Facial Hair Removal Tips: अलीकडे अनेक स्किन केअर व्हिडीओमध्ये चेहऱ्यावरचे केस काढल्याने कशी तुकतुकीत कांती लाभते असे सांगितले जाते. पण आपण फेशियल हेअर शेव्हिंग केल्यास त्यामुळे पुन्हा जास्त व जाड केस वाढू शकतात का अशी भीती वाटते. अशावेळी आपल्या पूर्वजांपासून वापरण्यात आलेले काही घरगुती उपाय तुमचे हजारो रुपये आणि लाखोंच्या वेदना वाचवू शकतात. रेझर किंवा वॅक्स न वापरता चेहऱ्यावरच्या केसाला टाटा करण्यासाठी आज आपण अगदी १० रुपयात घरच्या घरी करता येतील असे उपाय पाहणार आहोत, चला तर मग…

१० रुपयात चेहऱ्यावरचे केस घरच्या घरी कसे काढाल?

१) बेसन व हळदीचा मास्क

तुम्ही लहानपणापासून आई- आजी सगळ्यांकडून चेहऱ्याला बेसन व हळद लावण्याचे फायदे ऐकले असतील. एखाद्या महागड्या पार्लरमधील गोल्डन ब्लिच किंवा फेशियल लाजवेल इतका ग्लो मिळवून देणारा हा मास्क तुम्हाला चेहऱ्यावरील केसांपासूनही सुटका देऊ शकतो. हा पॅक एक नैसर्गिक स्क्रबचे काम करतो. यामध्ये तुम्ही चंदन पावडर आणि लिंबाचा रस सुद्धा घालू शकता.

keto diet keto-friendly oils
केटो डाएटमध्ये वापरले जाणारे खाद्यतेल खरंच वजन कमी करण्यास मदत करू शकते का? जाणून घ्या आहारतज्ज्ञ काय सांगतात
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास मंत्रिमंडळात कोण…
The lion came with the speed of the wind and attacked the cheetah
जगण्यासाठी शिकार महत्त्वाची! वाऱ्याच्या वेगाने आला सिंह अन् केला चित्यावर हल्ला; पुढच्या पाच सेकंदांत जे घडलं… VIDEO पाहून अंगावर येईल काटा
Voter ID Card Photo Change Process
मतदार ओळखपत्रावरील फोटो बदलायचा आहे? ऑनलाइन बदल करण्यासाठी फॉलो करा या सोप्या स्टेप्स
peoples lives will be saved due to the remote operated device
खरंच आता कुणी पाण्यात बुडणार नाही? रिमोटवर चालणाऱ्या यंत्रामुळे वाचणार लोकांचा जीव, VIDEO होतोय व्हायरल
milkoscan fda marathi news
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना दुधातील भेसळ रोखण्यासाठी मिळणार मिल्कोस्कॅन यंत्र
drinking hot lemon water in a copper pot
तांब्याच्या भांड्यात गरम लिंबू पाणी प्यायल्याने विषबाधा होऊ शकते? तज्ज्ञांनी मांडले मत..
increasing weight, health special, health,
health special : वाढत्या वजनाने मानसिकतेवर कसा परिणाम होतो?

२) लिंबू व मध

वॅक्स करताना अनेकदा तुम्हाला लक्षात आलं असेल की वॅक्स ही त्वचेला चिकटून केस मुळापासून उपटून काढतं. पण चेहऱ्यावर अशाप्रकारे वॅक्स वापरल्यास त्वचा लाल पडणे, त्वचेची छिद्र अधिक उघडून त्यात धूळ व घाण जाणे असे त्रास होऊ शकतात. यामुळे वॅक्सपेक्षा एक पैसा कमी चिकट असणारा पण तितकाहच प्रभावी मधाचा पर्याय तुमची मदत करू शकेल. लिंबाचा रस व मध एकत्र करून चेहऱ्याला लावल्याने गाल व मानेवरील नकोसे केस निघून जाऊ शकतात.

३) आवळा कोरफड

आता या उपायासाठी तुम्हाला थोडं आयुर्वेदिक उपचाराकडे वळायचं आहे. आयुर्वेदिक दुकानांमध्ये सहज मिळणारी आवळा, पिंपळ, आणि निवडुंगाची पावडर एकत्र करून त्यात कोरफडीचा गर किंवा पाणी मिसळून पेस्ट तयार करायची आहे. ही पेस्ट साधारण २० मिनिट चेहऱ्यावर लावून मग हलक्या हाताने चोळून थंड पाण्याने धुवून घ्या.

या सर्व उपायांचा फायदा असा की यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील मळ, धुळीचे कण, मृत त्वचा हे सगळं निघून जाण्यास मदत होते परिणामी नैसर्गिक रित्या चेहऱ्यावर एक ग्लो येऊ लागतो. तुम्हाला यातील कोणत्याही गोष्टीची ऍलर्जी असल्यास असा प्रयोग करण्याआधी एकदा तुमच्या ओळखीतील त्वचा तज्ज्ञांचा सल्ला सुद्धा घेऊ शकता.

हे ही वाचा<< चहामध्ये दालचिनी वापरल्याने रक्तातील साखर राहते स्थिर? अभ्यासात समोर आलेली खरी माहिती वाचा

आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे चुकूनही हे मास्क तुमच्या भुवया, पापण्या किंवा डोळ्यांच्या भागात लावू नका. शिवाय मास्क लावताना केसही नीट बांधून शॉवर कॅप किंवा टॉवेलने झाकून घ्या.