डिजिटल व्यवहारांसाठी BHIM UPI चा वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. BHIM UPI  चे ग्राहक आता नवीन सुविधेच्या मदतीने प्रलंबित पेमेंटबाबतची माहिती घेण्यासोबतच तक्रारही करु शकणार आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) BHIM UPI वर ‘युपीआय हेल्प’ ही नवी सेवा सुरू केली आहे.

आरबीआयच्या निर्देशानुसार ग्राहकांना अनुकूल आणि पारदर्शक यंत्रणा वापरण्यास मिळावी याअंतर्गत ही सेवा सुरू करण्यात आल्याचं एनपीसीआयकडून मंगळवारी सांगण्यात आलं आहे. BHIM UPI अ‍ॅपवरील नवीन सेवा सुरुवातीला स्टेट बँक ऑफ इंडिया, अ‍ॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांसाठी सुरू झाली आहे. अ‍ॅपमध्ये मर्चंट व्यवहाराची तक्रार करण्याचा पर्यायही आहे. प्रलंबित पेमेंटची माहिती, किंवा व्यवहाराबाबात अन्य तक्रारीसाठी युपीआय हेल्पचा वापर करता येईल.

Do not come to ask for votes placards from onion growers in Malwadi
मत मागण्यासाठी येऊ नये, माळवाडीत कांदा उत्पादकांकडून फलक
nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना
blue pebble and radiowalla ipo will open at the end of the month
महिनाअखेर दोन कंपन्यांचे आयपीओ खुले होणार; ब्लू पेबल’चा विस्तार योजनेसाठी १८.१४ कोटींचा आयपीओ

लवकरच अन्य बँकांच्या ग्राहकांसाठीही होणार सुरूवात :- 

पेटीएम पेमेंट्स बँक आणि टीजेएसबी सहकारी बँकेचे ग्राहकही लवकरच युपीआय-हेल्पचा लाभ घेऊ शकणार आहेत. अन्य काही बँकांच्या ग्राहकांसाठीही आगामी काही महिन्यांमध्ये ही सेवा सुरू होईल असं एनपीसीआयकडून सांगण्यात आलं आहे.