10 Most Common Names : नावात काय असतं असं अनेकजण म्हणतात. पण, नावावरूनच माणूस ओळखला जातो. माणसाची ओळख सांगण्यासाठी नाव हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. अगदी आधारकार्डपासून कोणतेही महत्त्वाचे कागदपत्र नावाशिवाय अपूर्ण असतात. आपल्या भारतीय संस्कृतीत लहान बाळाचा नामकरण सोहळा पार पडतो. या सोहळ्यात बाळाचे नाव ठेवले जाते. भारतात अनेक सामान्य नावं आहेत.
तुम्ही अनेकदा एकाच नावाच्या चार-पाच व्यक्ती तुमच्या वर्गात, नातेवाईकांमध्ये, कॉलनीत किंवा गावात पाहिली असेल. काही नावं इतकी सामान्य असतात की तुम्ही जिथे जाणार तिथे तुम्हाला त्या नावांची लोक भेटतील. आज आपण भारतातील अशाच दहा सर्वात सामान्य नावांविषयी जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राम

राम हे हिंदू देवताचे नाव आहे. अनेकांना देवाच्या नावावरून नाव ठेवायला आवडतात. त्यामुळे भारतात राम नावाचे सर्वाधिक लोकं तुम्हाला भेटतील. भारतात जवळपास ५० लाखांहून अधिक लोकांचे नाव राम आहे.

मोहम्मद

भारतात हिंदू आणि मुस्लिम धर्माचे लोक सर्वाधिक राहतात. अशात मोहम्मद नावाचे लोकं भारतात ४० लाखांहून अधिक आहेत.

सुनिता

सुनिता हे सर्वात जास्त सामान्य नाव आहे. भारतात जवळपास चाळीस लाख महिलांचे नाव सुनिता आहे.

अनिता

भारतात सुमारे ३५ लाख महिलांचे नाव अनिता आहे. अनिता, सुनिता ही नावं ग्रामीण भागात आजही आवडीने ठेवली जातात. ८० ते ९० च्या दशकात जन्मलेल्या सर्वाधिक महिलांचे नाव अनिता ठेवण्यात आले आहे.

पूजा

पूजा हे भारतातील अत्यंत सामान्य नाव आहे. पूजा या शब्दाचा अर्थ प्रार्थना विधी होतो. अनेकजण आवडीने पूजा हे नाव ठेवतात. आजही प्रत्येक वर्गात, नातेवाईकांमध्ये किंवा ओळखीच्या लोकांमध्ये कितीतरी पूजा नावाच्या महिला तुम्हाला भेटतील.

संतोष

संतोष हेसुद्धा सर्वाधिक लोकप्रिय नाव आहे. भारतात प्रत्येक गावात एक तरी संतोष नावाचा व्यक्ती दिसून येईल. अनेक भारतीय चित्रपट, टीव्ही मालिकांमध्येही संतोष नावाची व्यक्तीरेखा दिसून येते

हेही वाचा : पौष्टिक अडई डोसा खाल्ला का? ही सोपी रेसिपी लगेच नोट करा अन् घरीच झटपट बनवा

संजय

भारतात जवळपास ३० लाखांहून अधिक लोकांचे नाव संजय आहे. महाभारतापासून ते आताच्या २१ व्या शतकापर्यंत संजय हे नाव लोकं आवडीने ठेवतात.

सुनिल

संजयप्रमाणे सुनिल हेसुद्धा अत्यंत लोकप्रिय नाव आहे. जवळपास ३० लाख लोकांचे नाव भारतात सुनिल आहे. सुनिल नावाची व्यक्ती तुम्हाला नातेवाईक, मित्रपरिवार आणि कामाच्या ठिकाणीसुद्धा भेटतील.

राजेश

राजेश हेसुद्धा अत्यंत सामान्य नाव आहे. ७० ते ९० च्या दशकात जन्मलेल्या लोकांचे राजेश हे नाव दिसून येते. प्रत्येक गावात तुम्हाला तीन चार राजेश नावाची लोकं भेटतील. भारतात जवळपास तीस लाखांहून अधिक लोकांचे नाव राजेश आहे.

गीता

गीता हेसुद्धा अत्यंत लोकप्रिय नाव आहे. ग्रामीण भागात अनेक महिलांचे नाव गीता ठेवतात. हिंदू धर्मानुसार गीता या शब्दाचा अर्थ पवित्र ग्रंथ होतो. भारतात सुमारे तीस लाख महिलांचे नाव गीता आहे.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10 most common and popular names in india do you know ndj
Show comments