टेलिकॉम कंपनी व्होडाफोनने आपले कमी किंमतीचे फुल टॉक टाइम प्लान्स पुन्हा लाँच केले आहेत. आता कंपनी आपल्या 20, 30 आणि 50 रुपयांच्या रिचार्जवर फुल टॉक टाइम देत असून 28 दिवसांची वैधता आहे. यापूर्वी ग्राहकांना किमान 35 रुपये अकाउंटमध्ये ठेवणं आवश्यक असायचं, पण आता 20 रुपयांच्या रिचार्जद्वारे तुम्ही अकाउंट सुरू ठेवू शकणार आहात. व्होडाफोनच्या या प्लानमध्ये फुल टॉक टाइमशिवाय अतिरिक्त फायदे मिळत नाहीत. म्हणजे युजरला एसएमएस डेटा बेनिफिट या प्लान्समध्ये मिळणार नाहीत. कंपनीचा 10 रुपयांचा प्लान देखील असून यामध्ये 7.47 रुपयांचा टॉकटाइम आहे.

व्होडाफोनने काही दिवसांपूर्वीच जिओ आणि एअरटेलला टक्कर देण्यासाटी 69 रुपयांचा प्रीपेड प्लान लाँच केला आहे. हा प्लान कंपनीने बोनस कार्डच्या श्रेणीमध्ये ठेवला असून विविध क्षेत्रांनुसार हा प्लान उपलब्ध आहे. या प्लानची वैधताही २८ दिवसांची असून यामध्ये ग्राहकांना 250 MB 3जी/4जी डेटा आणि 100 एसएमएस वापरण्यास मिळतात. मुंबई क्षेत्रातील ग्राहकांना या प्लानमध्ये 150 लोकल व एसटीडी मिनिट मिळतात.

आणखी वाचा- SBI Alert : लाखो पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, 30 नोव्हेंबरपर्यंत करा ‘हे’ काम

दरम्यान, भारतातून आपला गाशा गुंडाळणार असल्याची निव्वळ अफवा असल्याचे स्पष्टीकरण व्होडाफोन कंपनीने दिले आहे. ब्रिटनस्थित दूरसंचार कंपनी व्होडाफोन भारतीय बाजारातपेठेतील आपली गुंतवणूक कायम ठेवणार असून सद्यस्थितीतील आव्हानांत तग धरून राहण्यासाठी केंद्र सरकारकडे मदतीची मागणी करणार असल्याचे व्होडाफोन समूहाने दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे.