10 mudras for good digestion: आजच्या काळात धावपळीचं आयुष्य झाल्याने अनेक जण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. खाण्याची वेळ न पाळणे, अपुरी झोप, नियमित व्यायाम न करणे; अशा अनेक गोष्टींमुळे आजारपण उद्भवतं. यामुळे पचन क्रियेत बिघाड होण्याची शक्यता वाढते आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो.

मुद्रा किंवा हाताचे जेश्चर (gesture) पचन क्रिया सुधारण्यास, अस्वस्थता कमी करण्यास तसेच आरोग्यासाठी लाभदायक असतात. विशेषत: पचन क्रिया सुधारण्यासाठी या दहा मुद्रा आवर्जून करून पाहा:

Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Banana health benefits
दररोज एक केळे खाल्ल्याने तुम्ही निरोगी राहू शकता? तज्ज्ञ काय सांगतात…
curd and coffee for tan removal
Tan Removal Remedy : चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी करा उपाय! दही व कॉफीचा लावा मास्क; पण डॉक्टरांचे मत काय?
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
Ragi Upma Recipe
२ वाटी पीठापासून नाश्त्यामध्ये बनवा नाचणीचा पौष्टिक उपमा; वाचा साहित्य आणि कृती
Nutritious laddoos Recipe
फक्त १० मिनिटांत बनवा पौष्टिक लाडू; पटकन वाचा साहित्य आणि कृती
Benefits of eating tup chapati
पोळीला तूप, साखर लावून खाल्ल्याने होतात अनेक फायदे; पण खाण्याची योग्य वेळ कोणती?

अपान मुद्रा (Apana Mudra)

अंगठा, मध्यमा (मधले बोट) आणि अनामिका (Rink Finger) यांची टोके जोडून घ्या आणि बाकीची बोटे सरळ ठेवा. ही मुद्रा विषारी द्रव्ये काढून टाकण्यास मदत करते आणि आतड्यांच्या हालचालींना चालना देऊन पचनास मदत करते.

वरुण मुद्रा (Varun Mudra)

इतर बोटे सरळ ठेवून अंगठा आणि करंगळीच्या टोकांना एकत्र स्पर्श करा. वरुण मुद्रा शरीरातील पाण्याचे घटक संतुलित करते आणि ॲसिडिटी आणि गॅससारख्या पाचन विकारांवर उपचार करण्यास मदत करते.

सूर्य मुद्रा (Surya Mudra)

अनामिका बोट फोल्ड करा, त्यावर अंगठ्याच्या मदतीने हलका दाब द्या. ही मुद्रा शरीरातील अग्नि तत्व वाढवते, चयापचय उत्तेजित करते आणि पचनास मदत करते.

प्राण मुद्रा (Pran Mudra)

अंगठा, अनामिका आणि करंगळीच्या बोटांची टोके एकत्र जोडा आणि बाकीची बोटे सरळ ठेवा. प्राण मुद्रा शरीराची ऊर्जा पातळी वाढवते आणि पाचन अग्नि सक्रिय करून पचन सुधारते.

वायु मुद्रा (Vayu Mudra)

तर्जनी बोट फोल्ड करा आणि अंगठ्याच्या मदतीने त्यावर दाब द्या, त्यावेळेस बाकीची बोटे सरळ ठेवा. वायु मुद्रा गॅस निर्मिती आणि ब्लोटिंग कमी करण्यास मदत करते, पचन व्यवस्थित होण्यास मदत करते.

ज्ञान मुद्रा (Gyan Mudra)

अंगठा आणि तर्जनीच्या बोटांची टोके एकत्र जोडा, बाकीची बोटे सरळ ठेवा. ज्ञान मुद्रा मनाला शांत करते आणि एकाग्रता वाढवते, जी अप्रत्यक्षपणे ताण कमी करून पचनास मदत करते.

लिंग मुद्रा (Linga Mudra)

दोन्ही हातांची बोटे झिग झॅग पद्धत्तीने जोडून घ्या आणि डावा अंगठा सरळ ठेवा. लिंग मुद्रा शरीरात उष्णता निर्माण करते, पचनास मदत करते आणि एकूण रक्ताभिसरण सुधारते.

मंडला मुद्रा (Mandala Mudra)

हाताचे तळवे प्रार्थनेच्या स्थितीत एकत्र ठेवा आणि अंगठे सरळ ठेवून बोटांना एकमेकांशी जोडून घ्या. मंडल मुद्रा शरीरात संतुलित ऊर्जा प्रवाह निर्माण करते, पचन सुधारते.

शंख मुद्रा (Shankha Mudra)

उजव्या हाताच्या चार बोटांनी डाव्या हाताच्या अंगठ्याला विळखा घालून त्यावर दाब द्या. डाव्या हाताची चार बोटे आणि उजव्या हाताचा अंगठा सरळ करून एकमेकांना जोडा. शंख मुद्रा शंखासारखी दिसते आणि अपचन आणि पोट फुगणे यासारख्या पाचक विकारांना दूर ठेवण्यास मदत करते.

पद्म मुद्रा (Padma Mudra)

दोन्ही हातांची करंगळी आणि अंगठे जोडून हातांनी कमळाचा आकार तयार करा.पद्म मुद्रा मन आणि शरीराला शांतता देण्यास मदत करते, जेवल्यानंतर पचनास मदत करते.

हेही वाचा… Fire at petrol pump Viral Video: महिलेच्या धाडसाला सलाम! पेट्रोल पंपावर बाईक पेटली अन्…, अवघ्या १२ सेकंदात घडलं ‘असं’ काही

Story img Loader