नेहमी आपण वजन कसं कमी करायचं याच्या टीप्स पाहत असतो. पण वजन वाढणं ही जशी समस्या आहे, तशी वजन न वाढणं हीसुद्धा एक समस्याच आहे. नेहमी आपण वजन कसं कमी करायचं याचे उपाय पाहत असतो. पण गरजेपेक्षा कमी वजन असलेल्यांनी काय करावं? बारीक व्यक्तींना आपलं वजन कसं वाढवायचं याची नेहमी काळजी असते. आपलं वजन वाढावं, शरीरात उर्जा राहावी यासाठी घरच्या घरीच अनेक पदार्थ उपलब्ध असतात.

दर दोन तासांनी थोडं थोडं खावं. दर दोन तासांनी खाणं शक्य नसेल किंवा दोन जेवणाच्यामध्ये बराच वेळ जात असेल, तर मधल्या वेळेत सुकामेवा खाता येईल. तुमचं शरीर दिवसभरात जेवढ्या कॅलरीज वापरतं, त्यापेक्षा जास्त कॅलरीजचा आहार आपण घेतला पाहिजे. जाणून घेऊयात अशाच दहा घरगुती पदार्थाबद्दल, ज्याचे नियमित सेवन केल्यास वजन वाढण्यास मदत होईल…….

Can 30 grams of protein within 30 minutes of waking help regulate cortisol and balance hormones
सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटांत ३० ग्रॅम प्रथिने खाल्ल्याने कॉर्टिसोलचे नियमन आणि हार्मोन्स संतुलन होईल का? तज्ज्ञांनी केला खुलासा
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Milk paneer or curd Which is healthiest dairy product
दूध, पनीर व दही यांपैकी कोणता पदार्थ आहे सर्वांत जास्त फायदेशीर? कसे करावे सेवन, घ्या तज्ज्ञांकडून जाणून….
Winter special for lunch or dinner methi pulao recipe in marathi methi rise healthy food recipes in winter
पौष्टिकतेला चवीची जोड! हिवाळ्यात घरच्या घरी १० मिनिटांत बनवा मेथी पुलाव
vidya balan reveals her weight loss struggle in one interview
विद्या बालनने कसं घटवलं वजन? अनुभव सांगत म्हणाली, “मी जितका व्यायाम केला तितकी जास्त जाड…”
Marathi actress Aishwarya Narkar fan asks her weight
“तुमचं वजन किती?” विचारणाऱ्या चाहत्याला ऐश्वर्या नारकरांनी दिलं भन्नाट उत्तर, म्हणाल्या…
Purple Cabbage Healthy Salad Recipe In Marathi
वाढलेले वजन झपाट्याने होईल कमी; नाश्त्यामध्ये करा पर्पल कॅबेज सॅलेडचा समावेश, ही घ्या सोपी रेसिपी
Can even 1.5 grams of weight gain increase the risk
१.५ ग्रॅम वजन वाढल्यानेही वाढू शकतो मधुमेहाचा धोका? तज्ज्ञांचे मत काय…
  • दररोजच्या रात्रीच्या जेवणात भाताचा समावेश केल्यास वजन वाढण्यास मदत होईल.
  • दररोजच्या आहारात पिनेट बटरचा समावेश करा.
  • अंबा आणि दूध – एक अंबा आणि एक ग्लास दूध, दिवसभरातून दोन-तीन वेळा घेतल्यास याचा चांगला परिणाम दिसून येईल.
  • केळी आणि दूध एकत्र घेतलंत की वजन वाढतं. शिवाय केळी खाल्ल्यानं पचनशक्ती चांगली होते.
  • काजू उकडून आणि फ्राय करून आठवड्यातून दोन वेळा खावेत
  • ३० ग्रॅम मनुका आणि ६-७ सुखे अंजीर रात्रभर पाण्यात भिजू घाला आणि सकाळी खा. एका महिनाभरात याचा परिणाम तुम्हाला दिसेल.
  • उकडलेले बटाटे महिनाभर खा.
  • बादाम आणि दूध यांच्या मिश्रणाच्या सेवनानं शरीर संतुलित राहतं. शरीरात उर्जा निर्माण होते. उत्साह येतो.
  • आठवड्यातून तीनदा ताज्या फळांचा रस प्या.
  • मलई दूध : वजन वाढू नये यासाठी तुम्ही भलेही दुधावरील साय बाजूला काढत असाल. पण वजन कमी असेल तर सायसहीत दूध प्या. दूध आवडत नसेल तर मिल्क शेक बनवून प्या.