आयफोनबाबत अनेक युजर्स तक्रार करत आहेत. काही दिवसांपूर्वी आयफोनच्या ‘टच स्क्रीन’बाबत युजर्सना समस्या जाणवत होती. आता आयफोनमध्ये अजून एका समस्येचा युजर्सना सामना करावा लागत आहे. आयफोनवर टेक्स्ट मेसेजचं नोटिफिकेशन मिळत नसल्याची तक्रार युजर्स सोशल मीडियावर करत आहेत.

जर तुम्हालाही तुमच्या आयफोनवर टेक्स्ट मेसेजचं नोटिफिकेशन मिळत नसेल तर चिंता करण्याची गरज नाही. कारण, तुम्ही एकटेच असे नाही आहात. जगभरातील अनेक आयफोन युजर्सकडून टेस्क्ट मेसेज आल्यानंतर पॉप-अप नोटिफिकेशन मिळत नसल्याची तक्रार केली आहे. याशिवाय अ‍ॅपमध्ये रेड डॉट देखील दिसत नसल्याची तक्रार युजर्सनी केली आहे. रेड डॉटद्वारे एखादा मेसेज आल्याचं युजर्सना समजतं.

या आयफोन मॉडेल्समध्ये समस्या :-
गेल्या महिन्यातच MacRumors ने आपल्या रिपोर्टमध्ये, iPhone 12, 12 mini, 12 Pro आणि 12 Pro Max या मॉडेल्समध्ये टेस्क्ट मेसेजचं नोटिफिकेशन मिळत नसल्याचं म्हटलं होतं. पण आता जुन्या मॉडेल्समध्येही ही समस्या जणवत असल्याचं समजतंय. अ‍ॅपल कम्युनिटी फोरमवर काही युजर्सनी केलेल्या तक्रारीनुसार, iOS 14 साठी अपडेट केल्यानंतर त्यांना टेक्स्ट मेसेजबाबतची समस्या जाणवायला लागली. त्यामुळे iOS 14 मध्ये आलेल्या एखाद्या बगमुळे आयफोन युजर्सना ही समस्या जाणवत असल्याचं सांगितलं जात आहे.

आणखी वाचा- Gmail वापरणाऱ्यांसाठी ‘गुड न्यूज’, आता Attachments मध्येच डॉक्युमेंट्सही करता येणार Edit

युजर्सकडून तक्रार :-
काही युजर्सनी ही समस्या सतत नाही पण कधीकधी जाणवत असल्याचं म्हटलं आहे. तर, काहींनी स्क्रीन लॉक असताना नोटिफिकेशन व्यवस्थित मिळत असल्याचं नमूद केलं आहे. पण, अद्याप अ‍ॅपलकडून हा बग फिक्स करण्यासाठी अपडेट जारी करण्यात आलेलं नाही.

iPhone 11 टच स्क्रीन समस्या :-
दरम्यान, काही दिवसांपूर्वी युजर्सकडून टचस्क्रीनबाबत तक्रारी आल्यानंतर कंपनीने iPhone 11 साठी फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट प्रोग्रॅम लाँच केला आहे. याअंतर्गत iPhone 11 चे युजर्स फ्रीमध्ये स्क्रीन बदलू शकतात. नोव्हेंबर 2019 ते मे 2020 मध्ये ज्या iPhone 11 मॉडेल्सचं प्रोडक्शन झालंय त्यामध्ये टचस्क्रीनची समस्या जाणवत आहे. फीमध्ये स्क्रीन रिप्लेसमेंटसाठी कंपनीने आपल्या वेबसाइटवर सपोर्ट पेजही लाइव्ह केलं आहे. जर तुमच्याकडे iPhone 11 असेल तर तुम्ही फोनच्या सेटिंग्समध्ये जाऊन सीरियल नंबरची माहिती काढू शकतात. यासाठी Settings > General > About अशा तीन स्टेप फॉलो करा. अ‍ॅपलच्या सपोर्ट पेजवर फोनचा सीरियल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला जवळच्या अ‍ॅपल सर्व्हिस सेंटरची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल.