मोबाईल नंबर 10 अंकांऐवजी 11 अंकी होणार नाही, असे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI)स्पष्ट केले आहे. पण, लँडलाइनवरुन मोबाइल नंबरवर कॉल करण्याआधी ‘0’लावण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू असल्याचं TRAI कडून रविवारी(दि.30) सांगण्यात आलं आहे.

TRAI ने मोबाईल नंबर 10 अंकांऐवजी 11 अंकांचा करण्याच्या प्रस्तावाला नकार दिला आहे. त्यामुळे मोबाईल नंबर 10 अंकांचेच राहतील हे ट्रायने स्पष्ट केलंय. पण, लँडलाइनवरुन मोबाइल नंबरवर कॉल करण्याआधी ‘0’लावण्याचा सल्ला दिल्याचं ट्रायने सांगितलं आहे. ‘0’लावल्यामुळे डायलिंग पॅटर्नमध्ये बदल होऊन मोबाइल सर्व्हिससाठी अतिरिक्त 2544 मिलियन नंबर वाढतील असे सांगण्यात आले.

’10 ऐवजी 11 डिजिटचे क्रमांक केल्यास देशात अधिक मोबाईल क्रमांक उपलब्ध होतील. जर, मोबाईल क्रमांकाच्या सुरूवातीचा क्रमांक 9 हा ठेवण्यात आला तर 10 वरून 11 डिजिटवर स्विच झाल्यानंतर देशातील मोबाईल क्रमांकाची क्षमता 10 अब्ज होईल’, असा प्रस्ताव ट्रायने दिल्याचं वृत्त काही माध्यमांनी शुक्रवारी दिलं होतं. मात्र मोबाईल नंबर 10 अंकांचेच राहतील असे स्पष्टीकरण ट्रायकडून देण्यात आले आहे.