भारतात ऑटो क्षेत्रातील मंदीमुळे ग्राहकांना अधिकाधिक प्रमाणात आकर्षित करण्यासाठी कार कंपन्या विविध प्रकारे सवलत देत आहेत. आता अग्रगण्य कंपनी टाटाकडून आपली लोकप्रिय कार टाटा हॅरियरवर ६५ हजार रुपयांची सवलत दिली जात आहे.

जानेवारी महिन्यात टाटा हॅरियर लाँच झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत कंपनीकडून या कारवरील ही सर्वाधिक सवलत आहे. या कारवर ३५ हजार रुपयांची एक्स्चेंज ऑफर आहे. याशिवाय १५ हजार रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट, तसंच १५ हजार रुपये अतिरिक्त एक्स्चेंज बोनस ऑफरही कंपनीकडून आहे. अशाप्रकारे कंपनीकडून एकूण ६५ हजार रुपयांची सवलत दिली जात आहे.

हॅरिअर ही एसयूव्ही ऑप्टिमल मोडय़ूलर एफिशियन्ट ग्लोबल अ‍ॅडव्हान्स्ड (ओमेगा) आर्किटेकवर उभारण्यात आली आहे. इम्पॅक्ट डिझाइन २.० या टाटाच्या श्रेणीतील हॅरिअर ही पहिली गाडी आहे. हॅरिअर ही गाडी आमच्या टर्नअराऊंड २.० धोरणाचा एक उत्तम पुरावा आहे आणि ती बाजाराचे रूप पूर्णपणे पालटून टाकेल. असा विश्वास कंपनीचा आहे. नवीन हॅरिअर ही टाटाच्या आतापर्यंतच्या महागडय़ा गाडय़ांपैकी एक आहे; परंतु या गाडीला ग्राहक चांगला प्रतिसाद देतील असा आशावाद कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

हॅरिअरमध्ये फ्लोटिंग रूफ बोल्ड क्रोम फिनिशरसोबत, वर आलेले व्हील आर्चेस, डय़ुएल फंक्शन एलईडी डीआरएल्समुळे गाडीचा लुक बोल्ड ठेवण्यात आला आहे. गाडीच्या हेडलाइटचे डिझाइन अपारंपरिक असल्यामुळे लक्षवेधक ठरते. गाडीच्या वरच्या बाजूला डीआरएल (डेटाइम रनिंग लॅम्प) देण्यात आले आहेत. हे टर्न इंडिकेटर म्हणूनदेखील वापरता येतील. गाडीचे हेडलाइट फॉग लाइटच्या जवळ दिले आहेत. गाडीचे टेललाइट हे लांबडे असून गाडीच्या एकंदर शैलीशी सुसंगत आहेत. गाडीला १७ इंचाचे टायर देण्यात आले आहेत. चाकांच्या डिझाइनमध्ये फार नावीन्य दिसून येत नाही. गाडीच्या बाजूचे खड्डे दिसण्यासाठी पडल लॅम्प देण्यात आले असून त्यात हॅरिअरचा लोगो दिसतो. हॅरिअर लँड रोव्हरच्या डी८ वर आधारित आहे.

गाडीच्या इंटीरियरवर टाटाने विशेष मेहनत घेतली आहे. बजेट गाडय़ा तयार करणाऱ्या टाटाने हॅरिअरचे केबिन आलिशान करण्याकडे भर दिला असून ते दिसून येते. डॅशबोर्डला वूडन पॅनल दिले असून टाटाच्या गाडीमध्ये अशा प्रकारचे इंटीरियर पाहणे एक सुखद धक्का आहे. त्याचप्रमाणे गाडीत दोन स्क्रीनचा टच पॅनल देण्यात आला आहे. ८.८ इंचच्या स्क्रीनवर टाटाचा टचस्क्रीन इंटरफेस वापरू शकता. यावर अ‍ॅपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो वापरण्याची सुविधा आहे. तुमच्या स्मार्टफोनला जोडलेला असतानाही या पॅनेलवर गाडीची मूळ सेटिंग वापरण्याचा पर्याय देण्यात आला आहे. पॅनेलची कामगिरी समाधानकारक असून सुधारणांना वाव आहे. इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये दुसरी स्क्रीन देण्यात आली आहे. गाडीचा टॉप मॉडेल एक्सझीमध्ये जेबीएलच्या नऊ स्पीकरची यंत्रणा देण्यात आली आहे. देखणेपणाला उपयोगिततेचा साज चढवणे हे टाटाचे वैशिष्टय़ आहे आणि गाडीच्या कॅबीनची मांडणी आणि देण्यात आलेल्या सुविधांकडे पाहून हे जाणवते.

गाडीत पॉवर ड्राइव्हर सीट नसून चालकाच्या खुर्चीची उंची कमी किंवा जास्त करण्यासाठी ऑटोमॅटिक सुविधा यात देण्यात आली नाही. गाडीच्या दरवाजांना कप्पे देण्यात आले असून त्यात पाण्याची बाटली आणि मोबाइल सहज ठेवता येतो. मात्र डॅशबोर्डच्या खालच्या बाजूला यूएसबी पोर्टसाठी देण्यात आलेली जागा थोडी अडचणीची वाटते. गाडीच्या हँडब्रेकच्या लिव्हरची यंत्रणा अत्यंत वेगळी ठेवण्यात आली आहे. गाडी प्रवाशांसाठी सुरक्षित ठेवण्यासाठी कंपनीने काळजी घेतली असल्याचे दिसते. गाडीच्या सर्व मॉडेलमध्ये दोन, तर टॉप मॉडेलमध्ये सहा एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत. याशिवाय एबीएस, ट्रॅक्शन कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल होल्ड, कॉर्नर स्टॅबिलिटी कंट्रोल, ऑफरोड एबीएस आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. गाडीमध्ये ४२५ लिटर बूटस्पेस देण्यात आली आहे. मागील सीट खाली केल्यानंतर या बूटस्पेसमध्ये अधिक भर पडते.

आणखी वाचा- किंमत फक्त २.८३ लाख; पाच हजारांत बुकिंग, ‘मारुती’च्या मायक्रो SUV ला नवीन Kwid चं आव्हान

गाडीत दोन लिटरचे डिझेल इंजिन देण्यात आले असून सहा स्पीडचा मॅन्युअल गिअर बॉक्स आहे. गाडीची कामगिरी थरारक नसली तरी ती अपेक्षित कामगिरी बजावते. गाडीचे इंजिनदेखील व्यवस्थित प्रतिसाद देते. वजन आणि आकार पाहता हॅरिअर हाताळण्यास अतिशय सोपी आहे. एका गिअरमधून दुसऱ्या गिअरमध्ये जाण्याची प्रक्रिया अतिशय सहज आहे. तुम्हाला गाडीकडून वेग हवा असल्यास तुम्ही स्पोर्ट्स मोड वापरू शकता. तरी सामान्य वेगावर इको मोडवर गाडी ठेवता येते.

हेक्साप्रमाणेच या गाडीतदेखील रस्त्यांप्रमाणे गाडीचा मोड बदलण्याची सुविधा आहे. म्हणजे महामार्ग त्याचप्रमाणे खराब रस्त्यांतूनदेखील गाडी कोणत्याही अडचणीशिवाय मार्गक्रमण करू शकते. गाडीत हायड्रॉलिक स्टेअरिंग देण्यात आले असून महामार्गावर या स्टेअरिंगमुळे रस्त्यावर नियंत्रण ठेवणे सोपे होते. गाडीच्या केबिनमधील आवाज कमी करता आला असता तर प्रवासाचा अनुभव नक्कीच उंचावला असता. त्याचप्रमाणे गाडीमध्ये सनरूफ नसल्याने तो एक अभाव प्रकर्षांने जाणवतो. गाडीमध्ये ऑल व्हील ड्राइव्हचा पर्याय नसून नजीकच्या काळात तो येण्याची शक्यतादेखील कमी आहे. हॅरिअरने बाजाराचे लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला असून एक वल्ल इंजिन : २. लिटर

* ४ सिलेंडर, टबरे चार्जर

* ताकद: १३८@ ३७५० आरपीएम

* टॉर्क : ३५०एनएम@ १७५०-२५०० आरपीएम

* ट्रान्समिशन: ६ स्पीड, मॅन्युअल

* किंमत : १२.९९ लाख ते १७.९९ लाख

मुंबईतील एक्सशोरूम किंमत

* एक्सई : १२.६९ लाख

* एक्सएम : १३.७५ लाख

* एक्सटी : १४.९५ लाख

* एक्सझी : १६.२५ लाख

रंग : कॅलिस्टो कॉपर, थर्मिस्टो गोल्ड, एरियल सिल्व्हर, टेलेस्टो ग्रे आणि ऑर्कस व्हाइट.ेगळ्या शैलीची आणि टाटाच्या विश्वासाला साजेशी गाडी दाखल केली आहे.

इन्फोटेन्मेंट
गाडीत फ्लोटिंग आयलँड टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम ८.८ इंची हाय रेझोल्यूशन डिस्प्लेसह येत असून अँड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅपल कार प्लेची सुविधा आहे. गाडीत ३२० डब्ल्यू आरएमएस जेबीएल ऑडिओ यंत्रणा ९ स्पीकर्ससोबत (४ स्पीकर्स + ४ ट्विटर्स + १ सबवूफर) देण्यात आली आहे.
* एक्सई, एक्सएम, एक्सटी आणि एक्सझी अशा चार व्हेरिएंटमध्ये हॅरिअर येणार आहे.