जर तुम्ही पेन्शनर असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. कारण, सरकारने पेन्शनच्या काही नियमांमध्ये बदल केले असून एक एप्रिलपासून नवे नियम आमंलात येणार आहेत. सहा लाखांपेक्षा जास्त EPS पेन्शनर्सला याचा फायदा होणार आहे. एक एप्रिलपासून EPS पेन्शनर्सला जास्त पेन्शन मिळणार आहे.
केंद्र सरकारच्या नविन नियमांनुसार २५ सप्टेंबर २००८ पर्यंत ज्या कर्मचाऱ्यांनी कम्युटेड पेन्शनचा लाभ घेतला आहे, त्या पेन्शनधारकांना १५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर सामान्य पेन्शन धारकांप्रमाणे निवृत्ती वेतन मिळवता येणार आहे. या नव्या नियमांना माघार घेतलं होतं. आता श्रम मंत्रालयाने नव्या नियमांच्या सुचना जारी केल्या आहेत. त्याशिवाय कर्मचारी भविष्य निधी (ईपीएफ) स्कीमच्या अंतर्गत पीएफ खाताधारकांना (PF Account holders) पेन्शनचे के कम्यूटेशन लागू केलं जाणार आहे. २५ सप्टेंबर २००८ पर्यंत निवृत झालेल्या पेन्शन धारकांना याचा जास्त फायदा होणार आहे.
श्रम आणि रोजगार मंत्रालयाने कर्मचारी निवृत्ती वेतन योजना १९९५ कायद्यात सुधारणा केली आहे. श्रम आणि रोजगार मंत्रालयाने यासंदर्भात जारी केलेल्या पत्रकात याची माहिती दिली आहे. यानुसार कम्युटेशनचा फायदा घेतल्यानंतर सामान्यरित्या पेन्शन मिळण्याची सोय केलेली आहे. ११९५च्या कायद्यात परिच्छेद १२अ नुसार पेन्शन कम्युटेशनचा फायदा जर कोणी २५ सप्टेंबर २००८ किंवा त्या आधी घेतला असेल तर त्याला १५ वर्षांनंतर सामान्य पेन्शन धारकांप्रमाणे निवृत्ती वेतन मिळणार आहे.
जुन्या नियमांनुसार कर्मचारी आपल्या निवृत्ती नंतर कम्युटेशननुसार पेन्शनचा लाभ घेत असेल तर त्याच्या पेन्शनमधील काही रक्कम तो एकदम काढू शकतो. त्यामुळे शेवटी मिळणाऱ्या रकमेमध्ये कपात होते. आता सरकारने यासाठीचा कार्यकाळ हा १५ वर्षांचा केल्यामुळे कर्मचाऱ्यांना आता सामान्य पेन्शन धारकांप्रमाणे निवृत्ती वेतन मिळवता येणार आहे.