शहरांतील वाढती गर्दी आणि शहरांच्या विस्तारासह, कारने लांबचे प्रवास होत आहेत. त्यामुळे भारतीय ग्राहकांना उत्तम मायलेजसह कार चालविण्याचा आरामदायी अनुभवाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे ऑटोमॅटिक कारची मागणी वाढत आहे. ही मागणी पाहता ‘ऑटोमॅटिक ट्रान्समिशन’ असलेल्या लहान कार आता परवडणाऱ्या किमतींमध्ये आणि विविध गियरबॉक्स पर्यायांमध्ये उपलब्ध होत आहेत.

आजच्या आधुनिक युगात वाहननिर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्या अस्तित्वात असून त्यांची विविध मॉडेल्स एकमेकांशी प्रचंड स्पर्धा करीत आहेत. वाहन म्हणजे त्यात चालक असे आजपर्यंत अपरिहार्य आहे. पण येणाऱ्या काळात विनाचालक वाहनप्रवास अगदी दृष्टीपथात आलेला आहे! त्या दृष्टीने वाहनांमध्ये आता ‘स्वयंचलित’ सुविधा उपलब्ध होत आहेत. त्यातीलच एक बदल म्हणजे गियरबॅक्स. वाहनचालकाला गियरचा वापर करून जे वाहन चालवावे लागते त्याला मॅन्युअल (मानवचलित) असे म्हटले जात असे. आता गियरविना वाहने बाजारात आली असून  त्याला ऑटोमॅटिक (स्वयंचलित) ट्रान्समिशन असे म्हटले जात आहे. भारतामध्ये, प्रमुख ऑटोमॅटिक ट्रान्समिशन तंत्रज्ञानांमध्ये ट्रॅडिशनल ऑटोमॅटिक ट्रान्समिशन (अळ), ऑटोमेटेड-मॅन्युअल ट्रान्समिशन (अटळ), कंटिन्युअसली व्हेरिएबल ट्रान्समिशन (उश्ळ), ड्वेल-क्लच ट्रान्समिशन (ऊउळ) आणि डायरेक्ट शिफ्ट गियरबॉक्स (ऊरॅ) यांचा समावेश आहे.

या विविध प्रकारांत सध्या भारतात अनेक कार बाजारात उपलब्ध आहेत. मात्र मॅन्युअल (मानवचलित) कारच्या तुलनेत या वाहनांच्या किमती अधिक आहेत. ऑटोमॅटिक ट्रान्समिशननुसार वाहनांच्या किमतीत वाढ होत आहे. आगदी ५० हजार ते दीड लाख रुपये अधिक वाहनचालकांना मोजावे लागत आहेत. त्यामुळे कारच्या मूळ किमतीही वाढत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना त्या परवडत नाहीत. मात्र आता कार उत्पादक कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढल्याने विविध ऑटोमॅटिक  ट्रान्समिशन असलेलेल्या अगदी दहा लाखांच्या आतही काही कार उपलब्ध झाल्या आहेत. १० लाखांच्या आत भारतीय बाजारात उपलब्ध असलेल्या पाच सर्वोत्तम ऑटोमॅटिक कारविषयी..

बाजारात नवीन काय?

यामाहाची निओ-रेट्रो एफझेड-एक्स मोटारसायकल

दुचाकींच्या वैविध्यतेत आता भारतातही विविध प्रकार उपलब्ध असतात. आपापल्या आवडीनुसार दुचाकी खरेदी करण्याकडेही अनेक दुचाकीप्रेमींचा कल दिसून येतो. यामाहा कंपनीची नव्याने बाजारात येणारी निओ रेट्रो दुचाकी ही जुन्या जमान्यातील म्हणजे ६० ते ८० च्या दशकांत उपलब्ध असलेल्या मोटारसायकल प्रकारातील दुचाकींची आठवण करून देणारे असे या दुचाकीचे डिझाइन करण्यात आले आहे. म्हणूनच याला निओ रेट्रो असे नाव देण्यात आले असावे. एअरकूल्ड, चार स्ट्रोक, १४९ सीसी इंजिन असलेली ही दुचाकी आहे. यामाहा वाय कनेक्ट अ‍ॅपशी जोडलेली ब्ल्यूटूथ तंत्रज्ञानयुक्त अशी ही दुचाकी आहे.   या दुचाकीच्या देखभालीशी संबंधित माहितीही या वाय कनेक्ट अ‍ॅपद्वारे दुचाकी मालकाला दिली जाते. याचे फायदे असे आहेत की, वाय कनेक्ट अ‍ॅप्लिकेशनद्वारे पार्किंगचे ठिकाण शोधणे, इंधन किती लागले त्याची माहिती घेणे यासारख्या गोष्टी समजतात. दुचाकीच्या मागील दिवे हे एलईडी आहेत. . मेटॅलिक ब्ल्यू, मॅट कॉपर, मॅट ब्लॅक अशा तीन रंगांमध्ये ही दुचाकी उपलब्ध असून याची एक्स शोरूम किंमत (दिल्ली) १ लाख १६ हजार ८०० आणि ब्ल्यूटूथयुक्त तंत्रज्ञानासह १ लाख १९ हजार ८०० रुपये इतकी आहे. जूनअखेरीस ही दुचाकी बाजारात येईल.

मारुती सुझुकी बलेनो/टोयोटा ग्लान्झा ‘सीव्हीटी’

मारुतीची बलेनो आणि टोयोटाची ग्लान्झा या दोन कारमध्ये विविध सुविधा असून या कार कार्यक्षम आहेत. ही कार हॅचबॅकमध्ये विश्वासार्ह पर्याय असल्याने तिला मागणी आहे. या दोन्ही कारमध्ये सीव्हीटी ट्रान्समिशन प्रणाली असून त्यामुळे कार चालविण्याचा सहज आणि आरामदायी अनुभव मिळतो. शहरामध्ये चालविण्यासाठी ही कार उत्तम पर्याय आहे.

’ किंमत: बलेनो – रु. ७.९१ लाख ते ९.३० लाख

’  ग्लान्झा – रु. ८.५४ लाख ते रु. ९.३० लाख (सर्व किमती शोरूम-बाह्य़)

फॉक्सवॅगन पोलो १.० ‘एटी’

फॉक्सवॅगन कंपनीची प्रमुख कार पोलो २०२० मध्ये तीन-सिलेंडर १.० टीएसआय इंजिन आणि ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टरमध्ये रूपांतरित झाली आहे. ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टरमुळे गाडी चालविण्याचा सहज आणि तो जलद अनुभव आहे. ही कार इंधनाच्या दृष्टीनेही जास्त कार्यक्षम आहे. याव्यतिरिक्त, पोलोच्या आधीपासूनच्या आरामदायी व सहज प्रवासाच्या ख्यातीमुळे नवीन १.० एटी या कारला मागणी आहे.

’ किंमत (पोलो एटी ): रु. ९.५९ लाख ते १० लाख (शोरूम-बाह्य़)

होंडा अमेझ ‘सीव्हीटी’

चांगली इंधन कार्यक्षमता देत असल्याने होंडा अमेझ सीव्हीटी प्रकारात ग्राहकांची आवडती झाली आहे. यासह कारमध्ये प्रशस्त जागा आणि आराम दायी सुविधाआहेत. पेट्रोल आणि डिझेल दोन्हींमध्ये कार उपलब्ध आहे. होंडा अमेझ ही भारतामधील पहिली आणि एकमेव अशी डिझेल सीव्हीटी आहे. या होंडाच्या सेदान कारला सुरुवातीपासूनच चांगली मागणी आहे.

’ किंमत: रु. ७.९३ लाख ते रु. १० लाख (शोरूम-बाह्य़)

हुंडाई व्हेन्यू १.० टबरे ‘डीसीटी’

मध्यम आकारातील ही एसयूव्ही तिच्या आकर्षक दिसणे, आधुनिक सुविधा आणि ऑटोमॅटिक गियरबॉक्स पर्याय यामुळे तसेच १० लाखांच्या आत उपलब्ध असल्याने ग्राहकांमध्ये प्रसिद्ध आहे. टबरे व्हर्जनचे फीचर म्हणजे ११८ बीएचपी तीन-सिलेंडर टबरेचार्ज पेट्रोल इंजिन, अत्याधुनिक ७-स्पीड ड्वेल-क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन. ही रचना दररोजच्या ड्रायव्हिंग आणि हाय-स्पीड क्रुजिंगसाठी सोयीस्कर आहे. कारण हा गियरबॉक्स सहज आणि शक्तिशाली आहे.

’ किंमत: रु. ९.७८ लाख (शोरूम-बाह्य़)

निसान मॅग्नाइट/रेनॉल्ट काइगर सीव्हीटी

रेनॉल्ट-निसान भागीदारीत दोन्ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही असून भरपूर सुविधा आहेत आणि भारतामध्ये त्यांची विक्रीसुद्धा जास्त आहे. दोन्ही कारमध्ये सारखेच अंडरपिनिंग्स आणि ड्राइव्हट्रेन पर्याय आहेत. मॅग्नाइट सीव्हीटी ही एल, व्ही आणि व्ही प्रीमियम या तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. काइगर ही -ट्रोनिक सीव्हीटीमध्ये असल्याने ती दोन आरएक्सटी आणि आरएक्सझेड या दोन प्रकारांत उपलब्ध आहे.

’ किंमत (मॅग्नाइट): रु. ८.३९ लाख – रु. ९.८९ लाख (शोरूम-बाह्य़)

रेनॉल्ट-निसान भागीदारीत दोन्ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही असून भरपूर सुविधा आहेत आणि भारतामध्ये त्यांची विक्रीसुद्धा जास्त आहे. दोन्ही कारमध्ये सारखेच अंडरपिनिंग्स आणि ड्राइव्हट्रेन पर्याय आहेत. मॅग्नाइट सीव्हीटी ही एल, व्ही आणि व्ही प्रीमियम या तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. काइगर ही -ट्रोनिक सीव्हीटीमध्ये असल्याने ती दोन आरएक्सटी आणि आरएक्सझेड या दोन प्रकारांत उपलब्ध आहे.

’ किंमत (मॅग्नाइट): रु. ८.३९ लाख – रु. ९.८९ लाख (शोरूम-बाह्य़)

किंमत (काइगर ): रु. ८.६० लाख – रु. ९.७५ लाख (शोरूम-बाह्य़)