हाला ‘शिकून तू काय करणार?’ असं विचारणार नाहीत,

रात्री एकटीने जाताना मला कोणत्याही

पुरुषाची भीती वाटणार नाही

लग्न झालं म्हणून पिंकीसारख्या

कोणी शाळेत येणं बंद करणार नाहीत..

मला एक स्वप्न बघायचं आहे,

ज्यात मी माणूस असेन,

ज्यात माझी आई, तिची आई,

माझी मावशी, आत्या, काकू,

सगळ्या मुली फक्त माणूस असतील,

फार तर त्यांना बाई माणूस म्हणा,

पण माणूस शब्द नक्की लावलेला असेल

असं स्वप्न मला जगायचं आहे,

जिवंत असतानाच मला

हे स्वप्न जगायचं आहे..

chaturang@expressindia.com