नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. भारतामध्ये रेल्वेचे जाळे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आता रेल्वेत ग्रुप डी पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. इच्छुक उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ एप्रिल २०१९ आहे. तसेच १०वी , १२वी किंवा आयटीआय उत्तीर्ण झालेले विद्यार्थी देखील अर्ज करु शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ वर्षे ते ३३ वर्षे वयोगटामध्ये असणे गरजेचे आहे. OBC आणि General विभागातील उमेदवारांकडून अर्ज शुल्क ५०० रुपये आकारण्यात येणार आहे तर एससी, एसटी आणि महिला वर्गांसाठी हे शुल्क २५० रुपये आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना संगणकाची माहिती असणे गरजेचे आहे.

विभागवार आणि जगांची संख्या

सेन्ट्रल रेल्वे- ९३४५, इस्ट सेन्ट्रल रेल्वे- ३५६३, इस्ट कोस्ट रेल्वे-२५५५, इस्टन रेल्वे, सीएलडब्ल्यू आणि मेट्रो, नॉर्थ सेन्ट्रल रेल्वे आणि डीएलएम-४७३०, नॉर्थ इस्टन रेल्वे, एमसीएफ आणि आरडीएलओ- ४००२, नॉर्थ वेस्टन रेल्वे- ५२४९, नॉर्थन रेल्वे, नॉर्थइस्ट रेल्वे- २८९४, डीएमडब्ल्यू आणि आरसीएफ- १३१५३, साउथ सेंट्रल रेल्वे- ९३२८, साउथ इस्ट सेन्ट्रल रेल्वे-१६६४, साउथ इस्टर्न रेल्वे- ४९१४, साउथ वेस्टर्न रेल्वे आणि आरडब्ल्यूएफ- ७१६७, साउथ रेल्वे आणि आयसीएफ- ९५७९, वेस्ट सेन्ट्रल रेल्वे- ४०१९, वेस्टर्न रेल्वे- १०७३४

इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी www.rrcer.com या वेबसाईटची मदत घ्यावी.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway recruitment
First published on: 08-04-2019 at 19:49 IST