Starfruits Benefits For Health: लहानपणी शाळेच्या बाहेर उभ्या असणाऱ्या चिंचा-बोरं विकणाऱ्या गाडीवर आपण एक फळ लांबुडके हिरवट फळ नेहमीच पाहिले असेल. कापल्यावर ताऱ्यासारखे दिसणारे हे तुरट- आंबट चवीचे फळ म्हणजे ताराफळ किंवा स्टार फ्रुट. रसाळ फळाच्या फोडींवर छान मसाला व मीठ भुरभुरून खाण्याचा विचार केला तरी तोंडाला पाणी सुटतं. सहसा जिभेचे चोचले पुरवण्यासाठी खाल्ल्या जाणाऱ्या गोष्टी या शरीरासाठी चांगल्या नाहीत असा एक समज असतो पण आज या चमचमीत स्टारफ्रुटचे फायदे वाचून तुमचाही गैरसमज नक्की दूर होईल.
नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मुंबईच्या नोंदणीकृत आहारतज्ज्ञ आणि क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट डॉ. उषाकिरण सिसोदिया यांच्या मते, स्टारफ्रूट, ज्याला कॅरंबोला म्हणूनही ओळखले जाते, हे अॅव्हेरोआ कॅरंबोला झाडाचे फळ आहे आणि त्याचे फायदे खालीलप्रमाणे:
स्टारफ्रूटमध्ये किती टक्के पोषकसत्व असतात?
कॅलरी: 31
कार्ब्स: 6.73 ग्रॅम
प्रथिने: 1.04 ग्रॅम
फॅट्स : 0.33 ग्रॅम
फायबर: 2.8 ग्रॅम
व्हिटॅमिन सी: 34.4mg (57% DV)
पोटॅशियम: 133 मिग्रॅ
फोलेट: 12 μg (3% DV)
मॅग्नेशियम: 10 मिग्रॅ
स्टारफ्रुटचे आरोग्याला फायदे काय?
1) अँटिऑक्सिडंटचे प्रमाण जास्त: व्हिटॅमिन सी समृद्ध, ते एक मजबूत अँटिऑक्सिडेंट म्हणून कार्य करते, आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, व्हिटॅमिन सीचा समृद्ध स्रोत असणारे स्टारफ्रूट रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करते. पण लक्षात घ्या, पावसाळ्यात स्टारफ्रुट खाण्याआधी नीट स्वच्छ करणे आवश्यक आहे.
2) फायबरचे मुबलक जास्त: स्टारफ्रुटमध्ये भरपूर फायबर असल्याने पचनास मदत होते.
3) वजन कमी करण्यासाठी: स्टारफ्रुटमध्ये कमी-कॅलरीज असल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यात मदत होते.
4) साखरेचे प्रमाण: स्टारफ्रूट मध्ये नैसर्गिक साखर सुद्धा कमी असल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत नाही.
मधुमेह असलेल्या लोकांनी स्टारफ्रूट्स खावे का?
डॉ. सिसोदिया सांगतात की, स्टारफ्रूटमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असल्याने हे फळ मधुमेहासाठी योग्य निवड ठरते, आपल्या नियमित आहारामध्ये स्टार फ्रुट समाविष्ट करण्यापूर्वी मधुमेहतज्ज्ञ किंवा पोषणतज्ज्ञांशी चर्चा करणे उत्तम ठरेल. मात्र अतिप्रमाणात स्टारफ्रुटचे सेवन केल्यास फळातील ऑक्सॅलिक ऍसिड मूत्रपिंडाच्या समस्या असलेल्यांवर परिणाम करू शकते त्यामुळे डायबिटीज रुग्णांनी ही बाब लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
स्टारफ्रुट गर्भवती स्त्रियांसाठी सुरक्षित आहे का?
डॉ. सिसोदिया सांगतात की, सामान्यतः स्टारफ्रूट्स गरोदरपणात सुरक्षित असतात. मात्र विशिष्ट स्थितीनुसार सतर्क राहण्यासाठी स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
हे ही वाचा<< नागपंचमीनंतर उरलेल्या एक वाटी लाह्यांनी १० मिनिटात सोडवा ‘हा’ मोठा प्रश्न, पोट मानेल आभार
स्टारफ्रूट खाताना या गोष्टी लक्षात ठेवा
स्टारफ्रूटची ऍलर्जी विकसित होण्याची किंवा अस्तित्वात असण्याची शक्यता नेहमीच असते, त्यामुळे या शक्यतेबद्दल सावध राहणे हे उचित ठरेल. तसेच स्टारफ्रूट जास्त प्रमाणात खाणे टाळा कारण त्यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो.