स्मार्टफोन मार्केटमधील आघाडीची कंपनी सॅमसंगने (Samsung) भारतात आज(दि.2) नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी M02 (Samsung Galaxy M02) लाँच केलाय. गॅलेक्सी एम सीरिजमधील हा कंपनीचा एक नवीन आणि स्वस्त स्मार्टफोन आहे. हा फोन म्हणजे गेल्या वर्षी लाँच झालेल्या Samsung Galaxy M01 साठी अपग्रेडेड व्हर्जन आहे. Galaxy M02 मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअपसोबत 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. भारतीय स्मार्टफोन बाजारात गॅलेक्सी M02 स्मार्टफोनची पोको C3, रेडमी 9, रिअलमी C15 आणि Micromax In 1b यांसारख्या फोनसोबत टक्कर असेल.

Samsung Galaxy M02 का कॅमेरा :-
Samsung Galaxy M02 च्या कॅमेऱ्याबाबत सांगायचं झाल्यास या फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यातील मुख्य कॅमेरा 13 मेगापिक्सेलचा आणि दुसरा कॅमेरा 2 मेगापिक्सेलचा आहे. तर, सेल्फीसाठी या फोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही आहे. कॅमेऱ्यासोबत ब्युटी आणि पोट्रेटसारखे अनेक मोड्स आहेत. याशिवाय फोनमध्ये 10W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh क्षमतेची दमदार बॅटरीही आहे. तसेच, कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ, GPS/A-GPS आणि युएसबी टाइप-सी पोर्ट आहे.

आणखी वाचा- 6000mAh बॅटरीचा Poco M3 स्मार्टफोन झाला लाँच, किंमत 15 हजारांपेक्षा कमी

Samsung Galaxy M02 की स्पेसिफिकेशन्स :-
फोनमध्ये ड्युअल सिमकार्डसोबत अँड्रॉइड 10 वर आधारित One UI चा सपोर्ट आहे. फोनमध्ये 6.5 इंचाचा HD+ इन्फिनिटी व्ही डिस्प्ले मिळेल. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी फोनमध्ये मीडियाटेक प्रोसेसर आहे. 3 जीबीपर्यंत रॅम आणि 32 जीबीपर्यंत स्टोरेज यामध्ये आहे, मेमरी कार्डद्वारे स्टोरेज 1 टीबीपर्यंत वाढवता येणंही शक्य आहे.

आणखी वाचा- मास्कमुळे iPhone अनलॉक होत नाहीये का?; अ‍ॅपलने शोधला तोडगा

Samsung Galaxy M02 ची किंमत :-
भारतात Samsung Galaxy M02 ची किंमत 6 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन सध्या 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज या एकाच व्हेरिअंटमध्ये उपलब्ध असेल. फोनसाठी 3 जीबी रॅम व्हेरिअंटही आहे, पण त्याच्या किंमतीबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. ब्लॅक, ब्लू, ग्रे आणि रेड अशा चार कलर्सच्या पर्यायांमध्ये Galaxy M02 हा फोन लाँच करण्यात आला आहे. अॅमेझॉन इंडिया वेबसाइट, सॅमसंग ऑनलाइन स्टोअर आणि अन्य रिटेल स्टोअर्समध्ये 9 फेब्रुवारीपासून हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असेल.