TVS ने आपली पहिली इलेक्ट्रिक स्कुटर TVS iQube भारतीय बाजारात उतरवली आहे. ही इलेक्ट्रिक स्कुटर अ‍ॅडव्हान्स इलेक्ट्रिक ड्राइव्हट्रेन आणि नेक्स्ट-जेनरेशन TVS SmartXonnect प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. मार्केटमध्ये टीव्हीएसच्या या स्कुटरची थेट टक्कर काही दिवसांपूर्वीच लाँच झालेल्या बजाज चेतक इलेक्ट्रिकसोबत असेल.

कंपनीच्या वेबसाइट किंवा डिलरशिपवर 5 हजार रुपयांमध्ये या स्कुटरसाठी बुकिंगला सुरूवात झालीये. पण सध्या ही स्कुटर केवळ बेंगळुरूमध्येच विक्रीसाठी उपलब्ध आहे. मात्र लवकरच ही स्कुटर देशातील अन्य मेट्रो शहरांमध्ये उपलब्ध होईल. बेंगळुरूमधील कंपनीच्या वेबसाइट किंवा डिलरशिपवर 5 हजार रुपयांमध्ये या स्कुटरसाठी बुकिंगला सुरूवात झालीये. स्कुटरच्या खरेदीवर कंपनीकडून टीव्हीएस क्रेडिटच्या माध्यमातून ग्राहकांसाठी काही आकर्षक ऑफर्सही आहेत.

पावर, रेंज आणि चार्जिंग टाइम:
TVS iQube स्कुटरमध्ये 4.4 kW इलेक्ट्रिक मोटार आहे. स्कुटरमध्ये लिथियम-आयन बॅटरी असून पूर्ण चार्ज होण्यासाठी पाच तासांचा वेळ लागतो. एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर ही स्कूटर 75 किलोमीटरपर्यंत धावेल असा कंपनीचा दावा आहे. 0 ते 40 किलोमीटर प्रतितास वेग पकडण्यासाठी 4.2 सेकंदाचा वेळ लागेल. स्कुटरचा टॉप स्पीड 78 किलोमीटर प्रतितास असून स्कुटरमध्ये पावर आणि इकॉनॉमी असे दोन रायडिंग मोड आहेत.

कनेक्टेड टेक्नॉलॉजी:
या स्कुटरमध्ये कनेक्टेड टेक्नॉलॉजी असून अ‍ॅडव्हान्स टीएफटी क्लस्टर आणि iQube अ‍ॅपसह नवीन TVS SmartXonnect कनेक्टेड प्लॅटफॉर्म आहे. स्कुटरमध्ये जिओ-फेंसिंग, नेव्हिगेशन असिस्ट, रिमोट बॅटरी चार्ज स्टेटस, लास्ट पार्क लोकेशन, इनकमिंग कॉल अलर्ट आणि एसएमएस अलर्टसह अन्य फीचर्स आहेत. याशिवाय क्यू-पार्क असिस्ट, डे अँड नाइट डिस्प्ले आणि रिजनरेटिव ब्रेकिंग यांसारखे फीचर्सही आहेत.

नियो-रेट्रो लुक:
ही नियो-रेट्रो स्टाइल असलेली इलेक्ट्रिक स्कूटर असून U-शेप एलईडी डीआरएल, क्रिस्टल-क्लिअर एलईडी हेडलँम्प आणि एलईडी टेललँम्प आहे.

किंमत आणि बुकिंग:
आयक्यूब इलेक्ट्रिक स्कुटरची किंमत 1.15 लाख रुपये असून ही किंमत बेंगळुरुमधील ऑन-रोड किंमत आहे. कंपनीच्या वेबसाइट किंवा डिलरशिपवर 5 हजार रुपयांमध्ये या स्कुटरसाठी बुकिंगला सुरूवात झालीये. स्कुटरच्या खरेदीवर कंपनीकडून टीव्हीएस क्रेडिटच्या माध्यमातून ग्राहकांसाठी काही आकर्षक ऑफर्सही आहेत.

उपलब्धता:
टीव्हीएसची ही स्कुटर सध्या केवळ बेंगळुरुमध्ये उपलब्ध आहे. मात्र काही महिन्यांमध्ये ही स्कुटर देशातील अन्य मेट्रो शहरांमध्ये उपलब्ध होईल.