सध्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये प्रचंड प्राइस वॉर सुरू आहे. दररोज प्रत्येक कंपनी नवनवे प्लॅन्स सादर करून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी बीएसएनएलनेही आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर जाहीर करत त्यांना खूश करायचे ठरवले आहे. बीएसएनएलने आपल्या ग्रांहकांसाठी लूट लो पोस्टपेड ऑफर लाँच केली असून काही दिवसांतच ग्राहकांना याचा लाभ घेता येईल असे सांगितले आहे.
बीएसएनलच्या या नव्या ऑफरअंतर्गत पोस्टपेडचा प्रिमियम प्लॅन असणाऱ्यांना ६० टक्के डिस्काऊंट दिला जाणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये एक एक सिम कार्डही फ्री मिळणार आहे. तसेच हे कार्ड अॅक्टीव्हेट करण्यासाठी कोणतेही चार्जेस लागणार नसल्याचेही कंपनीकडून सागंण्यात आले आहे. ही ऑफर बीएसएनएलच्या नव्या आणि जुन्या पोस्टपेड ग्राहकांना मिळणार आहे. यामध्ये मिळणारे आकर्षक डिस्काऊंट पाहून अनेक जण बीएसएनएलकडे वळण्याची शक्यता आहे.
यामध्ये १,५२५ रुपयांचा प्रीमियम पोस्टपेड प्लॅनवर जवळपास ६० टक्के डिस्काऊंट मिळू शकतो. म्हणजे महिना रेंट ६० टक्क्यांनी कमी भरावे लागू शकते. यामध्ये अनलिमिडेट व्हॉईस कॉल, एसएमएस आणि ठराविक इंटरनेट डेटा दिला जाणार आहे. मात्र हे डिस्काऊंट मिळविण्यासाठी ग्राहकांना १२, ६ किंवा ३ महिन्यांचा अॅडव्हान्स रेंटल प्लॅन घ्यावा लागेल. यातही प्लॅननुसार डिस्काऊंटची टक्केवारी कमी होणार आहे. सहा महिन्यांचा अॅडव्हान्स रेंटल प्लॅनवर ४५ टक्क्यांपर्यंत तर ३ महिन्यांचा अॅडव्हान्स रेंटल प्लॅनवर ३० टक्के डिस्काऊंट मिळेल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.