ख्यातनाम ब्रिटिश कार निर्माता कंपनी एमजी मोटर (मॉरिस गॅरेज) ‘हेक्टर’ ही कार लाँच केल्यानंतर आता भारतात बस्तान मांडण्याच्या तयारीत आहे. येत्या वर्षात या कंपनीद्वारे भारतात विजेवर धावणारी ‘एसयूव्ही’आणण्याची घोषणा कंपनीच्या व्यवस्थापनाने केली आहे. या महिन्याच्या सुरूवातीलाच कंपनीने आपली इलेक्ट्रीक एसयूव्ही झेडएस सादर केलीये((MG ZS electric SUV)). ही एसयूव्ही पुढील वर्षी जानेवारी महिन्यात लाँच होणार आहे. भारतात सध्या धावत असलेल्या विद्युत कारच्या तुलनेत एका चार्जिगमध्ये अधिक अंतर कापणारी आणि झटपट चार्जिगची सुविधा असलेली ही कार अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल असं कंपनीने म्हटलंय.

स्पेसिफिकेशंस काय?
या कारमध्ये इंटरनेट, कृत्रिम प्रज्ञा (आर्टिफिशियल इंटिजिजन्स), बिग डेटा, क्लाऊड कम्प्युटिंग अशा अद्ययावत तंत्रज्ञानाचा अंतर्भाव केला जाईल. या इलेक्ट्रीक एसयूव्हीZS मध्ये 44.5 kWh क्षमतेची बॅटरी असेल. एकदा चार्ज केल्यानंतर ही कार जवळपास 340 किमीचा प्रवास ही कार करु शकेल. ही कार केवळ 8.5 सेकंदात ताशी 100 किमी गती प्राप्त करून शकते, असा कंपनीचा दावा आहे. यातील मोटर 353 एनएम इन्स्टंट टॉर्क आणि 143 पीएस पॉवर देते. एमजी झेडएस ईव्हीमध्ये 8.0 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम देण्यात आली आहे. जी Apple carplay कारप्ले आणि Android ऑटोला सपोर्ट करते. यात फ्लॅट बॉटम स्टिअरिंग व्हील, युएसबी मोबाइल चार्जिंग फ्रंट अँड रियर, ब्लूटूथ आणि रीअर व्ह्यू कॅमेरा आहे.

आणखी वाचा – डिस्काउंटचे अखेरचे दिवस, या गाड्यांवर 14 लाखांपर्यंत सवलत

किंमत किती? दिल्ली-एनसीआर, मुंबई, बेंगळुरू, अहमदाबाद आणि हैदराबादमधून या कारची विक्री सुरू होईल. सुरुवातीचे काही महिने 100 कारचे उत्पादन करण्यात येणार असून मागणी वाढल्यानंतर दर महिन्याला 200 ते 300 कारचे उत्पादन केले जाईल. कंपनीने अद्याप या कारच्या किंमतीबाबत घोषणा केलेली नाही. जानेवारीमध्ये लाँचिंगवेळीच किंमतीची घोषणा केली जाईल. तरी काही रिपोर्ट्सनुसार, या कारची किंमत 20 लाख रुपयांपर्यंत असू शकते.