डॉ. नेहा कर्वे, स्त्रीरोगतज्ज्ञ

प्रसूतीवेदना आणि बाळाला जन्म देणे हे स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ असतो. या काळात शरीरातील संप्रेरकांच्या पातळीत होणारे बदल, मानसशास्त्रीय आणि जैविक बदल इतके टोकाचे असतात की त्यामुळे ती प्रचंड मोठय़ा शारीरिक व भावनिक स्थित्यंतरातून जाते. नवमातेच्या इतर व्यक्तींशी असलेल्या संबंधांमध्ये, तिच्या कौटुंबिक विश्वामध्ये प्रचंड बदल घडून येतात. त्यामुळे काही स्त्रियांना नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्यात काही अडचणी येतात, तर इतर काही स्त्रियांच्या मन:स्थितीमध्ये होणारा बिघाड अतिशय गंभीर आणि कमकुवत करणारा असू शकतो. याच स्थितीला ‘पोस्टपार्टम डिप्रेशन’ म्हणजे प्रसूतीपश्चात येणारे नैराश्य असे म्हणतात.

nestle controversy
Nestle Controversy : नेस्लेच्या बेबी फूडमध्ये साखरेचे प्रमाण जास्त; साखर आरोग्यासाठी घातक का?
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता

अनेकदा पोस्टपार्टम डिप्रेशनचा त्रास सहन करणाऱ्या स्त्रियांची व्यथा मूकच राहते. त्यांची मनोवस्था कुणाच्याही लक्षात येत नाही. म्हणूनच अशा स्थितीतून जाणाऱ्या स्त्रिया ओळखणे आणि त्यांना या मन:स्थितीसाठी योग्य ते उपचार मिळवून देण्यास मदत करणे हे एक समाज म्हणून आपले कर्तव्य आहे.

गरोदरपणा आणि प्रसूतीनंतर उद्भवू शकणाऱ्या मानसिक समस्या बाळाला जन्म दिलेल्या स्त्रीमध्ये आढळून येणाऱ्या मानसिक आरोग्यासंबंधीच्या समस्या या पोस्टपार्टम ब्लूपासून क्लिनिकल डिप्रेशनपर्यंत अनेक प्रकारचे असू शकतात. १२-१३ टक्के महिला गरोदरपणाच्या काळात नैराश्य आणि चिंतातुरता अनुभवतात. बाळाला जन्म दिल्यानंतरच्या पहिल्या वर्षांमध्ये तर हा धोका १५-२० टक्के इतका जास्त असू शकतो.

पोस्टपार्टम सायकोसिस हा एक गंभीर स्वरूपाचा भीतीदायक मानसिक आजार आहे, जो अशा आजारांचा अगदी कमी धोका असलेल्या महिलांमध्येही उद्भवू शकतो. या आजाराला तातडीच्या मानसोपचाराची गरज असते. कारण त्यामुळे मातेच्या जीवाला तसेच तिच्या बाळाच्या जीवाला धोका संभवू शकतो. बाळाला जन्म दिलेल्या प्रत्येक १००० स्त्रियांमधील १-२ स्त्रियांवर याचा परिणाम झालेला दिसतो. याशिवाय जनरलाइझ्ड एन्ग्झायटी डिसॉर्डर, पोस्ट ट्रॉमॅजिक स्ट्रेस डिसॉर्डर (पीटीएसडी) आणि ऑब्सेसिव्ह कम्प्ल्सरी डिसॉर्डर अशा समस्याही दिसून येतात. गरोदरपणाशी संबंधित एक विशिष्ट मानसिक स्थिती म्हणजे टोकोफोबिया, ज्यात प्रसूती, प्रसूतीवेदना यांविषयी टोकाची भीती वाटते.

गरोदरपणाच्या दरम्यान अमली पदार्थाचे सेवन करणे हा काही नवा प्रकार नाही आणि त्याचा माता आणि जन्माला न आलेले बाळ या दोघांवरही परिणाम होऊ  शकतो. या काळात खाण्याच्या सवयींशी संबंधित आजारही (इंटिंग डिसऑर्डर) नव्याने होऊ  शकतात किंवा आधीपासून असलेल्या समस्या गरोदरपणामध्ये पुन्हा डोके वर काढू शकतात.

गरोदर स्त्रियांमधील मानसिक समस्या कशा ओळखाव्या?

गरोदर स्त्रीशी प्रेमाने वागणे आणि काळजी घेणे ही महत्त्वाची जबाबदारी  मित्रमंडळी आणि कुटुंबातील सदस्यांची असते. अशा महिलेशी बोलणे, तिने प्रसूतीचा काळ कसा घालवला याची विचारपूस करणे, तिला उदास वाटत आहे का, मन भरून येत आहे का याची चौकशी करणे अशा साध्या कृतींमुळे तिच्या मनात दबलेल्या भावना बाहेर पडू शकतात. घरच्या कामांमध्ये मदत करणे, तिला पुरेशी झोप मिळेल याची काळजी घेणे, तिच्या व्यावसायिक कामांमध्ये तिला मदत मिळावी यादृष्टीने प्रयत्न केल्यास तिच्या मनावरील ओझे कमी करण्याच्या कामी दूरगामी परिणाम होऊ  शकतो. तिच्या वागण्यात काही बदल जाणवल्यास किंवा ती आपल्या स्वभावापेक्षा वेगळे वागत असताना दिसल्यास व्यावसायिक तज्ज्ञांची मदत घ्या. गरोदर किंवा स्तनदा मातांची काळजी घेणारे डॉक्टर प्रत्येक भेटीच्या वेळी त्यांच्या मानसिक स्वास्थ्याविषयी आवर्जून प्रश्न विचारतात. त्यामुळे स्त्रीच्या वर्तणुकीत काही बदल दिसून आल्यास असे बदल डॉक्टरांच्या लक्षात आणून द्यायलाच हवेत.