समुद्रकिनाऱ्यावरील भागात खोबरेल तेलाचा सर्रास वापर केला जातो. अगदी जेवण तयार करण्यापासून ते औषधांपर्यंत खोबरेल तेलाचा वापर होतो. यासोबत पुढे दिलेल्या टिप्स वाचून सौंदर्य खुलवण्यासाठी देखील तुम्ही खोबरेल तेलाचा वापर नक्की करू शकता. आकृती कोचर, स्वाती कपूर, रागिणी मेहरा या ब्युटी आणि मेकअप एक्सपर्टनीं ‘द इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत खोबरेल तेलाचा वापर सौंदर्य खुलवण्यासाठी कसा करता येईल, याबद्दल काही उपयोगी टिप्स दिल्या आहेत.

मेकअप रिमूव्हर – कदाचित अनेक महिलांना माहिती नसेल पण खोबरेल तेल हे उत्तम मेकअप रिमूव्हर म्हणून काम करते. मेकअप काढण्यासाठी आपण बऱ्याचदा बाजारात मिळणारे वेगवेगळे रसायनयुक्त रिमूव्हर विकत घेतो. पण त्याऐवजी खोबरेल तेलाने मेकअप काढला तर त्वचेला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचत नाही.
– खोबरेल तेलाने जखमेवरील दाह कमी होतो. जर तुम्हाला चटका लागला तर भाजलेल्या ठिकाणी खोबरेल तेल लावावे. होणारा दाह लवकर कमी होतो.
– खोबरेल तेल कोणत्याही प्रकाराच्या त्वचेसाठी चांगले असते. हात, पाय आणि चेहऱ्यावर नियमितपणे खोबरेल तेलाने मसाज केल्यास त्वचा मुलायम होते.
– डोळ्याखाली खोबरेल तेलाने दररोज मसाज केल्यास डोळ्याखाली सुरकुत्या पडत नाही. डोळ्याखाली असलेली काळी वर्तुळेही निघून जातात.
– चेहऱ्यावर पुरळ येत असलीत तर खोबरेल तेलाचा वापर तुम्ही करु शकता. खोबरेल तेलाच्या नियमित वापराने चेहऱ्यावरचे पुरळ कमी होण्यास मदत होते.

tasty and nutritious palak pare recipe
झटपट बनवा चविष्ट अन् पौष्टिक पालक पाऱ्या; वाचा परफेक्ट रेसिपी
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Health Benefits Of Anjeer
Health Benefits Of Anjeer : सकाळी रिकाम्या पोटी खा अंजीर; लगेच दूर होतील ‘या’ पाच समस्या
How many times in a week you should wash your bath towels Using dirty towels can cause skin diseases
बापरे! रोज टॉवेल न धुता वापरताय? यामुळे होऊ शकतात त्वचेचे गंभीर आजार, वाचा तज्ज्ञांचे मत
The price of petrol Diesel In Marathi
Petrol and Diesel Rates : महाराष्ट्रात किती रुपयांनी वाढले पेट्रोल-डिझेलचे दर? जाणून घ्या तुमच्या शहरांतील आजचा भाव
drinking water with food cause gas or indigestion Know from experts
अन्नाबरोबर पाणी प्यायल्याने गॅस किंवा अपचन होऊ शकते का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
spicy potato thecha
बटाट्याच्या झणझणीत ठेचा नक्की ट्राय करा; वाचा साहित्य आणि कृती
20th october Petrol and diesel price
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे भाव वाढले की कमी झाले? वाचा तुमच्या शहरांतील लेटेस्ट रेट

– खोबरेल तेलाने चेहरा उजळण्यास मदत होते. यासाठी खोबरेल तेल आणि मध समप्रमाणात घेऊन त्याचे फेसपॅक तयार करावे. हे फेसपॅक चेहऱ्याला लावावे. नैसर्गिक फेसपॅकमुळे चेहरा उजळतो.
– जर अंगावर लाल चट्टे किंवा खाज येत असेल तर खोबरेल तेलाच्या वापरामुळे आराम मिळतो.
– खोबरेल तेल मिश्रित गरम पाण्याने अंघोळ केल्यास स्कीन टोन सुधारतो.
– खोबरेल तेलात कोअर्स शुगर (coarse sugar, या साखरेचे दाणे आकाराने थोडे मोठे असतात) मिसळून हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे. हे मिश्रण नैसर्गिक स्क्रबर म्हणून काम करते. ज्यामुळे चेहऱ्यावरची मृत त्वचा निघून जाण्यास मदत होते.
– सतत आपण केसांवर केमिकलयुक्त शॅम्पू, कंडिशनरचा मारा करत असतो. यामुळे केसांचे आरोग्य बिघडते. केसगळतीचे प्रमाण वाढते. तुम्ही देखील अशा समस्येचा सामना करत असाल तर आठवड्यातून एकदा खोबरेल तेलाने केसांना मसाज करावा. यामुळे केसगळतीचे प्रमाण कमी होते आणि कोंड्याची समस्या देखील दूर होते.