Back Pain Instant Relief: अलीकडे १० पैकी ९ लोकांचे आरोग्य हे बैठ्या जीवनशैलीमुळे बिघडलेले असते. एकाच खुर्चीवर कित्येक तास बसून काम करताना फक्त मानसिकच नव्हे तर शारीरिक ताण सुद्धा वाढत असतो. व्यायाम नसल्याने साहजिकच शरीरातील काही भागांना विशेषतः सांध्यांना मुबलक प्रमाणात पोषक सत्वांचा पुरवठा होत नाही. त्याशिवाय हाडांना सांधून ठेवणाऱ्या मांसपेशींना सुद्धा या सवयी दुर्बल करत असतात. अशावेळी तुम्ही एखादी चुकीची किंवा अचानक केलेली हालचाल सुद्धा असहाय्य वेदनांना कारण ठरू शकते. अचानक पाठीत लचक भरणे, कंबर ठणकत राहणे हे सगळे त्यालाच जोडून येणारे त्रास आहेत. आपण आज या त्रासांवर उत्तर ठरणाऱ्या १० सुपरफूड्स विषयी जाणून घेणार आहोत.
कंबर व पाठदुखीवर ‘हे’ १० पदार्थ देतील झटपट आराम
१) दूध: शरीराची बहुतांश दुखणी ही कॅल्शियमच्या कमतरतेमुळे उद्भवलेली असतात. दूध हे कॅल्शियमचे समृद्ध स्रोत मानले जाते त्यामुळे तुम्ही दिवसातून एकदा जरी दूध पिण्याची सवय लावली तरी तुम्हाला याचा प्रभाव तुमच्या शरीराच्या बांधणीवर व लवचिकतेवर पाहायला मिळू शकतो.
२) कोबी: कोणत्याही रूपात कोबी खाल्ल्याने आपल्याला व्हिटॅमिन A,C, K यांचा मुबलक पुरवठा शरीराला देता येतो. कच्चा कोबी खाणे कधीही उत्तम. यातील दाहविरोधी गुणधर्मांमुळे आपल्याला सांधेदुखी कमी करण्यात मदत होऊ शकते.
३) सुकामेवा- काजू, बदाम, अक्रोड यामध्ये ओमेगा ३ फॅटी ऍसिडमुळे सांधेदुखी कमी होण्यास व हाडे मजबूत होण्यास मदत मिळू शकते.
४) ब्रोकोली: ब्रोकोली मध्ये सुद्धा अँटी इन्फ्लेमेंटरी सत्वांचा साठा असतो, यामुळे कार्टिलेजचे होणारे नुकसान टाळण्यास मदत होऊ शकते, या प्रभावाने कंबर दुखी व पाठदुखीला सुद्धा दूर करता येऊ शकते.
५) कडधान्य: कडधान्यांमधील अँटी इन्फ्लेमेंटरी गुणांमुळे तुम्हाला पाठदुखी दुर करता येऊ शकते. शिवाय जर तुम्हाला व्हीसीहेशतः पाठ किंवा कंबरेला दुखापत झाली असेल तर या ठिकाणच्या मांसपेशींचे नुकसान भरून काढण्यासाठी सुद्धा कडधान्यांची मोठी मदत होऊ शकते.
६) मासे, (पडवे): माशांमध्ये मुळातच ओमेगा ३ फॅटी ऍसिड व तेलाची मूल्ये अधिक असतात यामुळे मांसपेशींना वंगण मिळू शकते ज्यामुळे आओपापच हाडांची लवचिकता वाढून आपल्याला विना पाठदुखी हालचाल करता येते.
७) ऑलिव्ह ऑइल: दाह व युरिक ऍसिडचे प्रमाण कमी करण्यासाठी ऑलिव्ह ऑइल हा नियमित तेलासाठी उत्तम पर्याय ठरतो. आपण कमी प्रमाणात का होईना ऑलिव्ह ऑइलचे सेवन करण्याचा विचार करू शकता, यामुळे हाडांना झालेल्या दुखापतीतूनही लवकर बरं होण्यास मदत मिळते.
८) रासबेरी: सफरचंद, अननस, बेरी, चेरी, द्राक्षे आणि लिंबूवर्गीय फळांमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि अँटिऑक्सिडंट असतात जे गुडघे आणि पाठदुखीमुळे होणारी जळजळ कमी करण्यास मदत करतात.
९) संपूर्ण धान्य जसे गहू, तपकिरी तांदूळ, बाजरी, बार्ली, इत्यादी, पाठदुखीपासून मुक्त होण्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरतात. यामध्ये खनिजे आणि जीवनसत्त्वे यासह महत्त्वपूर्ण पोषक सत्व असतात. महत्त्वाचे म्हणजे, फायबरमुळे शरीरात शॉर्ट-चेन फॅटी ऍसिड तयार होऊन जळजळ कमी करण्यास मदत होते.
हे ही वाचा<< तुमच्या वय व वजनानुसार एका दिवसात किती पाणी प्यायला हवं? धोका टाळायचा तर ‘हा’ सोपा तक्ता पाहा
१०) जेव्हा एखाद्या व्यक्तीला वेदना होतात, तेव्हा वेदनांमुळे त्यांचे स्नायू घट्ट होत असतात अशावेळी मॅग्नेशियम समृद्ध अन्न स्नायूंना मोकळे करते. म्हणूनच केळी, पालक अशा गोष्टींचा आहारात समावेश करायला हवा.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये)