रिलायन्स जिओकडून कायमच आपल्या ग्राहकांना एकाहून एक ऑफर्स देत खूश करत असते. व्हॅलेंटाईन डे एक दिवसावर आला असताना जिओने आपल्या ग्राहकांना आणखी एक सुखद धक्का दिला आहे. आता जिओचा फोन वापरणाऱ्या ग्राहकांना आता या फोनवर फेसबुक वापरता येणार आहे. इतके दिवस या मोबाईलवर फेसबुक वापरणे शक्य होत नव्हते. मात्र आता जिओने आपल्या ग्राहकांसाठी ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. जिओ फोनचे युजर्स व्हॅलेंटाईन डे पासून या सुविधेचा लाभ घेऊ शकतात असे जिओकडून सांगण्यात आले आहे.

व्हॅलेंटाईन डे पासून जिओ अ‍ॅपस्टोरवरून फेसबुक अ‍ॅप डाऊनलोड करू शकतील. फेसबुक अ‍ॅपचं हे खास व्हर्जन जिओच्या ऑपरेटींग सिस्साटीमसाठी तयार करण्यात आलं आहे. यामध्ये पुश-नोटिफिकेशन, व्हिडिओ आणि एक्सर्नल कंटेट लिंक असे काही फीचर्स असतील. याबाबत जिओचे मुख्य आकाश अंबानी म्हणाले की, फेसबुक तर केवळ सुरूवात आहे. येत्या काळात जिओफोन जगातली सगळ्यात चांगली मोबाईल अ‍ॅप एकाच जागी आणतील. त्यामुळे जिओ आपल्या ग्राहकांना विविध गोष्टींचा आनंद

जिओसोबत भागीदारी करून आम्ही आनंदी आहोत. जिओ फोनच्या माध्यमातून फेसबुकचा वापर करण्याची ही मोठी संधी आहे असे मत फेसबुकचे उपाध्यक्ष फ्रांसिस्को वरेला यांनी व्यक्त केले. जिओचा हा ४जी फिचर फोन ग्राहकांच्या चांगलाच पसंतीस पडला होता. केवळ दिड हजार रुपये डिपॉझिट देऊन ग्राहकांना हा फोन मिळतो. हा फोन लाँच केल्यानंतर काही वेळातच ग्राहकांकडून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे कंपनीने काही काळासाठी हे बुकींग बंदही केले होते.

Story img Loader